महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.
बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८
सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होते. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.
माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो.काही अनुभव अतिशय वाईट होते , पण 'जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल ' ते ते घेऊन अनुभवाची शिदोरी अधिकाधिक समृद्ध करणं या एकाच ध्येयाने मी आजवर पुढे जात आलो आहे.
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी
निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी
कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी
जर सर्व ठीक आले ,, तरच बायको करावी
अन्यथा बोहल्यावर चढू नये
चढल्यावर तोंडावर पडू नये
यातून अखेरपर्यंत सुटका नाही
हेच सत्य मानून , खालील पध्द्त अवलंबावी
व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा
हातातल्या लिटमस कागदावरी
बघावे सामूचे मोजमाप नीट
बायको येण्यापूर्वी घरी
जर सामू आला सात
खुशाल आपली काढावी वरात
जर त्यामध्ये असेल चढउतार
नवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने उत्तम सेवा( Excellent Customer Service ) देणारी संसाधने( Resources ) हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो। त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences ).
"इतिहास, राजकिय आणि नैतिकदृष्ट्या"
(History ,Political And Ethically )
प्रथमतः २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नविन विचारवंताना व सदस्यानां हार्दिक शुभेच्छा....
तुझा निरोप घेताना
मन दाटून आले
का कुणास ठावूक
पण माघारी फिरताना
मनी धैर्य कोठून आले
मन हिमाच्छादित गोठले होते
विचारांनी वेढले होते
हात हलत होते
निव्वळ तुझ्या हातांना प्रतिक्रिया म्हणून
डोळे स्तब्ध होते
हातांचे खेळ बघून
आठवणींचा भृंग पिंगाया लागला
क्लेशांचा अरी जोर धराया लागला
जवळच एका पारावर बसून
समस्त आठवणीना एक करून
वाज वळू लागलो
अश्रुनी दिवा भरून
माघारी चालू लागलो
==================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर