गुंजानं डोक्यावरचं ओझं दाराबाहेरच उतरवलं आणि शेजारच्या नळावर ठेवलेल्या बादलीतलं पाणी घेऊन तोंडावर हबके मारले. उरलेलं पाणी पायावर घालून ती जरा त्यातल्या त्यात ताजीतवानी झाली. उसनं अवसान आणायलाच हवं. नेहमीप्रमाणेच नशिबाला बोल लावत हातातली पिशवी घेऊन तिनं झोपडीचं दार उघडलं. उघडलं म्हणजे तसं ते उघडंच होतं. तिनं फक्त पायानं ढकललं. दार फाटदिशी उघडलं ... उघडेल नाहीतर काय? त्याचा जीव तो केवढा! दाराचा जीव? आपल्याच विचाराची तिला गंमत वाटली आणि क्षणभराकरता तिच्या रापलेल्या चेहर्यावर एक क्षीण हसू येऊन गेलं.
"पिंट्या, भाड्या बिरमुट्यायवडी पुरगी घागर घिऊन इतीया आणि तूला उचलना हुय?"
आजि सोनियाचा दिनु 
"बाबा ,मी निघतोय् ",ला अर्धवट झोपेतच अवि ---अविनाशने -विवेकला आपल्या लेकाला "बॉन व्हॉयेज" असा झोपाळू प्रतिसाद दिला.
अजून पहाट व्हायची होती,बहुधा ३-३० /४ वाजले होते.
विवेक आपल्या नेहेमीच्या प्रदीर्घ दौर्यावर युरोपला निघाला होता.
मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..
कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्या पसार्यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"
परतीचे दोर
.......................... कॉफ़ीचा वाफ़ाळता कप हातात घेऊन आज पूर्वा कधी नव्हे ती निवांतपणे बाल्कनीत बसली होती. संध्याकाळ हळूहळू आपलं जाळं विणत होती. फ़ेब्रुवारी संपत आला होता.
’समर’ची चाहूल घेणं सुरू झालं होतं. आज ऑफ़िसमधून लवकर सुटका झाली होती. शुक्रवार संध्याकाळ ...वीकेंडची अगदी आयडियल, छानशी सुरवात! तेवढयात सेलफ़ोन खणखणला. आत्ता कोण...म्हणत पूर्वाने फ़ोन पाहिला.
"अरे...धनूदी.........? हाय! काय गं दी? कशी चाललीये टूर? सध्या कुठे आहेस? ..पोर्टलंडला जायची होतीस ना? अगं........" पूर्वा जरा विचारात पडली होती.
अलका तुझे आजारपण इतके गंभीर असूनही, मी सर्व खर्च करणार,तुझ्या भावाचा संसार मार्गी लावून देणार,या प्रस्तावाने तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,मला माझा प्रस्ताव त्यांना मान्यच असल्याचे सांगत होता.आता ते तुला मी तुम्हा सर्वांसमोर ठेवलेला प्रस्ताव स्वीकारावा असे सांगतील.तेंव्हा कदाचित तुझ्या डोळ्यासमोर वीरेंद्र येईल आणि कदाचित तू भावनेच्या भारात विरोध करशील.पण अलका एक लक्षात ठेव,माझ्या आर्थिक मदती शिवाय हा गुंता सोडवता येणे शक्य नाही.
एकदा एका टेबलवर एक सुंदर मुखपृष्ठ असलेले पुस्तक ठेवलेले होते. त्या पुस्तकाची जाडीही; बरीच पानं असल्यामुळे जास्त होती. बांधणी तर अगदी उत्तम होती. पाहताक्षणीच त्या पुस्तकाला कुणीही हातात घेऊन वाचणार; असं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकाला स्वतःचा प्रचंड अभिमान वाटत होता. पण 'ग' च्या बाधेपासून त्याने स्वतःला जपले होते. आपण म्हणजे सारे जग नव्हे असे तो सतत मनातल्या मनात स्वतःला बजावत असे.