गोरखगड
स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (पूर्वार्ध)
देहरीचा गोरखगड (प्रकाशचित्रे)
पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.
सिद्धगड : दोघांची भ्रमणगाथा !
मनात कितीही ठरवले तरी प्रत्यक्षात ते उतरणे बरेचदा कठीण होउन बसते.. सिद्धगडाबद्दलही तेच झाले.. पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे पोटाशी बारगळणारा हा गड यंदाच्या पावसात तरी सर करण्याचे ठरवले होते.. पण काही जमत नव्हते..शेवटी जायच्या आदल्यादिवशी ठरले एकदाचे.. मी आणि जो (गिरीश जोशी).. पण दुकट्याने ट्रेक करणे धोक्याचे त्यात हा जंगलाने वेढलेला गड असे ऐकून होतो सो पुन्हा संध्याकाळी हा ट्रेक रद्द करण्याचे मनात आले.. तीला सांगितले तर तीसुद्धा 'नाही जायचे' करू लागली.. म्हटले जाउदे नको करूया ट्रेक !! तोच पुन्हा जो चा फोन आला.. " यो, चल रे जाउ.. रिस्क न घेता जिथपर्यंत जमेल तितके जाउ. नि परत येऊ..
चांदण्या राती... गोरखगडाच्या माथी...
मागच्या पावसाळ्यात सिध्धगडाला धो-धो पावसात अंघोळ करताना पाहिला होता.तेथे धबधब्यांची जत्रा अनुभवली होती.तो नजारा अजुन डोळ्यात तसाच जिवंत आहे.आता त्याच डोंगररांगेतल्या गोरखडाला भेटायच ठरल होत.पण उन्हाळ्यात दिवसा धबधबे नाही तर घामाच्या जलधारा नक्कीच वाहतील म्हणून चांदण्या राती पोर्णिमेच्या दोन दिवस आधीची मोहीम ठरली.शनिवारी (१६ एप्रिल)रात्री साडे-दहा वाजता कल्याण स्टेशनवर पोहोचण्यासाठी माबोकर दगडसम्राट योचा समस आला होता.पण मुळात घरातुनच उशीरा निघाल्यामुळे वेळेवर पोहोचेल याची खात्री नव्हती.ठाणे स्टेशनला पोहोचलो तेव्हा साडे-दहा वाज
चुकलेला गोरख
एकीकडे १ ऑगस्टला मैत्रीदिनाच्या निमित्ताने ठाणे गटगचा बेत ठरत असताना आणि दुसरीकडे अगदी गुत्प पद्धतीने गोरखगडची मोहीम आखली जात होती... बोरीवली परगण्यातील एका यो'दगड'ने फितूरी करण्याचा चंगच बांधला होता... स्वतःला कामानिमित्त गटगला जाणे शक्य नसल्याने शक्य तितक्या लोकांना फितूर करून टांगारू बनविण्यात कट त्याने आखला होता...
