इतिहास

आरंभम- भाग १

Submitted by अज्ञातवासी on 4 June, 2017 - 04:59

"व्यंकतरमन्ना गोविंदा!!"
"अरे काय कोलाहल माजवलाय नुसता. मूर्ख कुठले. तो देव अशाने कान बंद करून घेईल. आणि त्यांना काय मूर्ख म्हणतोय, स्वतःकडे बघ." मी मनाशीच म्हणालो.
"जगात सगळे लोक वेगवेगळे का बनवले?"
" ...कारण या जगात सर्व रंग असावेत म्हणून. कुणी चांगला, कुणी वाईट, कुणी हुशार, कुणी अडाणी, कुणी दयाळू तर कुणी खूप कठोर...."
"...मग सगळ्यांचीच अशी अपेक्षा का की मी माझ्या वडिलांसारखं असावं? असतील ते जगातील सर्वात चांगले व्यक्ती, पण ज्या व्यक्तीला मी कधी बघितलही नाही म्हणून मी फक्त हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो म्हणून त्यांच्यासारख वागावं?"

तुझ्या झाडांचे स्मरण

Submitted by धनि on 31 May, 2017 - 09:38

फत्थरांच्या इमल्यांचे जंगल सभोवती वाढते आहे
या भकास वातावरणात मला तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे

तुझे झाडांवरील प्रेम, त्यांच्या वाढीसाठीचा कळवळा
आता मात्र नुसती झाडेतोड , ही धरा सहते आहे

हिरव्यागार त्या पाचूवनात पाऊस येई मृदगंध दरवळे
उजाड या शहरात पाऊस पूर बनून कोसळतो आहे

उकाडा वाढतोय , पूर्वीची ती मंद हवा आता उदास भासते आहे
विकासाच्या या हव्यासात मला तरी तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे

(प्रेरणा: http://www.maayboli.com/node/62719 )

एक होती क्रिस्टीना…

Submitted by पद्मावति on 15 May, 2017 - 05:42

सन १९३९च्या सप्टेंबरमध्ये एक ब्रिटिश जहाज केपटाउनहून इंग्लंडला यायला निघाले होते. त्या जहाजावर हरवलेल्या गोष्टींची यादी रोज एका फळ्यावर लावली जाई. २८ सप्टेंबरला सकाळी त्या फळ्यावर दोन गोष्टींची नोंद झाली….

१. लॉस्ट- वन शर्ट

२. लॉस्ट- वॉर्सा

अगदी टिपिकल ब्रिटिश ड्राय ह्यूमर!

सन १९३९पर्यंत हिटलरने युरोपमध्ये धूमाकूळ घालायला सुरुवात केली होती. झेकोस्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रिया घशात घालून आता जर्मन गरुडाची नजर वळली होती पोलंडवर.

विषय: 

चाणक्य - ओळख एका कादंबरीची

Submitted by खुशालराव on 3 May, 2017 - 07:39

'चाणक्य' या आनंद साधले यांनी लिहिलेल्या कादंबरीचे मुळ कथानक हे विशाखादत्त यांच्या मुद्राराक्षस या नाटकावर आधारित आहे. त्यामुळे त्या कथेचा क्रमही मुद्राराक्षस प्रमाणेच असून त्यात विष्णुगुप्त चाणक्य यांची व्यक्तिरेखा, त्यांची राष्ट्रभक्ती व देशाच्या हितासाठी केलेले कुटील राजकारण तसेच चंद्रगुप्त वरील प्रेम यांचे दर्शन होते.
कादंबरी मध्ये चाणक्यांच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करताना लेखक शिव शंकरांची उपमा देतात. आणि त्याचप्रमाणे चाणक्यांच्या चारीत्र्यात संतापाचे व प्रेमाचे वर्णन दिसते.

शब्दखुणा: 

"हाल चाल ठीक ठाक है"

Submitted by फारएण्ड on 30 April, 2017 - 13:10

जनरली आपण गप्पा मारताना सरकार, समाज/लोक यांचा विषय आला, की "पूर्वीपेक्षा आता बेकार आहे" असा टोन आपोआप ऐकू येतो. दहा वर्षांपूर्वी, वीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या परिस्थितीबद्दल तसेच ऐकू यायचे. मग प्रश्न पडतो की हे सगळे चांगले होते कधी? गुलजार च्या 'मेरे अपने' मधले हे गाणे ऐकले तर पूर्वीही लोक तसेच म्हणत असेच वाटेल.

अंधत्वनिवारण : आधुनिकोत्तर भारतीय विदा निर्माण पद्धती व तदनुषंगाने

Submitted by आ.रा.रा. on 27 April, 2017 - 10:19

India has changed its over four- decade-old definition of blindness, bringing it in line with the WHO criteria, a step that would drastically bring down the number of people considered "blind" in the country.

According to the new definition, a person who is unable to count fingers from a distance of three metres would be considered "blind" as against the earlier stipulation of six metres, which was adopted in 1976.

शब्दखुणा: 

मुंबईतील किल्ले -- भाग २

Submitted by मध्यलोक on 25 April, 2017 - 07:22

द बूक थीफ

Submitted by केदार on 18 April, 2017 - 15:56

* * * Here is a small fact * * *
You are going to die.

* * * Reaction to the aformentioned fact * * *
Does this worry you? I urge you - don't be afraid. I am nothing but fair.

बार्न्स अन नोबल्स मध्ये रिकमंडेड फॉर स्कुल रिडिंग सेक्शन मध्ये मला "बूक थीफ" दिसले, ते मी उचलून सहज चाळले. अन पहिल्या पानातच शॉक लागला.
मार्कस झुझॅक बद्दल मी वाचले होते, अगदी बूक थीफ बद्दलही ऐकले / वाचले होते. बाबा, अजून तुम्ही हे वाचले नाही? असे मागे कधी तरी मला माझ्या मुलीने विचारल्यावर मी अजून नाही, असे म्हणालेले आठवले. आणि लगेच हे पुस्तक घेतले.

‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 12 April, 2017 - 06:59

दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----

मंडला(मंडळं) डिसाईन

Submitted by विद्या भुतकर on 2 April, 2017 - 23:54

मला एक गोष्ट लक्षात आलीय, बोलायला पैसे पडत नाहीत. अर्थात आधी एकदा म्हटलं होतं तसं माझ्या नोकरीत बोलायचेच पैसे मिळतात. पण अनेकवेळा अनेक मैत्रिणींशी अशाच गप्पा मारताना काहीतरी कल्पना सुचतात, कुणी त्यांना काय करायचं आहे हे सांगतं, मग मीही चार थापा मारून घेते. त्यातला आवडता विषय म्हणजे इंटेरीयर डिसाईन, चित्रकला, इ. त्यातल्या त्यात लोकांना घरात बदल सुचवताना मला तर अजिबातच पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भिंतीवर काय चांगलं दिसेल किंवा कसा सोफा योग्य असेल असे अनेक सल्ले मी वरचेवर देत असते.

Pages

Subscribe to RSS - इतिहास