"इतिहास, राजकिय आणि नैतिकदृष्ट्या"
(History ,Political And Ethically )
प्रथमतः २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नविन विचारवंताना व सदस्यानां हार्दिक शुभेच्छा....
संपूर्ण जगाला अनेक विचारवंत लाभले आहेत. प्रत्येकाने एक विचार आपल्यात रुजू केला आहे.
त्या विचारसरणीचा उपयोग आजही होतो.
आता विचारसरणी म्हणजेच (Ideology) क्रांती घडवून आणु शकते.
म्हणून इतिहास महत्वाचा...
ज्या व्यक्तीला आपला इतिहास माहित नाहि, तो इतिहास घडवू शकत नाहि.
इतिहास आपल्याला प्रतिबिंब दाखवत असते.
आता त्या प्रतिबिंबाला आपण कोणत्या चष्म्यातून बघाव हे एक विशिष्ट विचारसरणी(ideology) तुन जन्माला आलेली एक खराब राजनीती आहे.
मि चष्म्याला दोष देतो.
राजकीय विचारसरणीला माझा विरोध नाही.
विचारसरणी कधीच संपुष्टात येणार नाहिये, कारण संपूर्ण जग त्यावर अवलंबून आहे.
विचारसरणी अनेक रंग प्रधान करून नवीन विषयावर भाष्य करण्यास मदत करते.
त्या विचारसरणीला अनेकदा चागंल्या प्रकारे प्रकट करून दिशाभुल केली जाउ शकते हे मात्र सत्य.
माझा विरोध विचारसरणीला कधीच नसणारे आहे.
मात्र ती विचारसरणी कोणत्या हेतूने वापरली जात आहे. जेणे करून कोणत्याही प्रकारे भेदभाव किंवा कुठल्याही व्यक्तीला इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.
कुणीही एखादे मत प्रकट केली असता,
त्या मताबाबत, आपण विचार करत नाहीत कि
का..? हे मत प्रकट केले असावे. या मागचा उद्देश काय असेल?
असा एकही प्रश्न उपस्थित होत नाहि...
फक्त त्या विचारसरणीशी मि जुळून आहे ते नेहमी सत्यच असेल अशी समजूत काहि लोकांची झालेली आहे. कारण त्यावर प्रश्न उपस्थित करण म्हणजे आपल्या बुद्धीला प्रश्न विचारण्या सारखे,अशी मानसिकता तयार होतांना, ऐवना ति तयार झालेली आहे..
ते सत्य कि असत्य हे पडताळून बघण आपल्या बुद्धीला जमणार नाहिये.
म्हणून कुणी काहि पोस्ट केले किवां टेलिव्हिजन मधे एखादा मुद्दा दाखवून आपण त्यावर कोणत्या प्रकारे विचार करायचा इतपत आपली बुद्धी विकसित झालेली आहे कि नाहि हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यावर मि भाष्य करत नाहि.
आपली बुद्धी कुशल आहे परंतु त्याला एक लेबेल लाऊन ठेवण्यात आलेले आहे. म्हणूनच विचारसरणी आगेसारखी एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकणी मुक्तपणे संचार करतांना दिसते.
नाहितर whatsapp university आहेच ज्ञान द्यायला.
विचारसरणी असावी मात्र त्यात नैतीकदृष्टीकोण(Ethically) असावा.
मनाला कुणी पटवून दिले असता, काहि लोकांची विचारसरणी बदलतांना दिसून येते,मात्र काहि अधंपणे विश्वास ठेवून त्यात बदल होता कामा नये,हाच विचार घेउन पुढे जाण्याचा मार्ग अंगि कारतांना दिसतात. मग त्यांचे काय होते,
यासाठी इतिहास वाचावा...
वाईट विचारसरणी नेहमी वाईटच घडविते..
मग त्यावर परत राजनीती सुरु...
आता यावर उत्तर मिळणे सोपे आहे.मात्र किचकट सुद्धा.....
विचारसरणी विरूध्द विचारसरणी
हे चक्र सुरुच राहणार...
मात्र या राजनीती मध्ये काहि नियमानुसार वागावेच लागते म्हणून या राजनितीला एक समर्थन तर दुसरा विरोध...
असे दिसून येते.
विरोध विनाकारण करण त्याला पाश्वर्भूमी नाहि किंवा कसला दाखला हि नाहि.
त्या विरोधाला आपली ऊर्जा खर्च करून आपण आपली बुद्धी कुठे गहाण ठेवली नाहिये ना हे मात्र तपासा.
समर्थन करणारे सुद्धा आपण कसला समर्थन करत आहोत हे त्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती आहे कि नाहि हे एकदा आपल्याच बुद्धीला पटवून दाखवा.म्हणजे आपला मेंदू दुसरा चालवत नाहिये हे तपासा.
विरोध किवां समर्थन हे प्रत्यक्ष आपल्या विचारसरणीला जुळून आहे.
त्यापलीकडे एखादा विचार करण किवां त्यावर भेदभाव होत नाहिये याची खबरदारी घेण हे सुज्ञ लोकांचे लक्षण,
मात्र जन्म मिळतांच विचारसरणी अंगी रुजू लागते. हळूहळू आपल्यात इतका विकास होतो कि आपण आपल्याच गर्दी मधे स्वतःला शोधत बसतो. यात चुक कुणाचीहि नाहीये,परंतु जेव्हा आपण विचारसरणीत सुधारणा करु लागल्यावर आपण या भीडतंत्रा पासून अलिप्त होऊ लागतो.म्हणून अगदी कमीच लोकांना या जगात महान म्हणून ओळखले जाते.
सुप्रसिध्द होण्यापेक्षा महान झालेली कधीही चागले.
या जगात असे अनेक लोक आहेत जे खुप सुप्रसिद्ध आहेत त्याच्याबद्दल अनेक लोकांना माहिती आहे.
मात्र असे लाखोंच्या संखेने आहेत जे महान आहेत ते कधीही कुनाच्या विचारसरणीला जुळून राहिलेले नाहि परतुं त्यांनी एक वेगळ्याच मार्गाला जन्म दिलेला आहे. त्यातील काही पुस्तकांच्या मार्फत आपल्या प्रयंत्न पोहोचले आहेत. मात्र काहि आजही लुप्त आहेत. परतुं त्याची कीर्ती कालही महान होती आजही महान आहे न उद्द्याहि राहणार आहे.
म्हणून कुठल्याही चर्चेत सहभागी होतांना त्या बद्द्ल नक्की अस्सल इतिहास राजकीयपरिस्थिती व नैतिकतदृष्टीकोण तपासून बघा.
खुप लोक यालाच बळी पडतात.
कारण तपासणी करायची कुठे,कशी व कधी हे समजत तोवर नवीन मुद्दा हाती लागतो.
विचारसरणी मुद्देसूद बदलली जाऊ शकते.
मात्र ती नैतिकतेवर खरी उतरली पाहिजे.
मनुष्य या पृथ्वीतलावर आहेत तो प्रयंत्न विचारसरणी जिवंत राहनार आहे.
याच कारण हि तसच आहे.....
"जन्म"
कोण कुठली ओझे उचलत आहे हे त्याच्या बोलण्यातून, वागणूक, शिक्षण आणि नैतिकता यावर अवलंबून...
आता मार्ग तेच शोधतील किवा अलिप्त राहतील जे विचारसरणी विरूध्द विचारसरणी
यातील सत्य तपासुन जे नैतिकतेची पाठ राखतील मग यात काहीही तडजोड केले जाणार नाहि...
त्या साठी " इतिहास, राजनीती आणि नैतिकता" यातील तालमेळ जमायला हवे....
जे लोक बदल करु पाहत आहे,त्या लोकांबरोबर लोकही बदलतील जे बदलणार नाहित ते बदला घेतील.
वेगापेक्षा दिशा महत्त्वाची....
यावर आपण मला भाष्य करून एक नवीन दिशा द्यावी...