"भीमाशंकर via शिडी घाट"
.
.
भीमाशंकर हा असा ट्रेक आहे कि यात दुर्गा डूंच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धबधबा,चढाई , Rock patch,ladder, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य,धुके काय लिहू नि काय नको इतक्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात नि श्रावण मास सुरु होण्याअगोदर भीमाशंकर ट्रेक तो बनता है boss !!!!!!!!!!
भीमाशंकर हे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक ! तसेच भीमाशंकर हे सर्वात लहान अभयारण्य आहे जेमतेम १०० वर्ग किमी. येथे राज्य प्राणी शेकरू हा आढळतो, परंतु ज्याचे दर्शन फार दुर्लभ आहे.
तसे पहिले तर भीमाशंकर हा काही किल्ला नव्हे वा गड नव्हे. हे एक देवस्थान असून पेशव्यांनी वसई दिग्विजयानंतर पोर्तुगालांच्या चर्च ची घंटा वसईहून आणून येथे शंकरास अर्पण केली . (तेव्हा चर्चच्या घंटेने धर्म बुडाला कि नाही अशी चर्चा तरी ऐकिवात नाही . असो . तो मुद्दा नाही ).भीमाशंकर ला अलीकडच्या काळात कु प्रसिद्धी मिळाली ती माळीण घटनेने !!!! भीमाशंकर ट्रेकसाठी चोखाळलेल्या वाटा म्हणजे गणेश घाट नि शिडी घाट . यापैकी गणेश घाट तसा चढाईस सोपा . तर शिडी घाट थोडासा अवघड !!!
ट्रेक ला जाण्या अगोदर इंटरनेट वर खूप वेळ घालून माहिती घेतली नि बहुतेक जणांनी अति सावधानतेचे इशारे दिले होते . ते थोडे खटकले. असो जास्त मनावर घ्यायचं नाही. आपला group जर ७ -८ जणांचा असेल नि सर्व थंड डोक्याचे नि अति उत्तेजित trekkar असेल तर या वाटेने अवश्य जावे . थ्रिल काय असते ते या वाटेवरच कळते .
पहाटे ४ च्या ठोक्याला आम्ही पुण्याहुन खांडस गावाकडे जाण्यास सुरुवात केली . पण वाटेत अनेक अडचणी आल्या लोणावळा येथे पाऊस सुरु झाला , खोपोली चा रास्ता खड्यांनी भरलेला होता,गाडी पंचर झाली , त्यामुळे गाडी चा स्पीड कमी झाला आणि आम्ही खांडस गावात सकाळी १० वाजता पोहोचलो जवळपास १३० किलोमीटर चा प्रवास पार पडला होता. १०.३० च्या ठोक्याला आम्ही चढाई सुरु केली . खांडस गावातून पुलापर्यंत पोहोचण्यास २५ -३० मिनिटे लागतात . पुलाजवळ पोहोचाल्य्वर उजवीकडे जो रस्ता जातो तो गणेश घाट नि आपण सरळ चालत गेल्यास शिडी घाटाचा रस्ता लागतो . प्रचंड असा डोंगर बघून सगळ्यांची फक्त बघ्यांची भूमिकाच झाली. ३५०० फूट ची चढाई करायची होती. परंतु कोणी म्हटलेच आहे कि “ IF YOU WANT TO GO FAST WALK ALONE,IF YOU WANT TO GO FAR THEN WALK TOGETHER” .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शिडी घाट शिडी घाट अशी जी भीती घातली जाते ते आहे हे बघायला सगळेच उत्सुक होते. या शिडीच्या टोकाला पोहोचल्यावर आपणास आधीची शिडी खाली पडलेली दिसेल .पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारा point येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी .येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते . एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे माझी guarantee काही दिसणार नाही दिसले तर सगळे धुरकट दिसेल !!!! भीमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे दिसते म्हणजेच कळते .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत एक कातळ वाट सुरु होते परत एक धबधबा !!!!आता येतो तो traverse!!!! Traverse cross करून हुश्श कारेस्तोपर्यंत rock patch आ वासून उभा असतो .या rock patch चे वैशिष्ट्य असे कि हा rockpatch नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा . पहिला टप्पा cross केल्यावर आपणास दगडात left मारायचा असतो …. पहिला patch तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या patch च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत . व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच उभा राहू शकतो .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आमची कलावंतीण थ्रिलर ट्रेक नंतर हि दुसरी ट्रेक होती. impossible हा शब्द सगळ्यांच्या तोंडात येत होता . rock patch चे ३ लेवल होते . पहिला टप्पा कसाबसा पार केला .अजून २ रॉक patch आम्ही अंकुश या स्थानिक रहिवाश्याच्या मदतीने पार केला . तो आम्हाला सांगायचा पायाची पकड कुठे ठेवावी आणि कुठे ठेऊ नये. जस जशी उंची गाठत होतो तास तशी मनात भीती वादात चालली होती. अंतिम चढाई सुरु …. गणेश घाटाने आल्यास कमीत कमी ४ तासात आपण उत्तम trekker असाल तर वर पोहोचू शकता . नि शिडी घाटाने यासाठी एक तास कमी पकडावा . पण आधी सांगितल्या प्रमाणे आम्हाला तब्बल ५ .३० तास लागले होते .
तीनही रॉक patch पार करून झाल्यावर सपाट पठार लागतो तिथे जेम तेम २०-२५ लोकांची वस्ती आहे. तिथे हे लोक शेती करतात . अश्याच एका शेतकरी काकूंची झोपडी आम्ही आम्ही आमच्या आरामासाठी वापरली. भूक लागली होती, सगळे खुप थकले होते पण निसर्गाचे सौदर्य पाहून सर्व काही विसरण्यास भाग पडत होता. ट्रेक ला येतानाच पूर्ण तयारी झाली होती मॅग्गीने आमची भूक भागवली . चुली साठी लाकडं गोळा करून सर्वानी आपापल्या परीने मदद केली . गरम गरम मॅग्गी खाऊन सगळे शांत निसर्गाचा आनंद घेत विश्रांती घेतली . ४ वाजेपर्यंत टॉप ला पोहचायचे ठरले . सगळ्यांनी आपापले मोबाइल बंद केले . रात्री च्या परतिच्या प्रवासासाठी टॉर्च ची गरज होती . घामाच्या धारा कपाळावरून पडत होत्या . चढाई अजून खुप होती. २ ग्रुप बनवायचं आम्ही ठरवलं . एक ४ चा ग्रुप आणि एक ३ चा ग्रुप .. ४ चा ग्रुप पुढे जाऊन वाट शोधेल .. आणि ३ चा ग्रुप त्यांना follow करेल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अंकुश चा निरोप घेताना
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
५.३० तासानंतर आम्ही टॉप वर पोहोचलो . घनदाट जंगल, भले मोठे रॉक patch , उभी चढाई , ladder , या सर्वांवर मात करत आम्ही सुखरूप टॉप ला येऊन पोहचलो . everest पार केल्याचा feel प्रत्येकाच्या मनात येऊ लागला .
पण सगळ्यात मोठी लढाई तर पुढे होती .. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि बगतो तर काय संध्याकाळ चे ४.३० वाजलेले . आणि आम्हाला ६ तासाची चढाई पुन्हा आहे त्या मार्गाने उतरायची होती. बापरे!!!!!!!!!!सगळ्यांनी ठरवले काही झाल तरी अंधार पडायच्या आत ३ रॉक patch उतरायचे कारण जे दिवसा अशक्य वाटायचे रात्री तर कुणालाच उतरता आले नसते.
चहा चा ब्रेक घेऊन आम्ही संध्याकाळी ५ वाजता उतरण्यास सुरुवात केली (शिडी घाटाने ). पुन्हा २ चा ग्रुप बनवला . आणि उतरताना कुत्रा मागे लागावं तस आम्ही पळत सुटलो. १० %, १५% ,२३% अश्या प्रकारे मोबाइल मध्ये बॅटरी राहिली होती . ६ वाजता रॉक patch जवळ पोहोचलो . आणि खरी परीक्षा सुरु झाली . उतरताना तोल जात होता ३००० फूट उंचीवर आंम्ही होतो. साखळदंड पद्धतीने आम्ही उतरण्यास सुरुवात केली . बॅग्स खाली देण्यात आले पुढच्या ग्रुप ने आगोदर जाऊन .. मागच्या टीम ला उतरण्यास मदद केली. अंधार होत होता . सूर्य पूर्ण पने मावळला होता . जंगले शांत झाली .. काळोख वावाढत चाललेला होता . भीती वाढत चालली होती .. मोबाइलला टॉर्च चालू झाले होते . पुढे गेलेल्या टीम ने गाणे म्हणायला सुरु केले कारण मागे राहिलेल्या साठी तो एक फक्त मार्ग दाखवण्याचा संकेत होता. शेवटचा चा १ तासाचा प्रवास अंधारात झाला . रात्री ८ वाजता आम्ही खांडस गावात पोचलो. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला . स्थानिक गावकऱ्याने चहाची व्यवस्था केली . पाऊस चालू होता . अंधार खुप होता . अजून १३० केलो मीटर चा प्रवास करायचा होता(पुण्यापर्यंत) . फक्त २ वेळा ब्रेक घेऊन आम्ही बाईक कुठे हि न थांबवता रात्री १२.३० वाजता पुण्यात पोहोचलो . wow ..... अशी adventure , thriller ट्रेक चा अनुभव पहिल्यांदाच अनुभवला असेल .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
note : जर कुणी भीमाशंकर ट्रेक ला जायचे ठरवले असेल तर आणि तुम्ही जर अनुभवी ट्रेकर नसाल तर शिडी घाटाने जाण्याचा प्रयत्न करू नये . गणेश घाटाने तुम्ही जाऊ शकता . गणेश घाट सोपा आहे पण long-distance आहे.
.
.
.
लेखन करण्यास खुप मेहनत घेतली आहे. आमची अशी भटकंती आवडल्यास नक्कीच कमेंट करा
धन्यवाद।
राहुल
ट्रेक चा पुर्ण विडिओ : https://www.youtube.com/watch?v=NSX9A2zaxoY
नक्कीच लाइक आणि subscribe करा।
बापरे रात्री उतरण म्हणजे
बापरे रात्री उतरण म्हणजे जबरदस्त धाडस
तुम्हा सर्वांचे अभिनंदन. लिखाण छान उतरले आहे
धन्यवाद
धन्यवाद