उदेच्या तोतयाच्या भूमिकेत याह्या आता स्थिरावल्याची खात्री होताच उदेच्या खास लोकांनी मुनेरकडे एक महत्वाची मागणी केली. इराकमध्ये झाडाचं पानही सद्दाम हुसेनच्या मर्जीशिवाय हलत नसे...उदेच्या या तोटयाची सगळी खबरबात नित्यनेमाने सद्दामच्या दरबारात पोचत होती. आता वेळ झाली होती खऱ्या ' लिटमस टेस्ट ' ची. या तोतया उदे हुसेनला इराकच्या सर्वेसर्वांपुढे पेश करण्याची योग्य वेळ आता आलेली होती.
याह्या घराच्या दिशेने निघाला पण पोचला मात्र नाही. त्याची रवानगी झाली उदे हुसेनच्या एका खास तुरुंगात. हा तुरुंग होता बगदाद शहराबाहेर वाळवंटात. तिथे काही दिवस याह्याला जो छळ सहन करावा लागला, तो त्याच्या मनावर आघात करण्यासाठी पुरेसा होता. सद्दामच्या मुलांनी आपल्या तीर्थरुपांच्या आणि काकांच्या सगळ्या छळछावण्या बघितलेल्या होत्या...त्यांना कैद्यांचा कोणकोणत्या पद्धतीने छळ करायचा असतो हे नीट माहित होतं. काही विशिष्ट पद्धतीने कैद्याचा छळ केल्यास तो मनातून पार कोलमडून जातो हे उदेला नीट ठाऊक होतं. त्याचं तंत्राचा वापर करून याच्याच मनोबल त्याने ध्वस्त केलं होतं.
१४ जून १९६४. उदेच्या जन्माआधीचा चौथा दिवस. इराकच्या उत्तरेच्या कुर्दिस्तानच्या भागात अरबील शहराच्या एका वस्तीत एक सर्वसाधारण कुर्दिश कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. कुर्दिस्तानचा भाग हा इराकचा अतिशय महत्वाचा भाग. इथल्या डोंगरांमधूनच तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांना पाणी मिळतं. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत हा भाग अतिशय सधन. इथल्या तेलविहिरी भरभरून तेल प्रसवणाऱ्या. इथली हवा बरीचशी युरोपच्या डोंगराळ प्रदेशासारखी. इथे प्राबल्य मुख्यतः कुर्दिश लोकांचं. हे कुर्दिश लोक पट्टीचे लढवय्ये म्हणून इराकमध्येच नाही, तर समस्त अरब जगतात प्रसिद्ध आहेत.
बगदादच्या चौकात सद्दामच्या सैनिकांनी पकडलेल्या काही हेरांचा शिरच्छेद होत असताना सद्दामच्या बाजूला पाच वर्षे वयाचा कोवळा उदे उभा होता. आपल्या मुलांना कणखर बनवायची सद्दामची ही खास पद्धत. जनतेला याच वेळी उदेचं पहिलं दर्शन झालं. बापाच्या बाजूला ताठ उभा असलेला हा उदे समोरच्या दृश्याने जराही घाबरला अथवा रडला नाही, असं दृश्य काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याचा आख्यायिका बगदादमध्ये अजूनही ऐकायला मिळतात.
उदे हुसेन जन्माला आला ती तारीख आणि साल याबद्दल इराकमध्येच अनेक मतमतांतरं आहेत. काहींच्या मते त्याच्या जन्माचा दिवस ९ मार्च, तर काहींच्या मते १८ जून. काहींच्या मते हा जन्माला आला १९६४ साली तर काहींच्या मते १९६५ साली. याचा जन्म तिक्रितचा. सद्दाम हुसेन आणि त्याची पहिली बायको साजिदा तलफा यांच्या पोटी निपजलेल्या हा सद्दामचा पहिला ' मुलगा '.
उदे हुसेन. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन याचा थोरला मुलगा आणि म्हणूनच सद्दामचा वारसदार.
विकिपीडियावरुन ही माहिती मिळाली.
कल्हण यांनी आपल्या राजतरंगिणी (इ.स. १२ व्या शतकामध्ये) खालील पाच ब्राह्मण समुदायांचे पंचद्रविड म्हणून वर्गीकरण केले आहे त्यात ते असे म्हणतात की पंचद्रविड हे विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहेत:
कर्नाटक (कर्नाटक ब्राह्मण)
तैलंगा (तेलगू ब्राह्मण)
द्रविड (तामिळनाडू आणि केरळचे ब्राह्मण)
महाराष्ट्रका (महाराष्ट्रीयन ब्राम्हण)
गुरजारा (गुजराती, मारवाडी आणि मेवाडी ब्राह्मण)
बुद्धिबळाची स्पर्धा कधी पाहिली आहे तुम्ही? हे जे प्रथितयश खेळाडू असतात त्यांची काय खासियत असते? कशा प्रकारे तयारी करतात एखाद्या गेमची? समजा ‘अ’ या स्पर्धकाला ‘ब’ ला हरवायचे असेल तर त्याने गेम ची तयारी कशी करायला हवी? नुसते बुद्धिबळच नाही, दुसरं काहीतरी उदाहरण घेऊ – मुष्टीयुद्ध असो, क्रिकेट असो, किंवा फुटबॉल असो वा टेनिस असो, (खरंतर सगळ्याच स्पर्धांमध्ये) जिंकण्यासाठी काय आवश्यक आहे बरं? स्वतःचा खेळ उंचावायचा असेल तर स्वतःची ताकद वाढवणे, खेळासंबंधी कौशल्य आत्मसात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण फक्त स्वतःचे कौशल्य वाढवणे पुरेसे आहे का? या सगळ्यांमध्ये कौशल्याला चातुर्याची जोड हवी!
भाग-१
मुख्य रस्ता सोडून रिक्क्षा आत वळली आणि साधारण १-२ किमी आत गेल्यावर मंदिराची भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागली.. थोडं पुढे आल्यावर रिक्क्षा थांबवून रिक्क्षावाला म्हणाला, ‘मॅडम, आलं बगा तुमचं मंदिर.. जाऊन या तुमी निवांत, मी थांबतोय मनलं इतच!’
मनवा रिक्क्षामधून उतरली आणि त्या अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेल्या मोठ्या दगडी कमानीकडे तिने पाहिलं.