खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)
… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी!!!
चैत्राची चाहूल
चैत्राची पालवी
तांबूस कोवळी
तप्त निखार्यात
शीतल साऊली
पळस पांगारा
फुलला भरारा
पावला भरुन
मनाचा गाभारा
शुभ्र रातराणी
मोगरा साजणी
खुळावले मन
सुगंध गगनी
रंग उधळण
मुक्त पखरण
पक्षीगण कंठी
चैतन्याचे गान
नील-लाल-पीत
पताका भरात
उभारल्या गुढ्या
हिरवी कनात
सृष्टीचे सृजन
फुटे पान पान
सोहळा देखणा
भरारले मन
अँडी आणि पाँडी!
मागच्याच आठवड्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.
पाँडीचेरी येथिल अरविंद आश्रम ( ऑरोविल)
रोखुनि असा हा कोणी, फोडून ढाल नभाची
नील अंबरी या, निष्पर्ण सन्यस्त कोणी
झडली सर्व पाने, आशा उरात तरीही
झुंजतो वा-याशी, जिवंत फांद्यांमधुनी
निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
एक कातर सायंकाळ ....
कामानिमित्त जेव्हाकेव्हा ऑफिसमधे सायंकाळनंतरही थांबणे होते तेव्हातेव्हा सूर्य अस्ताला जात असताना ऑफिसमधल्या बंद खोलीत मला बसवत नाही, मनाला भुरळ घालणार्या अशा संध्याकाळी मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जातोच जातो. एकतर माझ्या ऑफिसच्या आसपासचा परिसर अनेक झाडांमुळे शोभिवंत असा आहे आणि सायंकाळी तो अगदीच वेगळा भासतो.... तिथे काही काळ घालवल्यावरच परत कामाला सुरुवात करता येते...
लोकहो मला महाबळेश्वर ला जाण्याची माहिती हवी
म्हणजे नवी मुंबई ते महाबळेश्वर कसे , रस्ता कोण ता
MTDC पासुन साईट सिई ग ई
कोणी गेले असेल तर इथे लिहा , मी येता weekend plan करतीये
घराजवळ्च्या खोलगट परिसरात येऊन जाऊन असणारे कॅनडा गीज. हिमवर्षावानंतर.....