कथा

'असंभव..!!' :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-1

Submitted by अन्नू on 15 October, 2011 - 15:52

NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)

Suspense-Thriller.jpg

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)
.
.
.
.भाग=>1

..............................................."एक मिसिंग केस"......................................

गुलमोहर: 

सर्दी आणि थंड पाणी

Submitted by atul0000 on 15 October, 2011 - 12:36

थंड पाणी पिउन सर्दी बरी झाली अस कधी झालंय का? माझ्या बाबतीत झालंय !
नाशिकचा प्रचंड कडक उन्हाळा होता. मी माझा नाशिक दौरा संपवत होतो. अभियांत्रिकी दौरे थोडे विचित्र असतात. आख्खा दिवस कडक उन्हात एका टायर्स बनवणाऱ्या कंपनी मध्ये फिरत होतो. वरती कडक उन, समोर निरनिराळ्या मशीनची गर्मी, हेल्मेट, जड बूट ...सारच कठीण!! पुरता कातावून निघालो होतो. शेवटची मीटिंग सुद्धा उशीरा पर्यंत चालली. शेवटी मीच वैतागून मीटिंग थांबवली आणि मला मुंबईला जायचं आहे सांगून निघालो. मला खरोखरीच उशीर झाला होता.

गुलमोहर: 

ती, तिचं बाळ आणि मी.

Submitted by मनस्वी राजन on 14 October, 2011 - 23:29

पुण्यामधे माझी एक पक्की जागा आहे.
माझा एक कट्टा म्हटलं तरी चालेल.
माझ्या मित्र-मैत्रिणींचा जमायचा अड्डाच आहे तो.
’डेक्कन’ वरुन कोणी जाणार असेल तर जाता-जाता ’तुलसी’कडे बघुन जातोच.
आमच्यापैकी कोणीतरी तिथे भेटायची शक्यता जास्त असते.
’तुलसी’ म्हणजे डेक्कन वरच फेमस चहाच होटेल. इथल्या ’चहा’ पासुन ते तुलसीच्या मालकापर्यंत प्रत्येक गोष्टच वेगळी.
म्हणजे सगळच वेगळं,’तुलसीच्या चहाची चव’,’तुलसीचा मालक, तुलसीचे कामगार आणि तिथे बसणा-यापर्यंत सगळच वेगळ.
माझा एक मित्र नेहमी म्हणतो,"तुलसीचा चहा गरम असतो तो पर्यंत मसालेदार, पण जर का तो थंड झाला तर त्याच चहाची ’रम’ बनते. असो...

गुलमोहर: 

कोठे जाशी भोगा...!!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 October, 2011 - 16:40

''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सूड

Submitted by मिलन टोपकर on 9 October, 2011 - 12:46

"... आम्ही त्या खुन्याच्या शोधात आहोतच आणि मला खात्री आहे आम्ही लवकरच त्याला पकडू".

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साडे नऊ हजाराचा सूड

Submitted by atul0000 on 9 October, 2011 - 09:57

ऑफिस मधून निघताना आज जरा उशीरच झाला. साडेसहा वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला कोम्प्लेक्स मधून माझ्या घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्क्षा पकडली आणि निघालो. आधीच निघायला उशीर ....त्यात पावणेसातच ट्राफिक...म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाउण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच ..मला घड्याळात आठ वाजलेले दिसू लागले..मी गप्प बसून होतो रिक्क्षा मध्ये..

गुलमोहर: 

एक महाप्रवास !

Submitted by कवठीचाफा on 8 October, 2011 - 11:56

ही मायबोली दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा आहे मुद्दाम पुन्हा प्रकाशीत करत आहे
*********

गुलमोहर: 

पिंट्या

Submitted by कवठीचाफा on 8 October, 2011 - 09:10

" अरे तो डिओ बुटात नको मारु " नेहमी प्रमाणे मी बॉडी स्प्रे बुटात मारत असताना पकडल्या गेलो आणि आशु कडाडली. आता माझाही त्याला नाईलाज आहे, दिवसभर पाय बुटात अडकवून भर उन्हातान्हाचं फिरायचं तर पायाला घाम येतोच आणि त्यामुळे पायमोजे आणि पर्यायाने बुटालाही भयानक वास येतो. तोच वास घालवण्यासाठी मी हे असले उद्योग करतो आणि मग सौ. उखडते.
" अगं हो SS असेच बूट ठेवले तर आजूबाजूच्या लोकांकडून प्रदूषण मंडळाला तक्रारी जातील, थोडेफार बेशुद्ध पडतील, आता त्याच बेशुध्दीत बाजूच्या काकूंची कवळी पळवता आली तर बरं होईल किमान त्यांच्या मुलाचा पगार ऐकायचा त्रास तरी वाचेल रोजचा " मी आपली फुटकळ बडबड केली.

गुलमोहर: 

मन्या

Submitted by देवश्री on 4 October, 2011 - 16:13

दारावरच्या कडीचा आवाज होताच चटकन मन्या उठला. चारी पाय ताणत त्याने झक्कपैकी आळस दिला. अण्णा अजून कसे बर उठले नाहीत. बाहेर नक्कीच दुधवाला आला असेल. मन्याने उठून पलंगावर अण्णांच्या पायाशी उडी घेतली. थोडावेळ आपल्या हाताचे पंजे चाटत तो ते उठ्ण्याची वाट बघत बसला. खर म्हणजे अण्णा आत्तापर्यंत उठून आंघोळ पण करून आलेले असायचे. पण आज मात्र अण्णा अजूनही उठत नाही बघून शेवटी त्याने अलगद उडी खिडकीतून बाहेर उडी मारली. दुधवाला तशीच पिशवी टा़कून निघून गेला होता. मन्याने उगीचच पंजे पिशवीवर मारून आपल्या न्याहरीची सोय होते का बघायचा प्रयत्न केला.

गुलमोहर: 

राजाराम सीताराम ..............भाग ७ ......ड्रिलस्क्वेअर

Submitted by रणजित चितळे on 3 October, 2011 - 04:26

Pages

Subscribe to RSS - कथा