भीमाशंकर
भीमाशंकर via शिडी घाट
"भीमाशंकर via शिडी घाट"
.
.
भीमाशंकर हा असा ट्रेक आहे कि यात दुर्गा डूंच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धबधबा,चढाई , Rock patch,ladder, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य,धुके काय लिहू नि काय नको इतक्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात नि श्रावण मास सुरु होण्याअगोदर भीमाशंकर ट्रेक तो बनता है boss !!!!!!!!!!
भीमाशंकर हे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक ! तसेच भीमाशंकर हे सर्वात लहान अभयारण्य आहे जेमतेम १०० वर्ग किमी. येथे राज्य प्राणी शेकरू हा आढळतो, परंतु ज्याचे दर्शन फार दुर्लभ आहे.
डोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....
स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (उत्तरार्ध)
स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (पूर्वार्ध)
पदरगड-भीमाशंकराचा द्वारपाल!
उन्हाळा मस्त मी म्हणत होता, पण तुम्हाला माहीत असेलच, आपण गड-दुर्गांच्या धारकर्यांना घरी बसवेल तर शप्पथ!! शनिवार,रविवार आला की पाठीला लगेच पाठपिशवीचे भास व्हायला सुरुवात!!! तर मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि परिक्षा संपल्याने सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यास मस्त वेळ मिळाला होता!! लगेच mumbaihikers.org पिंजुन काढायला सुरुवात झाली आणि समजले की "ट्रेकमेट्स" नावाचा ग्रूप येत्या रविवारी पदरगडावर जाणार आहे. गेल्यावर्षी मी पदरगड कोथळीगडावरुन न्याहाळला होताच! लगेच "मनसुबा" ठरला,चलो पदरगड!! मी लगेच ही "मसलत" माझा "सह्यमित्र" सलीलशी केली. तो सुद्धा एका पायावर तयार!!