"आई, मग काय विचार केलास तू? की अजुनही तुझा हट्ट कायमच आहे?" तन्मयने काकुळतीला येवुन विचारले.
"नाही, तेवढं सोडून बोला. हे मी कधीच मान्य करणार नाही." गायत्रीबाई आज अगदी हट्टालाच पेटल्या होत्या.
"आई, पण का आणि कशासाठी हा हट्ट? आम्हा पोटच्या पोरांपेक्षा तुझा हा शंभु तुला जास्त प्रिय आहे का? आणि आम्ही जे काही करतोय ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच करतोय ना?" चिन्मय गेल्या चार दिवसात प्रथमच या वादात पडला होता.
तिन मेंबर
मला एक एजंट,
म्हणजेच माझ्या मित्राचा-मित्र भेटला होता.
तेव्हा मी रस्त्यावरच्या दुकानात किराणा घेत होतो
जुनी ओळख दाखवत त्यानं
समोर येऊन हसत मुखानं हातात हात घेतला
'कसं काय!' विचारलं.
मीही त्याला "आता जे चालु आहे, त्यालाच बरचं म्हणायचं!"
असचं काहीतरी समाधानी उत्तर दिलं.
तो म्हणाला, मला तुमच्या घरी येयाचं आहे
यावर मी म्हणालो "भाग्य आमचं, आताच चला"
तो म्हणाला "आता नाही!"
कारण आता मला एकाकडे जायाचं आहे
त्याच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे.
तुम्ही वेळ द्या, म्हणजे तेच मला तुमच्याशी बोलता येईल.
मी म्हणलो "उद्याच या!"
त्यानंतर तो त्याचं महत्वाचं काम टाळुन
"...एक विचारू?"
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणालं.
"हं."
"मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय...पण.."
"पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?"
"..हो."
"अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या.."
" पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?"
"हो! आणि इतक्या उंचीवरून आता खरं तर ही लहान झाडंच ज्यास्त सुंदर दिसतात..."
...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!!
तिचं पत्र आलं. द्राविडी प्राणायाम करुन ते माझ्यापर्यंत उशिरा का होईना पोचलं हेच खूप. पाच वर्षात लग्नामुळे,नोकरीमुळे आपण चक्क दोन घरं बदलली याची आजवर पहिल्यांदा मला इतकी ठळक जाणीव झाली. या दोन घरांच्या आधी तिसर्याच घरात जिथे आधी राहत होतो, त्या पत्त्यावर तिनं पत्र धाडलं होतं. शेजारच्या काकूंनी सवयीप्रमाणे ते ठेवून घेतलं होतं आणि त्यांच्या नात्यातली एक मुलगी जी योगायोगाने माझ्याच ऑफिसात होती तिच्याकडे निरोप पाठवला होता. घरात कधीही काही पदार्थ केला की घरी थोडा आणून देणार्या, कॉलेजमधून यायला उशीर झाला की मायेने सरबत वगैरे देणार्या काकू मी साफ विसरुनच गेले होते.
"बाबा .................."
" काय झालं शोन्याला ?"
" आई रागावते सारखी सारखी, उठल्यापासून रागावते "
पिल्लू रडवेलं होऊन म्हणत होतं..
" काय ओरडत असतेस गं. झोपेतून उठल्यापासून काय भुणभुण आहे ? जरा प्रेमानं बोल कि..
पाच वर्षांच बाळच आहे ते "
" तुम्ही मधे पडू नका. ती तसंच करते. खूप हट्टी झालीय. मला आवरायचंय , तिचं आवरायचंय, बसची वेळ झालीय. हिला खायला तास लागतो. कधीचा घास तोंडात ठेवलाय "
" अग नाही खाल्लं तर नाही खाऊ दे. डबा खाईल ना ती. " मनात म्हटलं माझ्यावर गेलीये . मी पण असाच होतो .
( चिंचवड गावचा इतिहास सांगणारी ही कथा थोडिशी सत्य बरीचशी काल्पनीक. चिंचवड गाव जरा लहान आणि खेडेगाव ते शहर असा प्रवास करत होत तो काळ. गेले कित्येक दिवस लेखन घडत नव्हत. एक मायबोलीकर मात्र मला लिहायला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता ही कृतज्ञता.)
----------------------------------------------------------
व्हळीला गवर्या पाच पाच हा आवाज जसा गल्लीत घुमला तशी चा्ळींच्या खिडक्यातुन, अनेक डबलरुम कडे जाणार्या बाल्कनी वजा पॅसेजमधुन, अनेक बिर्हाडे असलेल्या वाड्यांच्या दरवाज्यात मुलांची गर्दी जमली.
अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
खरं माहीत झाल्यास
काय प्रतिक्रिया असेल त्याची
स्विकारेल
की झिडकारेल
संभ्रमावस्थेत होती
प्रामाणिकपणा तर आपल्याला
कुणी शिकवलाच नाही
मग आज अचानक ही भावना
का आली उफ़ाळुन
कदाचीत माझं संस्कारक्षम मन
अजुनही जागे आहे
की प्रेमाची हलकी झुळुक
कारणीभुत झालीय?
काही का असेना ,मी माझा पुर्वैइतिहास
सांगणार,
माझ्या प्रेमाला अंधारात का ठेऊ मी?
अविश्वास ही प्रेमाची पायरी असु शकते का?
नाहीच मुळी..................!