https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)
https://www.maayboli.com/node/64000 ------> गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)
https://www.maayboli.com/node/64002 ------> गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)
https://www.maayboli.com/node/64016 ------> गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)
https://www.maayboli.com/node/64032 ------> गडदुर्गा - श्री जोगेश्वरी देवी, भैरवगड, हेळवाक (७)
https://www.maayboli.com/node/64041 ------> गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)
===========================================================================
कधी कधी दुर्ग छोटासा असला तरी त्याचा इतिहास प्राचीन असतो, म्हणतात ना छोटा पैकेज बडा धमाका. असेच काही सांगता येईल ह्या नाशिक जिल्ह्यातील छोटेखानी माणिकपुंज किल्ल्या बद्दल. तसे नाशिक म्हटले की उत्तुंग किल्ले लक्षात येतात पण माणिकपुंज किल्ला ह्या छवीला छेद देतो. पुण्यातील पर्वती सम उंची असलेला माणिकपुंज सध्याही विविध अवशेषानी नटलेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात वसलेला हा किल्ला चाळीसगाव पासून जवळ आहे. समुद्रसपाटी पासून किल्ला फक्त ६३६ मीटर उंच आहे. गडावर प्रवेश करण्यापूर्वी गावात शंकाराचे पुरातन मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिर परिसरात पाण्याचे कुंड व काही पुरातन शिल्प आपले लक्षवेधुन घेतात.
माणिकपुंज गडाची स्वामीनी आहे भवानी माता, देवीचे मंदिर गड चढतानाच आपल्याला दिसते. देवीचे हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत असून मंदिराची प्राचीनता ह्यावरुन कळून येते. देवीची मूर्ती साधारण ५ फुट उंच आहे. मंदिरापर्यन्त रेखीव पायऱ्या केल्या आहेत आणि विद्युत दिव्यांची सोय सुद्धा केली आहे.
गडावरील सारेच अवशेष कातळात कोरलेले आहेत. मंदिरापासून थोडे वर चढले असता डाव्या हाताला भले मोठे पाण्याचे टाके आहे. टाके बघून माथ्यावर गेले असता दगडात कोरलेले वाड्याची जोती दिसतात. ह्या चौथऱ्या मागे एक खांब टाके आहे.
सोळाव्या शतकाची सुरुवात ते मध्य म्हणजे ई. स. १५०८ ते १५५३ पर्यन्त किल्ला बुरहान अहमद कडे होता.
नाशिक परिसरात असून सुद्धा आपले वगळेपण जपणारा व इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आवर्जून बघावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गेले ९ दिवस मी माझ्या भटकंतीमधे बघितलेल्या गडदुर्गाचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत गडदुर्गा आणि गडाची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे आपल्याला ही लेखमाला आवडली असेल.ह्याबद्दल आपला अभिप्राय मला जरूर कळवा.
खंडेनवमी व विजयादशमीच्या आपणा सर्वास हार्दिक शुभेच्छा
आपलाच,
~विराग
खूप सुंदर संकल्पना,
खूप सुंदर संकल्पना,
ठिकाणांची निवडही हटके, अनवट
मनापासून धन्यवाद
धन्यवाद हर्पेन
धन्यवाद हर्पेन
मस्त!!!
मस्त!!!
अतिशय सुंदर उपक्रम, फोटोज आणि
अतिशय सुंदर उपक्रम, फोटोज आणि माहिती, विराग.
खुपच आवडल.
छान आहेत गड-नव-दुर्गा,
छान आहेत गड-नव-दुर्गा, मध्यलोक. कल्पक उपक्रम.
सगळी देवळे स्वच्छ आहेत अगदी.
ही मूर्ती गोड आहे, मुंबईच्या महालक्ष्मीचा भास होतो पटकन चेहर्यात. समईच्या प्रकाशातला स्पष्ट फोटो नाहीये ?
आणि जिथे गडाची बाकी माहिती दिलीये, तिथे छायाचित्र / कोलाज स्वरूपात चित्र पण छान वाटेल.
धन्यवाद मेघा, जिप्सी आणि
धन्यवाद मेघा, जिप्सी आणि कारवी _/\_
समईच्या प्रकाशातला स्पष्ट फोटो नाहीये ? >> नेमकी मोठी लेन्स नव्हती आणि मंदिरात अंधार असल्यामुळे अस्पष्ट फोटो आला
जिथे गडाची बाकी माहिती दिलीये, तिथे छायाचित्र / कोलाज स्वरूपात चित्र पण छान वाटेल >> छान सजेशन, प्रयत्न करतो किंवा एक वेगळी लेख माला लिहितो