कथा
पाठलाग- गुढ्कथा
( ही कथा "killer in the backseat या अर्बन लीजेंड वर आधारित आहे)
हेमंतने घड्याळात पाहिले, तब्बल १० वाजत होते. बॉस ला मनातल्या मनात शिव्या देतच तो पार्कींग कडे जाउ लागला.आपली आवडती SX4 फ़ुल्ल स्पीड मधे त्यानं कंपनीबाहेर काढ्ली.
मोठी माणसं
पहाटचे चार वाजले असतेल. सगळं गाव शांत झोपलेलं व्हत. सगळीकड शांतता व्हती. अचानक, एकाएकी शिरपाच्या घराजवळचा हापसा खटा-खटा वाजू लागतो त्या आवाजात पहाटची शांतता भंग होते.
हापप्स्याचा आवाज कानी पडताच दररोज सकाळ होऊस्तोर झोपणारा शिरपा आज खडबडून जागा व्हतो. आपल्या बायकोच्या नावानं बोंब मारीत शिरपा कश्या - बश्या कपड्याच्या घड्या घालतो. शिरपाच्या घड्या घालणं झाला तरी आणखी शिरपा ची बायको उठलेली दिसत नाही. तसा शिरपाच तिच्या अंगावरचं गोदाड ओढून बाजूला फेकतो, तशी रकमा वैतागून शिरपावर खेकसते, ' काय लावलंय हे ? झोपू द्या कि थोडा वेळ?"
'आग उठ कि तांबडं फुटलंय'
' मुक्त '
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही ...
जेमतेम एवढेच गुणगुणली आणि ओंजळीत चेहरा लपवून ती हमसून हमसून रडायला लागली. आपण बसलो आहोत तिथून १० फुटावरच वाहता रस्ता आहे हे लक्षात येऊन ती अचानकच शांत झाली. डोळे पुसले. आपल्याला रडताना कोणी बघितले तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजू बाजूला बघितले. पण फारसे कोणी तिला दिसले नाही. साडेतीन चारच वाजत होते त्यामुळे शाळेच्या मुलांची पण गर्दी रस्त्यावर नव्हती आणि फारश्या गाड्या पण नव्हत्या.
भयानक : भाग ५
भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
------------------------------------------------------------------------------------------------
थोड्या वेळापूर्वीच नानांनी विश्वास हा दामलेंचा वारसदार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तरी विश्वासकडून काही नवी माहिती मिळवावी म्हणून मोहनराव काही माहित नसल्याचे दाखवत होते.
झपाटलेला वाडा-४
करर्र......करर्र.....कसल्यातरी आवाजाने अर्चित थोडा दचकला. बहुधा वाड्यातील कोणत्यातरी खोलीच्या दाराची उघडझाप होत असावी. अर्चितने उठून हातात मेणबत्ती घेतली आणि तो त्या प्रकाशात वाड्यातील सर्व खोल्यांची छाननी करू लागला. "आश्चर्यच आहे, एकही खोलीचे दार लावलेले नाही" मनाशीच विचार करत तो पुढील खोल्या धुंडाळू लागला. मध्येच एक खोलीपाशी थांबून तो जरा गोंधळला. कारण एकाही खोलीचे दार लावलेले नसले तरी या खोलीस चक्क कुलूप होते. करर्र......करर्र.....पुन्हा तोच आवाज. आता अर्चितची खात्री पटली कि तो आवाज याच खोलीतून येत आहे. पण या खोलीच्या कुलुपाची चावी मात्र त्याच्याकडे नव्हती.
रेवारी
दोन्ही बाजुला असलेल्या दाट वनराईतुन गाडी वाट काढत निघत होती. हिरवीगार झाडी , त्यातुन हळुवार डोकावणारी रंगीबेरंगी रानफुले ! जग इतके सुंदर ,निरागस देखील असु शकते , खिडकीतुन बाहेर डोकावणार्या शेखरच्या मनात बाहेरचे दृश्य पाहुन विचार डोकावला. आणि तसा विचार त्याच्या डोक्यात आला नसता तर नवल , सतत घाईत असणार्या मुंबापुरीत त्याचे जन्मापासुनचे नाते, आणि त्यात तो मेडियाच्या लाइन मधे शिरला , नेहमी ब्रेकींग न्युजचा पाठलाग करत मुंबईची झोपडपट्टी असो वा पेज थ्री पार्टी त्याने सगळी मुंबई पालथी टाकलेली पण असा निसर्ग आज पहिल्यांदा तोही साक्षात पाहात होता .
राजाराम सीताराम ............. भाग 8..............शिक्षा
हा भाग देण्यास खूप उशीर झाला. मी कामा साठी काही दिवस पोखरणला होतो. तेथे कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हीटी नव्हती त्यामुळे ब-याच दिवसात जालावर येता आले नाही. ....... ह्या जि ऐ ना.....
ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १
गुर्हाळ
संपतरावांच्या घरात आज सकाळपासुनच लगबग चालु होती. त्यांची बायको सुक्ष्मा जातीने प्रत्येक कामात लक्ष घालत होती. तर दोन्ही मुले अमित आणि गणेश नवीन कपडे करुन तयार होते.घरातल्याच देवघरात त्यांची आई नामस्मरणात तल्लीन झाली होती. एकदा का त्यांची पुजा अर्चा संपली की सुक्ष्मा ताई देवाला नैवेद्द्य दाखवणार होत्या व त्यानंतर सारे जण घराबाहेर पडणार होते. निमित्त्त होते त्यांच्या नवीन गुर्हाळाच्या उदघाट्णाचे.
बंड्या, बकुळी आणि एक 'रटाळ' लवश्टोरी..!
"जानू, किती वेळ मी तुझी इथे वाट पाहतेय..!" अंगात रंगबिरंगी फुलं असलेला शर्ट आणि पायात तंग जीन्स घातलेल्या बंड्याला पाहताच बकुळी आपल्या नाजुक बोटांनी हातातील फुलाची पाकळी खुडत बोलली.
"फार उशीर झाला का गं मला यायला?" बंड्या आपले दोन्ही हात खिशात टाकून जीन्स थोडी वर करत बोलला.
"तू आला नसतास तर, तुझी वाट पाहण्यात माझे अखेरचे श्वासही मी या इथेच घेतले असते." बकुळी एका हाताचं बोट बंड्याकडे रोखून आणि दूसर्या हातानं मेकअपनं बरबटलेलं आपलं थोबाड लपवित म्हणाली.
"पण हे राजसा तुझ्या उशीरा येण्याचं प्रयोजन तरी मला कळू दे." बकुळी संगीत नाटकातील नटीला शोभेलसा अभिनय करत म्हणाली.