करर्र......करर्र.....कसल्यातरी आवाजाने अर्चित थोडा दचकला. बहुधा वाड्यातील कोणत्यातरी खोलीच्या दाराची उघडझाप होत असावी. अर्चितने उठून हातात मेणबत्ती घेतली आणि तो त्या प्रकाशात वाड्यातील सर्व खोल्यांची छाननी करू लागला. "आश्चर्यच आहे, एकही खोलीचे दार लावलेले नाही" मनाशीच विचार करत तो पुढील खोल्या धुंडाळू लागला. मध्येच एक खोलीपाशी थांबून तो जरा गोंधळला. कारण एकाही खोलीचे दार लावलेले नसले तरी या खोलीस चक्क कुलूप होते. करर्र......करर्र.....पुन्हा तोच आवाज. आता अर्चितची खात्री पटली कि तो आवाज याच खोलीतून येत आहे. पण या खोलीच्या कुलुपाची चावी मात्र त्याच्याकडे नव्हती.
अचानक वातावरणात कसलातरी बदल व्हायला लागला. अर्चितच्या लक्षात आले कि मेणबत्तीच्या ज्योतीचा रंग लाल झाला आहे. खोलीचे दार सुद्धा लाल होत आहे आणि संपूर्ण वातावरणच लाल होत आहे. अर्चित भयचकित नजरेने आजूबाजूस बघत होता. क्षणात अर्चितच्या डोळ्यापुढे लाल-लाल रंगाची वर्तुळे नाचू लागली. आणि निमिषार्धात अर्चित शुद्ध हरपून खाली कोसळला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अं...हं.........अं...हं.....अं..अं. कण्हतच अर्चितने डोळे उघडले. त्याने उठायचा प्रयत्न केला, पण जणू त्याचे शरीर निर्जीवच झाले होते. हालचाल केलीच जाईना. त्याचबरोबर अर्चितला आपल्या छातीपासून ते पोटापर्यंत कसल्यातरी टोचलेल्या खुणा आणि तेथून टपकणारे रक्त दिसले. तेव्हाच अर्चितला जाणवले कि खोलीत आपण एकटेच नाही आहोत. दुसरेही कोणी आहे. अर्चितने सभोवार एकदा नजर फिरवून पाहिले. तेव्हा त्याला "ती" दिसली. समोर एक विचित्र ओबड-धोबड आकाराची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीस "ती" मंत्रोच्चारण करीत कसल्यातरी द्रवाने अभिषेक करत होती. अर्चितने "ती"स आवाज दिला, "कोण आहे"? "ती"ने मान वळवून अर्चितकडे पाहिले आणि "ती"चा एक लाल आणि एका निळा डोळा पाहताच अर्चितच्या अंगावर क्षणभर शहारा आला. एक छद्मीपणाचे हास्य करीत "ती" परत आपल्या कामात गढून गेली.
झाला प्रकार अर्चितच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तो एका अघोरी प्रकारात अडकला होता. आता यातून आपली सुटका होणे नाही हे त्यास कळून चुकले होते. ५ मिनिटातच तिचे ते मंत्रोच्चारण थांबले आणि 'ती' अर्चितच्या जवळ आली. काही एक न होता त्याच्या हातातील दोरीचे बंध तुटले आणि तो मोकळा झाला.
समोर 'ती' एक लखलखता चाकू घेऊन उभी होती. अर्चित दोरींचे बंध सूटण्यामागील कारण काय ते समजून चुकला होता. झटकन त्याने तीस धक्का दिला आणि समोरील बंद दाराकडे तो गर्रकन वळला. सुदैवाने दार लोटलेलेच होते आणि अर्चित ते झटकन उघडून पायरी उतरून वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला सुद्धा. शेवटी मुख्य प्रवेशद्वार उघडून अर्चित वाड्याच्या मोकळ्या पटांगणात पोहोचला आणि त्यास धक्काच बसला. अनेक गावकरी हातात तळपता सुरा घेऊन लाल डोळ्यांनी अर्चितकडे बघत होते. तो प्रकार बघून अर्चित मनोमन शहारला. आता त्याला गावात एकही देवाचे मंदिर न दिसण्याचे कारण कळून चुकले होते. कारण वाडाच नव्हे तर अख्खे गावच झपाटलेले होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशीच एक प्रसन्न सकाळ. अर्चित आता वाड्याच्या आजूबाजूचा परिसर सकाळपासून स्वच्छ ठेवत होता. पण श्रमाचा कोणताही थकवा त्याच्या चर्येवर नव्हता. जणू काही तो जाणीवेच्या पलीकडे गेला होता. वाड्याच्या देखभालीचा व्यक्तीची कसर अर्चित भरून काढत होता.
पहिलि गोष्ट म्हणजे अनंत काळ
पहिलि गोष्ट म्हणजे अनंत काळ लावला शेवटचा भाग टाकायला आणि जिवावर आलं होतं लिहायला म्हणून लिहिलय असं वाटलं वाचून. भ्रमनिरास!!!!
pudhchya velelaa kramash
pudhchya velelaa kramash lihit jaau nakaa....!!!!!
ekdach kaay te lihaa..... katha changli asun hi velkadhupanaa mule vaayaa geli aahe
गोष्ट संपली कीअजुन आहे तेही
गोष्ट संपली कीअजुन आहे तेही कळेना.. तोही भूत झाला काय शेवटी? का आता आणि कुणी येणार आहे?
फुसका बार
फुसका बार
कथा आवडली, पण फार वेळ
कथा आवडली, पण फार वेळ लावलात.
keep it up. All the Best.....
संपली एकदाची म्हणायची तर !!
संपली एकदाची म्हणायची तर !!
एकदम बेकार शेवट... नाहि आवडला
एकदम बेकार शेवट... नाहि आवडला ....
एकदम बेकार शेवट... नाहि आवडला
एकदम बेकार शेवट... नाहि आवडला + अनुमोदन
आधिचे भाग कुठे आहेत?
अर्चित अडकला आणि कथा संपली.
अर्चित अडकला आणि कथा संपली.
याचा सिक्वेल किंवा प्रिक्वेल येऊ द्या..