गेल्या रविवारी मुंबईतल्या भटकंतीसाठी तीन ऑप्शन होते.. काळाघोडा महोत्सव, मोनोरेलचा प्रवास वा गुलाब पुष्प प्रदर्शन.. जमल्यास सगळेच करुन येण्याचे ठरवले होते.. पण सकाळीच अकरावाजता गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उदयानात पाउल ठेवले नि वेळ कसा गेला ते कळलेच नाही.. फारशी गर्दी नसल्याने गुलाब पुष्प प्रदर्शन तर अगदी आरामात पहायला मिळाले.. लहान-मोठया आकारांचे विविधरंगी गुलाब पाहून थक्क व्हायला झाले.. त्या प्रदर्शनाची एक झलक..
प्रचि १:
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो.
कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता.
यावर्षीच्या सुट्टीत बालिला जायचे अगदी शेवटच्या दिवसात ठरले. माझा आधी फिजीला जायचा विचार होता पण
लेकीचे आणि माझे वेळापत्रक जुळले नाही. मग तायपेईचा विचार केला होता. नेटवर जी माहिती आहे त्यानुसार
भारतीयांना तैवानचा व्हीसा ऑन अरायव्हल मिळतो असे कळले पण ते चुकीचे होते.
शेवटी थॉमस कूकच्या मानसी गोरे यांनी सुचवल्याप्रमाणे बालि ला जायचे पक्के केले, कधी नव्हे ती मला यावेळेस
माझा पुतण्या, केदारची सोबत होती.
सिंगापूर एअरलाईन्सची तिकिटे तर बूक केली. आणि मी भारतात आल्यावर हॉटेल निवडले. नंतर विचार करता
जय शिवराय ,
१२-१-१४ रोजी दुर्गवीर आयोजित पद्मदुर्ग दुर्गदर्शन व श्रमदान मोहीम नेहमी प्रमाणेच हि मोहीम यशस्वी ठरली ……
पद्मदुर्ग किल्ल्याची लोकान मध्ये असणारा गैरसमज दूर व्हावा व स्थानिकांना एक रोजगार मिळावा या हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठान दर वर्षी पद्मदुर्ग वर मोहिमा राबवत आहे .
या मोहिमेत मुबई -पुणे मिळून ६० च्या वर दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला . या मध्ये १३ महिला , शाळकरी लहान मुले यांनीही आवर्जून सहभाग घेतला .
अनेकवेळा अफ़्रिकेचा उल्लेख एक देश म्हणून केला जातो. पण तो एक भला मोठा खंड आहे. त्यातल्या काही देशांत माझे वास्तव्य झाले. तर अशाच एका सुंदर शहराची ओळख करून देणारी हि मालिका सुरु करतोय.
एखाद्या शहरात पर्यटक म्हणून जाणे वेगळे आणि त्या शहराचा रहिवासी म्हणून तिथे दिर्घकाळ वास्तव्य करणे वेगळे. एकाच शहराचे दोन वेगवेगळे चेहरे दिसतात आपल्याला.
जोहान्सबर्ग, हरारे, अदीसअबाबा आणि नैरोबी यांना आफ़्रिकेतील हिलस्टेशन्स म्हणावी लागतील. आज ती आधुनिक शहरे असली तरी आपले सौंदर्य राखून आहेत. यापैकी मी अनुभवलेले नैरोबी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.
हॅरी पॉटरच्या चित्रपटांमध्ये Owl Post ही भन्नाट कंसेप्ट होती...हा चित्रपट पाहिल्यापासून या रुबाबदार पक्ष्याला एकदातरी याची देही-याची डोळा बघायचं होतं.
यंदाच्या थंडीत हे देखणे पक्षी न्यू जर्सीचे पाहुणे म्हणून आलेत, तसे ते दर वर्षी येतात पण यंदा कदाचित पाहूणचार जास्त आवडला असल्याने जास्त संख्येने आलेत.
बऱ्याच दिवसांनी विंकेंडला तापमान शुन्न्याच्या थोडसं वर गेलं. ही संधी साधून थेट 'सँडी हूक' गाठलं..तिथे पोहचलो तेव्हा समुद्राच्या काही भागाचा बर्फ झाला होता...समुद्रावरुन येणारा गार वारा बोचत होता...चार-पाच तासच्या तंगडतोडी नंतर बाबाजी प्रसंन्न झाले आणि नेत्रसुखद अनुभव मिळाला.
(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)
...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,
आमच्या बावधनच्या घराला ३ बाल्कन्या आहेत. त्यापैकी एबाल्कनीमधेत आम्ही कुंडीत अनेक झाडे लावलीत. होत अस की आम्ही अधूनमधून अकोल्याला जातो. तर त्या तेवढ्या चार पाच दिवसात झाडे उन्हामुळे आणि पाणी न मिळाल्यामुळे कोमेजून मरुन मरगळून जातात. परत नव्यानी झाडे आणून नाही लावली तर गॅलरी भकास उजाड दिसायला लागते. कारण आमच्या घरी आम्ही सर्व जण झाडांवर जीवापाड प्रेम करणारे आहोत. आमच्या अकोल्याच्या घरी हा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही कारण सगळी झाडे जमिनीत लावली आहेत. शिवाय पाण्याचा निचरा इकडून तिकडून होतच राहतो. परिणाम, झाडांना मुबलक पुरेसे पाणी मिळत राहते.
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....