मुंबईवर एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि हे आपल्या मुंबईवरच नाही तर या देशावरच एक नक्कीच मोठ्ठ संकट आहे, या घटनेबद्दल माझ्या मनात या देशाचा नागरिक म्हणून एक चीड, संताप व्यक्त होतोय त्यातुन जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडत आहे, त्यात दरवेळी बहुतेक अनेक आपल्यासारखे सामान्य,चाकरमनी, व्यापारी लोकच हकनाक, बेमौत मरताना दिसतात, अशा घटनेत आपला जीव जाणं म्हणजे खुप अमानुषपणे मारलं जाणं, आपल्या डोळ्यांसमोर स्व:ताच्या शरीराच्या चिंधड्या उडत, तेही आपली काहीही एक चुक नसताना ! त्यात मॄत्युमुखी पडलेल्या बहुतेकांनी आयुष्यात इतरांना विनाकारण कधीही त्रास दिला नसेल, म्हणजे गावाकडच्या भाषेत 'कुणाच्या वाळल्या पाल्यावरही पाय दिला नसेल', त्यातल्या अनेकांनी कुणाला साधी गालावर चापटीही मारली नसेल, कुठला खोटेपणा, अप्रामाणिकपणा केला नसेल, बहुतेकांनी कुठलही वाईट काम केल नसेल, तर या सगळ्यांचा या यात नेत गुन्हा तो काय ? त्यांना अशी आणि ही इतकी मोट्ठी, क्रुर शिक्षा का मिळत असेल किंवा देव का बरं ती देत असेल ?
त्यात जखमी झालेल्या शेकडो लोकांना आयुष्यभर अशा अनेक भयानक वेदना, जखमा, अपंगत्व घेऊन जगाव लागतं, आता आणखी काही लोकांची त्यात भर पडेल, त्यातल्या अनेकांच कौटुंबिक जीवन तर यापुढे भयानक असेल, आर्थिक परिस्थिती बिघडुन जात असेल, सगळ्यां स्वप्नांचा एका क्षणात चुराडा होत असेल, हे कुणालाही सहन होणार नाही
कल्पना करा ही वेळ उद्या आपल्यावर आली तर ? उद्या कदाचित आपण, आपले कुटूंबिय, नातेवाईक, कुणी मित्र,शेजारी, सोसायटीतले, आपल्या गल्लीतले, सहकर्मचारी, ओळखीचे यातल कुणीची असु शकतं,याची मानसिक तयारी बहुतेक मुंबईकरांनी नक्कीच केली असेल, आज जरी वाचलो असलो तरी आपला नंबर कधीही येऊ शकतो, कारण असा स्फोट कुठेही कधीही होऊ शकतो, आपलीही अशीच याहुन भयानक अवस्था होऊ शकते, ही शक्यता नाकारता येणार नाही, हे कुणालाही मान्य असेल, दुसरी आणखी संतापाची बाब म्हणजे यात कधीही कुणी मंत्री/नेते,सरकारी अधिकारी/बाबु मेल्याच उदाहरण नाही, अगदी एखादच.
मग मी एक नागरिक म्हणुन असा विचार करतो की मुंबईत राहत असलेल्या १ कोटीच्या वर असलेल्या लोकांच्या मनात सध्या या घटनेबद्दल खुप वाईट वाटत असेल, शासनाबद्दल असंतोष खुप खदखदत असेल, याला जबाबदार असणार्या नव्या-जुन्या गुन्हेगारांना शिक्षा लवकर व्हावी असे नक्कीच वाटत असेल, पुन्हा हे घडु नये किंवा यबाबत कठोर नियम केले जावेत असेही वाटत असेल.त्यांच्याकडुन, सगळ्या देशवासीयांकडुन इतर अनेक मार्गांनी या घटनेचा धिक्कार केला जात आहे, निषेध नोंदवला जात आहेच, पण मला वाटतं आता लोकांनी यापुढे जाऊन या यामधले किमान २०-२५% लोक थोडा वेळ काढुन, वैयक्तिक नुकसान सहन करुन, आपली सगळी वयक्तिक कामे एक दिवस बाजुला ठेवून, म्हणजे किमान २०-२५ लाख लोक निदान एक दिवस तरी न्यायासाठी, बदल घडवुन आणण्यासाठी आपणहुन,जनशक्तीच्या रुपाने रस्त्यावर का उतरत नाहीत ? मंत्रालयाला घेराव का घातला जात नाही ? या राजकारण्यांना या पद्धतीने जाब का विचारला जात नाही ? हे आता व्हायलाच हवं अस मला प्रामाणिकपणे वाटतं. (मी नक्कीच एक दिवस देण्यासाठी तयार आहे,कारण ती माझी गरज आहे)
कारण याबद्दल वर्तमानपत्रात तेच ते छापुन किंवा घरात/गल्लीत/रस्त्यात्/कार्यालयात चर्चा करुन, मेडियाकडुन, फेसबुक, ट्विटवर या पद्धतीने (मवाळ पद्धतीने) निषेध करुन आता काही फरक पडेल अशी परिस्थिती आहे अस वाटतं नाही, कारण सरकारची, सरकारमध्यल्या लोकांची कातडी गेंड्यासारखी झाली आहे असं अनेकजण म्हणतात, त्यांना निषेध करणे, उपोषण करुन किती साध्य होणार आहे,( होत आहे हे दिसतयं) प्रत्येकवेळी घरी बसुन न्यायाची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे ? यासाठी एक तरी अशा प्रकारच आंदोलन (मेणबत्ती आंदोलन नाही) कराव लागेल, नव्या क्रांतीची झलक म्हणुन, जगालाही दाखवुन द्याव लागेल, अनेकांनी म्हंटल्याप्रमाणे आम्ही षंढ नाही हेदेखील एकदा दाखवाव लागेल, नव्हे ही काळाची गरज आहे, कारण लाथों के भुत बातोंसे नहीं मानते ! आजी मेल्याच दु:ख नाही पण काळ सोकावतो असं यासाठीच म्हणतात, तुम्हाला यापुढे गृहित धरल जाईल कि हा मुंबईकर काही वेगळं अस करणारच नाही, आणि जर हे होत नसेल तर याचा अर्थ १०० तले फक्त २०-२५% लोकही, काही प्रश्न पडतात,
१.एका चांगल्या कामासाठी, प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी एकत्र येऊ शकत नाहीत हे स्पष्ट होईल किंवा हा प्रश्न इतका गंभीर नक्कीच नाही हे स्पष्ट होत नाही का ?
२.मग आपल्याला जर एवढंही करणं जमत नसेल तर आपण दुसर्यांकडुन जास्त अपेक्षा करतो अस वाटतं नाही का ?
३.ही खुप मोट्ठी किंवा अशक्य, अवघड गोष्ट आहे अस तुम्हाला वाटतं का ?
४.इतका साधा त्याग,धाडस आपण करु शकत नसु तर ही आपली कमजोरी म्हणता येईल का ?
५.या विषयावर इथल्या लोकांच किमान एकमत नाही हेच दिसुन येत नाही का ?
असं जनआंदोलन मुंबईमध्ये कधीच न होणं ही माझ्या मते ही मोठ्ठी शोकांतिका आहे अस मला तरी याक्षणी वाटतं, आजही देशातल्या एखाद्या गावात अनुचित घटना घडली तर अख्खा गाव ( ८०-९०% लोक) एक होतो आणि मग असे बलाढ्य शत्रु/गुन्हेगार्/अपप्रवृत्तींना सडेतोड उत्तर मिळताना, अशा लोकांना धडा शिकवताना आपण पाहतो, (शेवटी 'गाव करील ते राव काय करील' अशी एक म्हण आहे) , इथे हा संदर्भ देण्याच कारण की त्या गावातले बहुतेक लोक एकत्र येण्याबद्दल आहे, मुंबई जरी खुप मोट्ठी आहे हे मान्य, त्याचा आवाकाही खुप मोठ्ठा आहे पण संपर्क यंत्रणा तर खुप आधुनिक आहेच, इथे जरी आतंकवादी खुप ताकदवान असले तरी निदान याद्वारे त्यांना, या व्यवस्थेला आपण एक संदेश देऊ शकतो, संघटितपणे प्रतिकार म्हणुन निदान सरकारला लवकर कारवाई साठी भाग पाडु शकतो, निदान या बहुतेक मस्तवाल राजकारण्यांना जनशक्तीची ताकत दाखवुन त्यांच्या उरात धडकी तरी भरवु शकतो, इशारा देवु शकतो, विचार करायला लावु शकतो, सुस्तावलेल्या, गंज चढत चाललेल्या, भ्रष्ट होत चाललेल्या यंत्रणेला निदान हादरे देऊ शकतो,याला इतर अनेक मार्ग असतीलही पण माझ्या मते हा मार्ग अवलंबण्याची सध्या जास्त गरज आहे, यातुन नक्कीच चांगला बदलही घडेल अस मला मनापासुन वाटतं.
कारण याच जनशक्तीमुळे केवळ देशातच नाही तर संपुर्ण जगात आजवर अनेक चमत्कार झालेले आहेत, आजही होताना दिसतात.
हे विचार काही लोकांना जहाल किंवा अतिरेकी वाटतील पण हा विषय देखील तसाच आहे आणि तितकाच गंभीर तर आहेच..
<<लोकांनी यापुढे जाऊन या
<<लोकांनी यापुढे जाऊन या यामधले किमान २०-२५% लोक थोडा वेळ काढुन, वैयक्तिक नुकसान सहन करुन, आपली सगळी वयक्तिक कामे एक दिवस बाजुला ठेवून, म्हणजे किमान २०-२५ लाख लोक निदान एक दिवस तरी न्यायासाठी, बदल घडवुन आणण्यासाठी आपणहुन,जनशक्तीच्या रुपाने रस्त्यावर का उतरत नाहीत ? मंत्रालयाला घेराव का घातला जात नाही ? या राजकारण्यांना या पद्धतीने जाब का विचारला जात नाही ? हे आता व्हायलाच हवं अस मला प्रामाणिकपणे वाटतं. (मी नक्कीच एक दिवस देण्यासाठी तयार आहे,कारण ती माझी गरज आहे)>>
ही गरज सर्वांचीच आहे.............
ही गरज सर्वांचीच
ही गरज सर्वांचीच आहे.............>>>> १००% अनुमोदन.
माझी पण गरज आहे आणि तयारी आहे.
उमेशजी,आबासाहेब, प्रतिसादाबद्
उमेशजी,आबासाहेब,
प्रतिसादाबद्दल,तुमच्या अनुमोदनाबद्दल धन्यवाद !
आंदोलन उभे राहीले पाहीजे,
आंदोलन उभे राहीले पाहीजे, नुसत्या मानवी साखळ्या, किंवा मेणबत्त्या पेटविण्यात अर्थ नाही
आंदोलन उभे राहीले पाहीजे,
आंदोलन उभे राहीले पाहीजे, नुसत्या मानवी साखळ्या, किंवा मेणबत्त्या पेटविण्यात अर्थ नाही >>>
बदल घडवुन आणण्यासाठी आपणहुन,जनशक्तीच्या रुपाने रस्त्यावर का उतरत नाहीत ? मंत्रालयाला घेराव का घातला जात नाही ? या राजकारण्यांना या पद्धतीने जाब का विचारला जात नाही ? हे आता व्हायलाच हवं >>>
अनुमोदन. आणि म्हणूनच इथे त्या मी काय करू शकतो बाफवर आपणच असे आंदोलन उभे करू असे लिहिले. एक दोन लोक सोडता प्रत्येकाला चर्चा करण्यात जास्त रस आहे असे दिसते.
एक दोन लोक सोडता प्रत्येकाला
एक दोन लोक सोडता प्रत्येकाला चर्चा करण्यात जास्त रस आहे असे दिसते.
सहमत
जनआंदोलनासाठी करिष्मा असलेला
जनआंदोलनासाठी करिष्मा असलेला अथवा जनमानसात आदराची भावना असलेला नेता असावा लागतो. सध्या अण्णा आहेत तसं..
किंवा मग संघटीत प्रयत्नाने आंदोलन उभारता येऊ शकते. ही एक किचकट प्रोसेस आहे. अर्थात इथंही नेतृत्वगुणांची कसोटी लागतेच. अशा संघटीत प्रयत्नातून नवं नेतृत्व मिळतं.
दुसरा पर्याय जास्त कमिटेड असतो. पण दुर्दैवाने लोक्स करिष्म्याच्याच मागे जाताना दिसतात. म्हणूनच जनतेच्या प्रश्नावर आंदोलन कधीच होत नाही
आनिल, आपले स्वःतावर नियंत्रण
आनिल, आपले स्वःतावर नियंत्रण असु सकते दुसर्यांवर नाही. तेव्हा आपण काय करु शकतो हे ठरवणे सोपे; लोकांनी काय करायला पाहिजे हे ठरवणे कठिण. म्हणजे, सुरवात आपल्या पासुन करावी. ती इतकी भक्कम असावी कि लोक आपोआप तुमच्या मागे यायला लागतात.
कर सुरवात अनिल. चार पाच जणांचा ग्रुप बनव. मग रुपरेखा बनवा. काही चांगले होत आहे असे दिसले कि लोकं येउन मिळतील तुम्हाला. पण खुप चिकाटी लागते. एक छोटीशी चुक होत्याच नव्हतं करते.
परत मला असेच वाटते जर आपल्या
परत मला असेच वाटते जर आपल्या देशाता जाती राहील्याच नाहीत तर हे प्रश्न पण येणार नाहीत. मानव हा समुहाने राहणारा प्राणी आहे. तो आपला समुह कसा बनवतो या वर सगळे depend असते. जर भारतात राहणारे सगळे फक्त भारतीयच असले तर कुणाचेच हिंमत नाही होणार भारतावर हल्ला करण्याची.
मुबंई च्या स्फोटाच्या दिवशीच hydrabad मधे होते, चार मीनारला. वातावरण तंग होते. एका, मुस्लीम माणसाने मुद्दाम एका पायी जाणार्या हिंदु माणसाला पाडले आणी, two wheeler मुद्दाम त्याचा अंगावरुन नेत होता. त्या मुस्लीम माणसाचा agressive ness, त्याच्या डोळ्यातला हिंस्त्रपणा, त्या हिंदुमाणसाच्या डोळ्यातले ते गरीब बिचारे भाव मी नाही विसरु श़कणार. नंतर थोडे पुढे गेले तर एका हिंदु मुलाला काही मुस्लीम मुले उगीचच त्रास देत होते. त्याही वेळेला तेच , मला कळेना काय झाले आहे ते. मी पुढे होउन वातावरण deflate केले. त्या मुलांना उगीचच रागवले. मग TV पाहीला तर मुंबई ची news दिसली.
खरच का असे व्हावे ? कारण आजही आपण हा हिंदु हा मुस्लीम असेच ओळखतो एकमेकांना. पण world cup च्या वेळेला आपण होतो फक्त भारतीय.
मग तसेच आपण सगळ्या वेळेला का नाही फक्त भारतीय राहु शकत ? जर सचीन एका वर्षा सथी आपल्याला भरतीय बनवु शकतो तर नेहमी साठी का नाही ? जर आपण सगळ्यांनी हे जात मोडुन काढण्याचे आंदोल न पहीले उभारले तर सगळेच प्रश्न एका झटक्यात सुटटील. आरक्षण असो किइ दहशदवाद, सगळ्याच्या मागे आहे आपली identity. तीच जर आपण फक्त भारतीयच केली तर नुसताच cicket world cup च नाही तर आपण हे जगच जिंकु यात वाद नाही.
स्वतंत्र भारतात जनतेच्या
स्वतंत्र भारतात जनतेच्या प्रश्नांवर जेपींचे आंदोलन झाले होते. त्या वेळी अर्थातच जन्मच झाला नसल्याने ते पाहता आले नाही हे दुर्दैव..
जनआंदोलनासाठी करिष्मा असलेला
जनआंदोलनासाठी करिष्मा असलेला अथवा जनमानसात आदराची भावना असलेला नेता असावा लागतो. सध्या अण्णा आहेत तसं..
किंवा मग संघटीत प्रयत्नाने आंदोलन उभारता येऊ शकते. ही एक किचकट प्रोसेस आहे >>
किरण तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण अति झाले की कोणाही नेत्याची गरज लागत नाही. कोणीतरी सुरू केले की आपोआप त्याला धार येते.
जर व्यक्तीत काही तरी करायची इच्छा असेल तर मार्ग नेहमी असतो. उदाहरणार्थ कॉलेजच्या दिवसात मी गेट मिंटींग घ्यायचो. गेट मिटिंग म्हणजे कॉलेजच्या दारापाशी एकट्याने जाऊन भाषणाला सुरू करायचे. थोडक्यात वेडी बडबड. मग थोड्यावेळाने मुलं कुतूहलाने जमा होतात व आपोआप सामील होतात. त्याचेच पुढे प्राचार्याला घेराव घालने किंवा रास्ता रोको पण करणे ह्याचात रुपांतर होते. गरज असते ती सुरूवातीची. लिड घेण्याची.
इथे पण त्यामुळेच मी असे लिहिले की साधारण २०-२५ एक कार्यकर्ते जमवून लाक्षणिक उपोषन एवढेच करायचे, कुठेही हल्ला गुल्ला किंवा तोडफोड करायची नाही. एक टेन्ट घ्यायचा, दोन बाकं, गाद्या, आणि माहिती देणारी पत्रक.. ह्यात पहिले तीन दिवस भरून काढण्यासाठी आपण २५- ३०. त्यापैकी काही लोक उपोषन न करता मिडियाशी संपर्क साधतील आणि हे टिव्हीवर, बातम्यात कसे येईल हे पाहतील. हे सर्व सोपे आहे कारण तवा गरम आहे. शिवाय इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम आता आपल्या हातात आहे. ३-४ दिवसानंतर जनता साथ देईल. कुतूहल म्हणून काही लोक एक दिवस बघतील पण नक्कीच ह्या दहशतवादाच्या प्रश्नावर साथ मिळेल.
हे असे सर्व मी लिहायचे कारण शून्यातून असे अनेक आंदोलन उभे करता येतात. मग तो शाळेचा सोयीचा प्रश्न असो की विद्यापिठाच्या फिस चा. लोक येतील. तेंव्हा येत होते, आत्ताही येतील.
सुरूवात करायला पैसे लागतील, जे आपण उभे करू शकतो. आणि त्याची सुरूवात मी त्या बाफबर लिहिल्यासारखी करायला तयार आहे. शिवाय हे आंदोलन आपण राष्ट्रव्यापी वगैरे करायच्या भानगडीत पडायचे नाही. उद्देश फक्त असे काही तरी होऊ शकते इतकेच दाखवायचा. त्यामुळे लगेच उद्या परिस्थिती बदलेल असे नाही. फक्त प्रोटोटाईप! फसले तरी हरकत नाही. आपणच लिडर, आपणच जनता. हे एक नागरिक म्हणून केले एवढे समाधान.
( ताक इथे वर मी माझी उदा दिली कारण मी ह्यातून गेलेलो आहे. कोणाला माझा मोठेपणा वगैरे सांगत आहे असे वाटल्यास योग्य त्या फाट्यावर मारले जाईल. कृपया इथे वैयक्तीक वाद करू नयेत. आपणास देखील असा अनुभव असू शकतो, आपण तो सांगावा. )
केदार, अनुमोदन.
केदार, अनुमोदन.
अनिल ७६ एकदा तुझ्या मनात
अनिल ७६
एकदा तुझ्या मनात विचार आला हीच आंदोलनाची सुरूवात समज. मग एखाद्या युद्धासारखी त्याची आखणी केली पाहीजे. एकट्याने काहीच होत नाही. कुशल संघटनक, नेतृत्वगुण असणारे यांना हेरून पुढची दिशा ठरवली गेली पाहीजे. तसच या आंदोलनाला कुठलाही रंग लागणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.
माध्यमांचा रोल मोठा आहे. भारतात सातत्याने आंदोलने होत असतात. पण आपल्या गैरसोयीच्या आंदोलनांना अनुल्लेखाने मारण्यात येते. म्हणूनच जे आंदोलन उभारायचे आहे ते असे असले पाहीजे कि माध्यमांना नाईलाजाने का होईना दखल घ्यायला लागली पाहीजे.
इतर मुद्यांबाबत सुमंगलशी सहमत..
passionate_indian आपला
passionate_indian आपला प्रतिसाद आवडला व खूप उत्कट वाटला पण ...........
।>>>>>>>>मग तसेच आपण सगळ्या वेळेला का नाही फक्त भारतीय राहु शकत ?
ब-याच वेळेला असा अनुभव आला आहे की काही मुसलमान अजूनही भारतीयांसारखे वागत नाहीत नाहीतर कश्मीर मध्ये व बाकी ठिकाणी अराजकीय कृत्ये झाली नसती. गिलानी असे बोलला नसता. भेंडी बाजारात असे फटाके फुटले नसते.
ह्या वर माझ्या ह्या लेखाची आठवण झाली.
http://www.maayboli.com/node/21790
http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
हे आपण कथा ह्या प्रकारात का
हे आपण कथा ह्या प्रकारात का घातलेत कळले नाही.
आंदोलन उभे राहीले पाहीजे,
आंदोलन उभे राहीले पाहीजे, नुसत्या मानवी साखळ्या, किंवा मेणबत्त्या पेटविण्यात अर्थ नाही >>>
बदल घडवुन आणण्यासाठी आपणहुन,जनशक्तीच्या रुपाने रस्त्यावर का उतरत नाहीत ? मंत्रालयाला घेराव का घातला जात नाही ? या राजकारण्यांना या पद्धतीने जाब का विचारला जात नाही ? हे आता व्हायलाच हवं >>>
१००% अनुमोदन .....कधि कुठे जमायचे तेव्ध सन्गा .....आलोच सगळे ......मग कळेल लोकशक्ती काय असते ते ..... ईजीप्त सारखे इथे पण घडले पाहिजे.... लोक रस्त्यावर उतरलेच पाहिजेत....
एक दोन लोक सोडता प्रत्येकाला
एक दोन लोक सोडता प्रत्येकाला चर्चा करण्यात जास्त रस आहे असे दिसते.
केदार,
अनुमोदन ! कारण अशा गोष्टीमध्ये त्रास सहन करण्याची तयारी लागते,पण ही परिस्थिती आता बदलेल अशी आशा वाटते.
सुमंगल्,किरण्यके,मुक्तेश्वर
तुमच्याशी मी सहमत आहे...
हे आंदोलन आपण दुसर्यासाठी करणार नसुन स्वता:साठी आहे ही जाणीव हवी, त्यामुळे दुसर्यांना जबरदस्ती नाही, प्रत्येकजण उस्फुर्तपणे जर बाहेर पडला तर त्यामुळे लाखो लोक जमतील हे नक्की.
सुहास्य>>ईजीप्त सारखे इथे पण घडले पाहिजे.... लोक रस्त्यावर उतरलेच पाहिजेत....
सहमत !
बस्स ! एवढंच व्हायची गरज आहे.
रणजितजी,
माफ करा, मी दुसर्या पानावर प्रयत्न केला पण जमलं नाही, माझा हा दुसराच लेख असल्यामुळेही.
प्रत्येकजण उस्फुर्तपणे जर
प्रत्येकजण उस्फुर्तपणे जर बाहेर पडला तर त्यामुळे लाखो लोक जमतील हे नक्की. >> अनिल साहेब आपल्या या विधानात सर्व आले.
प्रचंड अनुमोदन.
(शिर्षक वाचुनच लेखात काय असेल?, हे उमजलेले, म्हणुन लेख वचला नव्हता आताही वाचत नाहीय....आता पुढे त्याची गरजही नाही :स्मित:)
कुठपर्यंत आली तयारी उपोषणाचा
कुठपर्यंत आली तयारी
उपोषणाचा कार्यक्रम होणारै का ?
म्हणजे मला तयारी करायला. मी कॉलेजमधे असताना जिथे उपोषणाचे स्टॉल असतील तिथे चिकनकबाब, पानीपुरी, रगडापॅटीसच्या गाड्या लावायचो. मस्त धंदा व्हयायचा
-------------------------------------------------------------------------------------------------
फाटे फाटे पे लिखा है मारनेवाले का नाम
खाने खाने पे लिखा है हादडनेवाले का नाम
दिवे घ्या
जंत्या बोलायला छान वाटते
जंत्या
बोलायला छान वाटते 'आंदोलन'....पण मग मागे कुंटुंबाचे चित्र उभे राहते... अरेरे.
या राजकरणी लांडग्यांचा काय भरवसा...देवा?
अनिल खुप छान लिहिलेस. मला
अनिल खुप छान लिहिलेस.
मला नक्की काय करायचे ते माहित नाहीय. आणि कुणावर विश्वासही उरला नाहीय. केदारने लिहिलंय तो मार्ग पटतोय, पण तो अंमलात आणायचा धाडस कोण करणार? राजकारणी लांडग्यांमध्ये आपला निभाव कितपत लागेल??
अनिल७६ आपला लेख आवडला.
अनिल७६ आपला लेख आवडला. उत्फूर्तता आहे. मत पटली.
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तद्नंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची सुरक्षा - शेवटी, नेहमीच शेवटी.
http://www.maayboli.com/node/21790
लेख आणि प्रतिसाद
लेख आणि प्रतिसाद विचारकरण्यासारखे.
खुपच छान आपण सगळयानिच या
खुपच छान आपण सगळयानिच या गोश्टीकडे सीरीअसली बघयला हवे