मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना मानवाने बराच काळ हा आत्ता आणि आज जगण्यात घालवला. अन्न संकलक आणि शिकारी मानव समूहांचा बराच काळ हा खायचे काय हा प्रश्न सोडवण्यात जात होता. सर्व काही आज आणि आत्ता. पु लंच्या तुझे आहे तुझ्यापाशी मधला काकाजी म्हणतो तश्या दोनच वेळा. सकाळ झाली, दिसू लागले कि अन्न मिळवून जेवायची वेळ. रात्र झाली कि झोपायचं. कार्पे दिएम हे वेगळं सांगायची गरजच नव्हती.
इंग्रजी महिन्यांचे घोळ
भारतीय पंचांग हे अनंत कालापासून चालत आलेले शास्त्रीय आणि गणितावर आधारित शास्त्र आहे. पंचांग म्हणजे जोतिष (ऍस्ट्रोलॉजि) असा गैरसमज आहे. पंचांग हे जोतिर्विद्या (ऍस्ट्रॉनॉमी) चे शास्त्र आहे. पंचांगात तिथी, नक्षत्र, राशी, योग आणि करण अशी पाच अंग असतात. भारतीय महिने हे सुरवातीपासून बारा च आहेत. चैत्र ते फाल्गुन ही कालगणना अबाधित आहे. पंचांग हे चान्द्रिय कालमापन असून सूर्याच्या भ्रमणाशी जुळवण्याकरिता अधिक महिना येतो. गृह स्तिथी माहिती असल्यास तिथी आणि नक्षत्र अचूक रित्या काढता येते.
२०व्या शतकाच्या सुरुवातीला चीन मध्ये घडलेल्या घटना (थोडक्यात)
शेवटच्या घटका मोजत असलेले मांचू साम्राज्य:
२०व्या शतकाच्या सुरुवातीला चीन मध्ये घडलेल्या घटना (थोडक्यात)
शेवटच्या घटका मोजत असलेले मांचू साम्राज्य: