दरवाज्याच्या अगदी समोरच शिंजीर (सुर्यपक्षी / Sunbird) पक्षाने घरटे बनवुन अंडी घातली होती. त्याची ही छायाचित्रं.
सर्व छायाचित्रांचे आकार लहान केलेले आहेत. मुळ मोठ्या आकारातल्या अजुन चांगल्या प्रती बघण्यासाठी इथे क्लिक करा.
१] दरवाज्यावरच्या छोट्या खिडकीतुन दिसणारे घरटे
|
|
|
|
|
|
पक्ष्याने घरटं बांधणं हे जरी खूप कॉमन असलं तरी जेव्हा ते प्रत्यक्ष घरटं बांधत असतात; त्या गोष्टीचं निरिक्षण करणं हे फारच आनंददायी असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंजिराने आमच्या अंगणात घरटं बांधण्याचं ठरवलं. दोघांची मिळून जागा शोधायची धावपळ सुरु झाली तसा आम्हाला त्याचा सुगावा लागला. अगदी अभ्यास करून, मग अगदी सर्वात सुरक्षित जागा त्यांनी ठरवली. आमचा जाईचा वेल छाटला आहे आणि शेजार्यांच्या ग्रीलमधे त्याचे वाळके अवशेष म्हणजे कडक झालेल्या फांद्या अडकून त्या तशाच राहिल्या आहेत. त्या वाळलेल्या फांदीच्या अगदी टोकाला त्यांनी घरटं बांधायला सुरुवात केली. ह्यांचं घरटं म्हणजे जणू कचर्याचा लोंबता बटवाच!