पाठलाग- गुढ्कथा

Submitted by विश्वास भागवत on 12 November, 2011 - 00:37

( ही कथा "killer in the backseat या अर्बन लीजेंड वर आधारित आहे)
हेमंतने घड्याळात पाहिले, तब्बल १० वाजत होते. बॉस ला मनातल्या मनात शिव्या देतच तो पार्कींग कडे जाउ लागला.आपली आवडती SX4 फ़ुल्ल स्पीड मधे त्यानं कंपनीबाहेर काढ्ली.

हेमंत, वय २८, अगदी २-३ वर्ष जुन्या या कंपनीत पि. आर मॅनेजर चे काम करत होता. पाच आकडी पगार, स्वत:चा फ्लॅट व अगदी योग्य लग्नाचे वय असल्याने घरचे त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावुन होते. "बेटा, शक्य असल्यास आज घरी ये.", आई चा सकाळीच फ़ोन येवुन गेला होता. नक्किच नविन मुलगी पसंद केली असावी. हेमंत नेहमीच लग्नाचा विषय टाळत असे कारण त्याच्यासाठी लग्नापेक्षा काम महत्वाचे होते.

पण आज त्याच्याजवळ ही भॆट टाळण्यासाठी कोणतेही कारण नव्हते. त्याचे गाव, शहरापासुन फक्त २०० किमी, व गाडीने फक्त ४ तासाच्या अंतरावर असल्यामुळे तो नेहमीच वीकेन्डस ला तिथेच जाणे प्रीफ़र करायचा. शक्यतोवर तो रात्री ऑफिस नंतर ताबड्तोब निघुन १२ वाजेपर्यंत पोहोचुन जायचा. जेणेकरुन त्याला दुसरा दिवस फिरायला व घरच्यांसोबत गप्पा मारायला मोकळा भॆटत असे.

"या बॉसने जर १० पर्यंत थांबवल नसतं तर एव्हाना मी अर्ध्या रस्त्यात असतो.", तो स्वत:शिच वैतागत म्हणाला.

त्याचं आवडती "अजय-अतुल" ची CD मोठ्या आवाजात लावुन, हेमंतने गाडी शहराबाहेर काढ्ली आणि रिकाम्या हाय-वे ला लावली. अचानक जाणिव झाल्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावुन तो लघुशंकेस उतरला.

गाडित परत येवुन त्याने साइड-मिरर मधे आपले केस सावरले आणि पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली.
अचानक त्याच्या मागचा एक ट्र्क जोरजोरात हॉर्न वाजवु लागला. काळा-कभिन्न असलेल्या त्या वॉल्वोच्या ट्रकवर कालभैरवाचं चिन्ह होतं. हेमंतने ट्रक ला साइड दिली पण ट्र्क त्याला ओवर-टेक करण्याऎवजी त्याच्या गाडीजवळ येवु लागला. गडबडुन जाउन हेमंतने आपल्या गाडीचा पण वेग वाढवला. त्यावर ट्रक सुद्धा वेग वाढवुन त्याचा पाठ्लाग करु लागला. "या वॉल्वोच्या आईची..!", हेमंतने शिवी हासडली. ट्रकवाल्याचे इरादे पण काही चांगले दिसत नव्हते. तो हेड-लाइट्स ने अप्पर व डिप्पर देत हेमंत करता गाडी चालवणे कठिण करत होता.

"बहुतेक मी गाडी रस्त्याच्या साइड्ला लावुन द्यायला पाहिजे.. म्हणजे ट्र्क पुढे चालला जाईल. नाही-नाही.. मग तर तो ठोकल्याशिवाय तर राहणारच नाही.", हेमंतच्या डोक्यात वेगाने विचार सुरु होते.
एवढ्यात ट्र्क आणखी आक्रमक झाला होता आणि आता त्याच्यात आणि हेमंत मधे अगदी कमी अंतर राहिले होते.. अचानक ट्र्कने गाडीच्या मागच्या बाजुस धडक दिली. हेमंत ची आता चांगलीच टरकली होती. त्याने कशी-बशी गाडी सावरली आणि पुर्ण जिव लावुन पळवू लागला.
"मी रात्री ड्राइव न करण्याचा बॉसचा सल्ला ऎकायला हवा होता." , हेमंत मनातल्या मनात पश्चाताप करत होता. त्याने गाडी चालवता चालवताच पोलिसांना फोन करण्यासाठी आपला मोबाइल काढ्ला तर तो पण आउट ऑफ कवरेज दाखवत होता.

रस्त्यावरची पहिली सुरक्षित जागा जी हेमंतच्या मनात आठवली ती आणखी ८ किमी दुर होती. एक पेट्रोल पंप, शहरापेक्षा थोडे स्वस्त पडत असल्याने व कार्ड स्विकारणारा एकमेव पंप असल्याने हेमंत नेहमी तिथेच पॆट्रोल भरायचा. दात-ओठ खाउन हेमंतने ऍक्सलेटर वर पाय दाबला. त्याची गाडी सुसाट वेगाने धावु लागली. शेवटी एकदाचा ट्रक थोडासा मागे पड्ला होता. अगदी दिड मिनटामधे हेमंतने गाडी पेट्रोल पंपात आणली.
"आता मी गाडी बाहेर असल्याने तो मला काही करु शकणार नाही आणि या पेट्रोल पंपाच्या बंदिस्त जागेत गाडी ठोकणे पण अशक्य आहे" असा विचार करत अक्षरश: गाडीच्या बाहेर उडी मारत हेमंत तिथल्या म्हातारयावर ओरड्ला, "हजार". आणि मागे नुकसान पाहण्यास वळला.
मोबाइल ला इथे पण कवरेज नव्ह्ते. "इथे लॅन्ड्लाइन आहे?", हेमंतने म्हातारयाला विचारलं. "हो, पण त्याकरता तुम्हाला आत यावे लागेल.", ऑफिस कडे बोट दाखवत म्हातारा गुढ पणे हासत म्हणाला.
ऑफिसकडे जाण्यासाठी हेमंत वळणार एवढ्यात "तोच ट्रक" भयानक वेगात आत घुसला. घाबरुन जाऊन हेमंत ऑफिस कडे पळु लागला. पण तो ट्रक त्याच्या कडे न येता कोपरयात थांबला व त्यातुन एक सरदारजी उडी मारुन बाहेर आला. "अच्छा, तर आता लढाइची वेळ आहे.", हेमंतने मुठी कसल्या. सरदारजी त्याच्याकडे पळत आला आणि ओरडला, "ऒये रब दा शुक्र है, तुम जिंदा हो..!" हेमंत अगदी बावचळुन गेला.
"मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करत होतो, आणि चुकुन तुला धडकलो. मॆणु बता, तुला माहित आहे का की तुझ्या त्या कारच्या मागच्या सिट मधे तो चाकु घेतलेला कोण आहे?", सरदारजी हेमंतला विचारत होता.
__________________________________________________________________
"तर झाले असे असावे की तु जेव्हा गाडीतुन उतरला तेव्हा हा व्यक्ती गाडीत चढला असावा. मी तुझ्या मागे असल्याने जेव्हापण तो तुला इजा करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मला दिसत होता. माझ्या लाइट्स मुळे, हॉर्न मुळे आणि धडकेमुळे तो घाबरला असावा ज्या वेळात तु पेट्रोल पंपापर्यंत पोहोचला. हाहाहा...! वाहे गुरु दि शूक्र.!", सरदारजी, ज्याने आपली ओळख "दारा" म्हणुन करुन दिली होती, हेमंतला म्हणत होता. ते दोघं पेट्रोल पंपाच्या बाजुच्या धाब्यात मस्त चिकनचा आस्वाद घेत होते. चाकुवाल्या इसमाची ओळख त्या रस्त्यावरचा कुख्यात मनोरुग्ण खुनी म्हणुन पोलिसांनी पटवली होती आणि त्याला ताब्यात घेतले होते.

"फिर, अब क्या करनेका इरादा है हेमंत साब.?", दारा विचारत होता.
"मला वाटते मी आता लवकरच लग्न करणार आहे..", हेमंत शांतपणे म्हणाला.
------------------------------------समाप्त-------------------------------------------------

गुलमोहर: 

अशा धर्तीवर एक जेफरी आर्चरची शॉर्ट स्टोरी मी वाचली होती. गोष्टीचे नाव आता आठवत नाही. आठवले की सांगेन. त्यात तो ऐवजी ती होती व सेटअप तिकडचा होता.

अशा धर्तीवर एक जेफरी आर्चरची शॉर्ट स्टोरी मी वाचली होती. गोष्टीचे नाव आता आठवत नाही. आठवले की सांगेन. त्यात तो ऐवजी ती होती व सेटअप तिकडचा होता. >> अगदी खरे आहे. Better luck next time.

हो. मला पण आठवली ती गोष्ट. त्या कथा संग्रहामध्ये बर्याच गोष्टी सत्य कथांवर आधारित होत्या. त्यातलीच हि एक होती बहुतेक. फार छान घेतला होता तो पाठलाग.

विश्वासराव प्रयत्न चांगला आहे पण कथेमध्ये आणखी Twist आणता आली असती.
कथा फुलवता आली असती. कथेमधून काहीतरी बोध मिळायला हवा.
Dont worry, Next time you will do better.

येस्स, मला पण जेफ्री आर्चर ची ती कथा आठवली! त्यात गाडी चालवणारी एक स्त्री अन सिरियल किलर असे होते. सही होती ती कथा !

विश्वासराव,

आठ किलोमीटर दूरचा पेट्रोलपंप दीड मिनिटात गाठला? म्हणजे ३२० किमी प्रतितास वेग होतो. जरा जास्तीच होतोय, नाही?

पण बाकी कथा चांगली आहे. खरंतर याला कथेपेक्षा उमललेले कथाबीज असं म्हणावंसं वाटतं. पुढील लेखनास शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सर्व मित्रांनो, अगदी बरोबर आहे. गुरु जेफ़री(कानाला हात) यांची आणी माझी कथा, दोन्हीपण अमेरिकेच्या urban legends वर based आहे. मी त्यात फ़क्त देसी मसाला टाकण्याचा प्रयत्न केला..! पहिला प्रयत्न आहे... चु.भु.ले.दे.
http://en.wikipedia.org/wiki/Killer_in_the_backseat