संपतरावांच्या घरात आज सकाळपासुनच लगबग चालु होती. त्यांची बायको सुक्ष्मा जातीने प्रत्येक कामात लक्ष घालत होती. तर दोन्ही मुले अमित आणि गणेश नवीन कपडे करुन तयार होते.घरातल्याच देवघरात त्यांची आई नामस्मरणात तल्लीन झाली होती. एकदा का त्यांची पुजा अर्चा संपली की सुक्ष्मा ताई देवाला नैवेद्द्य दाखवणार होत्या व त्यानंतर सारे जण घराबाहेर पडणार होते. निमित्त्त होते त्यांच्या नवीन गुर्हाळाच्या उदघाट्णाचे.
संपतराव एक उमद आणि हसतमुख व्यक्तीमत्व,शिक्षण नॉन मॅट्रिक पर्यंत परंतु ईछा असुनही पुढे प्रयत्न करता आले नाहीत कारण घरची परिस्तिथी बेताचीच.संपतराव त्यांच्या आई-वडीलांचे एकुलते एक अपत्य तेही उशीरा झालेलं.वडील गजानन गिरणगावातच कुठल्याश्या मिलमध्ये काम करायचे, कामात असतानाच त्यांना दम्याचा विकार जडला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. पण संपतरावांची आई सगुनाबाईंनी जराही न डगमगता संपतला लहानाचे मोठे केले.नाही म्हणता हाताशी स्वतःच असं म्हणायला एक वडिलोपर्जित घरच तेवढे होते.थोडीशी जमीन आणि दुभत्या गाई वर्षातुन एकदा भाताच पीक तेही दुसर्याकडुन करुन घ्यायचं.त्यांचा वाटा त्यांना दिल्यानंतर उरेल त्यातल थोड विकायचं आणि बाकीचं कणगीत.जोडीला दुधाचा जोडधंदा होताच.
संपतरावांच गावं मालवण, पण त्यांच घर गाव सोडुन जरा बाहेरच होतं. घर छोटंस पण कौलारु जांभा दगडाच्या घडनीतुन घडलेलं.घरापुढे खळं, बाहेर ओटीवर कुणी पाहुणे अथवा वाटसरु आल्यास बसायला जागा.घरात एकुण चार खोल्या एक स्वयंपाक घर, आतल्या बाजुला देवघर बाहेर ओटीवजा मोकळी जागा आणि डाव्या बाजुला अडगळीची खोली. घराच्या मागच्याच बाजुला गावातल्याच रावांच्या छान नारळी पोकळीच्या बागा ज्या ऍन उन्हाळ्यात सुद्धा थंडगार सावली द्यायच्या न्हानीघरातलं पाणी जिथुन बाहेर पडायचं तिथे सगुनाबाईंनी केळी लावल्या होत्या.त्याही छान टवटवलेल्या दिसत होत्या.घराच्या दर्शनी भागातच आंब्याचे आठ-दहा डेरेदार व्रुक्ष होते, जे गजानन रावांनी आपल्या हाताने लावले होते.सगुनाबाईंना कधी कातरवेळी त्यांची आठवंण आली की त्या एकट्याच बाहेर ओटीवर बसुन त्या झाडांकडे बघत बसत.
ह्या सर्व गोष्टींवरुन एक बाब मात्र स्पष्ट होते की मानसाने कितीही महागातले गार्डनिंग आणि लॅंन्डस्केपिंग केल तरी ह्या नैसर्गिक देखाव्याला तोड नाही. अगदी संपतरावांचच नाही तर कोकणातल्या प्रत्येक घराचीच स्वताचीच अशी एक ठेवण आहे. अगदी साध्यातल साध जोत्याच घर सुद्धा ह्या स्रुष्टी सौंदर्यामुळे खुलुन निघतं. बहुतेक म्हणुनच कोकणी मानुस शरीराने जरी इतरत्र कामासाठी गेला असेल तरी त्याचं मन मात्र सदैव गावाकडच्या घरातच घुटमळत असतं.आजही चाकरंमानी मानसाने कॅलेंडर घेतल की तो पहीला शिमगा आणि गणपती कोणत्या तारखेला आहे ते बघतो .
संपतराव दाराशी असेच उभे राहुन एक एक प्रसंग आठवत होते.वडील गेल्यानंतर झालेली परवड तसे ते जेमतेम सात-आठ वर्षांचेच होते पण एवढ मात्र कळत होतं की बाप म्हणजे घरचा कर्ता तो नसेल तर व्रुक्ष उन्मळुन पडल्यानंतर पाखरांची जशी अवस्था होते तशीच काहीशी त्यांची आणि त्यांच्या आईची झाली होती.
परंतु तशाही परिस्तिथीत त्यांच्या आईने न डगमगता कंवर कसली आणि झेपेल त्याप्रमाने संपतरावांना लहानाचं मोठं केलं संपतरावांनीही न कुरबुरता जमेल तशी आईला साथ दिली. कधी कुणाच्या शेतात काम कर, सकाळी गावात दुध टाकायला जा, नदीवरचे मासे पकडुन बाजारात नेऊन विक, सुट्टीत जेव्हा इतर मुले मजा करत तेव्हा संपतराव मात्र गोवा हायवेवर हॉटेल मध्ये काम करतं. असं करता-करता दहावी पर्यंत शिक्षण परंतु दहावीत नापास झाल्यानंतर इच्छा असुनही मनाला मुरड घालुन त्यांनी ठरवलं आता मुंबईला जायच आणि मिळेल ती नोकरी पत्करायची ज्यानेकरुन हातात चार पैसे जास्त खेळतील व आपल्या मागचं हे शुक्लकाष्ठ तरी सुटेल.
गावातल्याच कुल दैवतेचे दर्शन घेऊन आईला त्यांनी आपला हा विचार सांगितला. त्यांना वाटल ती विरोध करेल? आणि ते ही रास्तच होते कारण आता उतार वयात संपतरावच तिचा आधार होते.पण सगुनावाई भलत्याच करारी निघाल्या त्यांनी लगेचच त्यांना जाण्यास होकार दिला व प्रेमळ दमही भरला, “ हे बघ संपत तुका जाऊचा असा ना तर खुशाल जा पण शिमग्यात नी गणपतीस गावास नेमाणं येउचा असा, गावच्या जागेवाल्यास नी कुलदैवतास नारळ ह्यो घरच्या कर्त्या पुरुषानेच दुऊक व्हया समजलं” त्यात तुझ बस्तान बैसुन दोनाचे चार झाले की मी म्हातारी मरायास मोकळी.
आईच्या अशा बोलण्यावर त्यांनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. दोघा माय-लेकरांचे अंतःकरण भरुन आले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल बस्ताण पणवेल मधल्या आपल्या शाळेतल्या मित्राकडे हलवले. तो तळोजाला एका फॅक्ट्रीत कामाला होता. त्याच्या ओळखीनेच त्यांना तिथे स्टोकर कीपरची नोकरी मिळाली. त्याचदरम्यान सगुणाबाईंणी संपतरावांचे दोनाचे चार हात केले. आता त्यांना जरास हायसं वाटत होतं कारण गावाकडे आईला सोबत मिळाली होती.
सुक्ष्माताई संपतरावाची बायको पोरसवदा असतानाच त्यांच्या घरात माप ओलांडुन आल्या. मोट्या कुटुंबात राहण्याची सवय असुन सुध्धा त्यांनी व्यवस्तिथरीत्या आपल्या सासुबाईंना सांभाळुन घेतलं त्यात संपतरावसुध्धा हफ्ता पंधरवद्यातुन गावी येऊन जाऊन होते. कामातील नैपुनतेमुळे त्यांनी फॅक्ट्री मॅनेजरची मर्जी संपादन केली होती. त्यामुळे गणपती, शिमगा आणि उन्हाळ्यात मोठ्या सुट्टीत येणं जाण चालुच होतं. पगारही आता पुर्वीपेक्षा बरा होता. एकंदर काय तर संपतरावांची गाडी हळुहळु रुळावर येत होती.तीन एक वर्षांच्या अंतराने त्यांना दोन पुत्र रत्नांचा लाभ झाला. मोठा अमित आणि धाकटा गणेश दरम्यानच्या काळात सगुना बाईंची दुरद्रुष्टी म्हणा किंवा काहीही त्यांनी आपली अर्धी भात जमीन विकली आणि रस्त्यालगत गोवा महामार्गावर एक छोटी जागा विकत घेतली. संपतरावांनी त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्या गंमतीशीररित्या म्हणाल्या अरे “वर्षातुन एकदाच भाताच पीक नी त्यातल पण अर्ध वीक” अर्ध करणारयास जे काही थोड उरतं त्यात एकास दोन कण ग्या भरतात मग विचार केला. रस्त्यालगत एखादी जागा असल्यास पुढे मागं एखादा जोड धंदा तरी करुक व्हया.………त्यावेळचे ते शब्द आई जणु काही आत्ताच बोलत आहे असा भास संपतरावांना झाला. इतक्यात बायकोच्या आवाजाने त्यांची तंद्री तुटली.
“अहो, एकलत का आईंची पुजा संपली आहे मी देवाला लगेचच नैवद्य दाखवुन घेते.राम भाओजी सुध्धा बाहेर तुमची वाट बघत थांबलेत, त्यांना सांगा एक दहा-पंधरा मिनिटातच आपण निघु.
राम उर्फ रामराव संपतरावांचे लहानपणापासुनचे मित्र गावातच त्यांच घर होते.वास्तविक संपतरावांच बस्तान बसवन्यात त्यांचाही वाटा मोठा होता.कारण त्यांनीच संपतरावांना कंपणीत कामाला आणि आपल्यासोवत राहण्याची व्यवस्था केली होती त्यामुळे संपतरावांच्यालेखी ते वडील भावाप्रमाणेच होते.परंतु नियतीच्या मनात मात्र काही ऑरच असतं काही महिन्यांपुर्वीच संपतरावांच्या कंपणीला टाळं लागलं.फॅक्ट्री मालकाने कर चुकवल्यामुळे आयकर विभागाने धाड टाकुन ही कारवाई केली होती. अचानक उदभवलेल्या ह्या समस्येमुळे दोघांवरही बेकारीची कुरहाड कोसळली होती. तसं रामरावांना घाबरण्याचं कारण नव्हते गावात त्यांचे किराणा मालाचे दुकाण होते. जे त्यांचा बारका भाऊ आणि वडील सांभा ळत वयोमानापरत्वे वडिलांनाही आता जमत नसल्यामुळे त्यांनी रामरावांना गावी येण्यास विणवले रामरावांनीही विचार केला आता इथे राहुन दुसरी नोकरी शोधण्यापेक्षा गावी जाऊन दुकान सांभाळत बायका मुलांसह शांत जीवण तरी व्यथीत करता येईल. त्यात त्यांचा बारका भाऊ ऊजव्या डोळ्याने जरासा अधु असल्यामुळे त्याच्या लग्नाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती.लागलीच त्यांनी संपतरावांना आपला विचार बोलुन दाखवला.
संपतरावांनाही ते योग्यच वाटलं त्यांनीही पुन्हा गावी जाण्याचा विचार केला. नाहीतरी आईने रोडलगत छोटीशी जागा घेउन ठेवली होतीच. बघुया काही करता आलं तर, तसं लहाणपणी हॉटेलात काम केल्याचा थोडाफार अनुभव होताच . घरी परतल्यानंतर सुक्ष्माताई आणि मुलांच्या तोंडावर आनंद ओसांडुन वाहत होता. सर्वांना संपतरावांचे नोकरी सुटण्याच्या दुःखापेक्षा त्यांचा कायमचा सहवास मिळणार ह्याचाच आनंद जास्त होता.
सुक्ष्माताईंनीच नंतर त्यांना सल्ला दिला, "हे बघा, आपण जी जागा घेतलीये ना तिथे जर एखादं उसांच गुर्हाळ आणि जोडीला चहा-फराळाच्या चीज वस्तु ठेवल्या तर बर्यापैकी धंदा होईल कारण गोवा महामार्गावर गाड्यांची बरयापैकी रेलचेल असते. त्यात पावसाचे चार-पाच महीने सोडले की वर्षभर वातावरण दमटच उकाड्याने त्रस्त प्रवाशांना थंडगार ऊसाचा रस आणि जोडीला अस्सल घरगुती चवीचे पदार्थ मिळाले तर त्यांची क्षुधा आणि भुक भागवल्याचे पुण्यही मिळेल आणि चार पैसेही कमावता येतील.संपतरावांना बायकोची ही क्लुप्ती मनापासुन आवडली. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसु लागली काहीतरी करुन दाखवण्याची. लागलीच त्यांनी गावातीलच पतपेढीतुन कर्ज घेतले आणि जागेची आधी व्यवस्तीथ बांधनी करुण घेतली.
बाकडे, टेबल,खुर्ची, ग्लास प्लेट, चमचे ते अगदी किचण पर्यंत त्यांनी जातीने लक्ष घालुन घेतलं आता राहील होतं ते फक्त गुर्हाळ जे त्यांनी चिपळुनमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडुन खरेदी केलं, तसं ते जुनच होतं परंतु व्यवस्थित वंगण वैगरे केल्यावर ते चाललं असतं तशात नवीन गुर्हाळावर सध्यातरी पैसे खर्च करणे त्यांना शक्य नव्हतं.
संपतराव कपडे करुन बाहेरच्या खोलीत आले. रामराव आपल्या बायका मुलांसह तिथे उपस्तिथ होते. सासुर वाडीतुन त्यांचा मेहुना श्याम सुध्धा आला होता.तोही भाच्यांच्या कंपनीत खुष दिसत होता.इतक्यात सुक्ष्माताई सगुणाबाईंना घेउन आल्या. सुक्ष्माताईंनी आज ठेवणीतली साडी नेसली होती ज्यामु ळे त्या जास्तच आर्कषक दिसत होत्या.तर सगुणाबाईनी कॉटनची साधी पण शुभ्र नऊवारी नेसली होती. वयाने जरी त्या थकल्या असल्या तरी चेहरयावर विलक्षण तेज दिसत होते. सर्वांना घेऊण संपतराव गुर्हाळाच्या जागेवर रवाना झाले.
तिथे पोहचताच सुक्ष्माताईंनी छान सडा मार्जन करुन घेतले. रामरावांच्या बायकोने त्यावर छान रांगोळी काढली .ऊसाचा रस काढण्याचे काम संपतराव स्वतः करणार होते तर बाकीच्या खानपानासाठी त्यांनी गावातलाच आचारी ठेवला होता.सर्व सामानांच आणि गुर्हाळाचे ऑक्षण वैगरे झाल्यानंतर संपतरावांनी गुर्हाळाचा स्वीच ऑन केला.चाकं फिरताक्षनी गुर्हाळाला लावलेल्या घुंगरांचा नादमय आवाज त्या प्रसन्न वातावरणात खुळखुळु लागला. जोडीलाच सुक्ष्माताईंनी छान धुपाची कांडी लावल्यामुळे सारं वातावरण सात्विक झाले होते.संपतरावांनी सर्वांना बसण्यास सांगुन हॉटेलातल्या पोरयाला त्यांच्या फराळाची व्यवस्था करण्यास सांगितले. व स्वतः सर्वांना म्हणाले आज मी स्वतः तुम्हा सर्वांना ऊसाचा रस पाजणार तोही मोफत, हा पण उद्या पासुन मात्र पैसे लागतील त्यांनी सुक्ष्माताईकडे पाहुन डोळा मारला, तशा खेळेमेळीच्या वातावरणातही सुक्ष्माताईंना आपली लाज आवरता आली नाही आणि तुमच आपल काहीतरीच म्हणत त्या आचारीला मदत करायला आतमध्ये गेल्या.
बाहेरच्या ऊसाच्या मोळीतुन संपतरावांनी दोन छान कळके ऊस काढले व दोन्ही हातांनी गुर्हाळात घातले. ऊसाच्या आत जाताक्षणी खाली पातेल्यात ताजा रस जमा होऊ लागला. अमित आणि गणेश रामरावांच्या मुलांसह गुर्हाळातुन निघणार्या रसाकडे गमतीशीरीत्या बघत होते. संपतरावसुध्धा छानपैकी ऊसाची चिपडे वळुन पिळुन गुर्हाळात घालत होते. त्यांची हि क्रिया चालु असतानाच अचानक घुंगरांचा विचत्र गचके खाण्याचा आवाज आला आणि गुर्हाळ बंद पडले. सुक्ष्माताई आतुनच म्हणाल्या. "अहो, लाईट गेली वाटतं. इतक्यात श्यामने हातानेच भाओजींना तिथे थांबण्यास सांगुण तो बाहेर डी.पी जवळ गेला. संपतराव हातानेच उसाचे अडकलेले चिपाड काढण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात डीपीतल्या ज्या वायरमुळे लाईट गेली होती . ती श्यामने काढुन पुन्हा दाबुन बसवली त्याने मेन स्वीच ऑन करताक्षणी एक मोठी किंकाळी त्या परिसरात घुमली . ती किंकाळी होती संपतरावाची श्यामने स्वीच ऑन करताक्षणी गुर्हाळ चालु झाले होते आणि संपतरावांचा उजवा हात त्यात सापडला होता. गुर्हाळाच्या खाली ठेवलेलं पातेल आता रक्ताने भरल होतं………………..
कथा छान आहे, पण वेगळी नाही
कथा छान आहे, पण वेगळी नाही वाटत.
काहिशी प्रेडिक्टेबल वाटते.
रटाळ
रटाळ
(No subject)
अगर एखाद्या गोष्टी विषयी
अगर एखाद्या गोष्टी विषयी चांगल लिहिता येत नसेल तर निदान वाईटही लिहु नये.
मि. खेडेकर कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळ दिसतं.
त्याचप्रमाणे ज्यांचे स्वताचे आयुष्य रटाळ आहे ते त्यांची टिप्पणी ही तेवढीच " रटाळ " असणार असो.
निंदकाचे घर असावे शेजारी.
वाचकांच्या माहितीसाठी ही एक
वाचकांच्या माहितीसाठी ही एक सत्य कथा आहे. जी थोडीशी वेगळ्या ढंगाने सादर करण्यात आलेली आहे.
आवडली!
आवडली!
श्रीमत वाचकांनी कश्या
श्रीमत
वाचकांनी कश्या प्रतिक्रिया द्यावात हे लेखकाने ठरवु नये आणि वाचकांनी जरी निगेटीव्ह प्रतिक्रिया दिल्या तरीही लेखकाने त्याचा आदर करावा हे चांगल्या लेखकाचे लक्षण असते. या मताचा मी आहे,
असो.
प्रयत्न ठिक आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कथाबीज फक्त एकाच ओळीचे आहे जे शेवटच्या ओळीत सुरू होते आणि संपते, पण त्यासाठी तयार केलेले एव्हढे मोठे कथानक कुठेच क्षणभरही पकड घेत नाही, त्यामुळे अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. एव्हढे मनावर घेऊ नका.
पु.ले.शु.
कथे बद्द्ल : कोकणात संपतराव व
कथे बद्द्ल :
कोकणात संपतराव व सगुणाबाई हि नावे ?
कथा ४/५ परिच्छेदात सम्पवता आलि असति.
पु.ले.शु
prafullashimpi + १ अविनाश
prafullashimpi + १
अविनाश खेडकर + १
प्रतिक्रीयेवरिल
प्रतिक्रीयेवरिल प्रतिक्रियेबद्ल ध्न्य्ववाद.
सर्व वाचकांचे मनापासुन
सर्व वाचकांचे मनापासुन आभार,
सुन्या* १+१ = २
अविनाशराव , कथा छान आहे पण
अविनाशराव , कथा छान आहे पण शेवट गोड झाला असता तर अजुन छान वाटले असते.
श्रीमत राव ,कथा चांगली आहे,,
श्रीमत राव ,कथा चांगली आहे,, पण वर सांगितल्याप्रमाणे मांडणी अजून प्रभावीपणे होऊ शकली असती
"ण" आणि "न" च्या चुका शक्य असल्यास [आणि आवश्यक वाटल्यास ] दुरुस्त कराव्यात
कोकणाचे बाकी वर्णन ठीक आहे ,परंतु नावे घाटावरील आहेत
मी कोकणातीलच आहे म्हणून म्हणतो !!!
कथा सुखांत असती तर बरे झाले असते !
पुढील लेखनास शुभेच्छा !
वाचकांच्या माहितीसाठी ही एक
वाचकांच्या माहितीसाठी ही एक सत्य कथा आहे.
सत्य असेल तर खरेच भयानक आहे असे उसाच्या चरख्यात हात जाने..
शेवट वाचुन वाईट वाटले खुप.
शेवट वाचुन वाईट वाटले खुप. आणि सत्य कथा आहे हे वाचुन तर खुपच वाईट वाटले.
छान प्रयत्न
सर्व वाचकांचे मनापासुन
सर्व वाचकांचे मनापासुन आभार.
तसं पाहायला गेलं तर हि कथा लिहिली तेव्हाच मला तिखट प्रतिक्रियांची अपेक्षा होती. (कारण मनात जसं येत गेल तस प्रामाणिकपणे लिहित गेलो.)
आणि ह्या कथेबद्द्ल सांगायच तर आधी सांगितल्याप्रमाणेच ही एक सत्य कथा आहे, दोन अडीच वर्षांपुर्वी मी माझ्या कुटुंबाबरोबर कोकणात फिरायला गेलो होतो. तेव्हा दुपारी उकाड्याचा जास्तच त्रास होऊ लागल्यामुळे क्षुधा शमवण्यासाठी नागोठण्याचा पुढे हायवे (एन.एच १७) लगत आम्ही रसवंती ग्रुह बघुन गाडी थांबवली.जास्त ऊन असल्यामुळे आई बाबांना गाडीतच बसण्यास सांगुन मी स्वत: रस आणण्यास तेथे गेलो आणि समोरच द्रुश्य पाहुन चकित झालो. एक व्यक्ती जिचा ऊजवा हात मनगटापासुन खाली काढला होता. डाव्या हातानेच ऊस चरख्यात टाकुन त्याच हाताने चिपाड बाहेर काढत होती. आणि बाजुलाच त्यांची अर्धांगिनी ग्लास भरण्यात त्यांना मदत करत होती. मी सहजच शंकानिरसणासाठी त्यांना विचारल असता त्यांनी सांगितल की ज्या दिवशी हे रसवंतीग्रुह चालु केलं त्याच दिवशी ह्या चरख्यात त्यांचा हात अडकला होता म्हणुन. नुसत्या कल्पनेनेच ऐन उन्हाळ्यात मी गार पडलो. बस्स पुर्ण दोन दिवस तोच विषय डोक्यात घोळत होता. मला मनापासुन त्यांच्या जिद्दिचे कौतुक वाटले. अन्यथा पहिल्याच दिवशी असे काहि झाले म्हणुन एखाद्याने अपशकुन समजुन तो धंदाच बंद केला असता. पण त्यांनी तस काहीही न करता नव्या उमेदिने आज ते त्या रसवंती ग्रुहात उभे आहेत. आणि अर्थात त्यांच्या अर्धांगिनीची साथही तितकिच मोलाची आहे. म्हणुनच कदाचित तो रस जास्त गोड लागला असावा.........................!
@ मंदार- तुमच्या निरिक्षणाबद्दल धन्यवाद, मी स्वतः घाटावरचा ९६ कुळी घाटी असल्यामुळे ही नाव कथेत घेण्याचा मोह झाला असावा. पण रत्नागिरीत काही ठिकाणी रावांच्या वाड्या आहेत.(संदर्भ- नेर्ले, तालुका- पाचल)
@"आमचा" अभिषेक - धन्यवाद
मला मनापासुन त्यांच्या
मला मनापासुन त्यांच्या जिद्दिचे कौतुक वाटले. अन्यथा पहिल्याच दिवशी असे काहि झाले म्हणुन एखाद्याने अपशकुन समजुन तो धंदाच बंद केला असता. पण त्यांनी तस काहीही न करता नव्या उमेदिने आज ते त्या रसवंती ग्रुहात उभे आहेत. आणि अर्थात त्यांच्या अर्धांगिनीची साथही तितकिच मोलाची आहे. म्हणुनच कदाचित तो रस जास्त गोड लागला असावा.........................!
>>>>>>>>>>>>>>>>>>
आपली कथा या धाग्याला धरून गुंफली असती तर आणखी बहारदार झाली असती..