नवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने उत्तम सेवा( Excellent Customer Service ) देणारी संसाधने( Resources ) हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो। त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences ). मग तो घेतलेला नवीन मोबाइल असो किंवा केलेली एखादी ट्रिप असो। तो अनुभव ही जगण्याच्या प्रवासातील शिदोरी बनते । कधी ती माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करते, आनंदित करते तर कधी कटू आठवणी देते, मनात खंत निर्माण करते । ही जी मनाला खात राहणारी खंत आहे ना ती जशी वैयक्तिक असते तशीच ती एखाद्या समाजाची किंवा समुहाची पण असते। " छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या सारख्या विभूतीचे नाव जरी उच्चारले तरी गर्वाने खुलणारा आपला मर्द मराठी माणूस अशीच एक खंत गेली जवळजवळ अडीच (२. ५ ) शतके (२५९ वर्षे ) आपल्या उराशी बाळगून आहे ती म्हणजे "१४ जानेवारी १७६१ साली झालेले पानिपतचे युद्ध अणि त्यातील आपला (मराठ्यांचा )पराभव।"
तो पराभव म्हणजे
छत्रपतींच्या प्रेरणेने आणि त्यांनी लावलेल्या "स्वराज्याच्या " रोपट्याचे वटवृक्षात(साम्राज्यात ) रूपांतर करून , अटकेपार झेंडे फड़काविणाऱ्या ( पंजाब / लाहोर ताब्यात घेऊन दुर्रानी फौजेला काबुलकड़े पळण्यासाठी भाग पाडणाऱ्या) व संपूर्ण मुघल भारतात ( राजपुताना , माळवा , गुजरात , आग्रा , अजमेर )चौथाईचे / महसूल गोळा करण्याचे हक्क प्रस्थापित केलेल्या मराठ्यांचे "ईराणच्या पातशाहीची "मदत घेऊन काबुल अणि कंदहार ताब्यात घेण्याचे (दुर्रानी घराणे संपविण्याचे ) मनसुबे धुळीला मिळविणारा
आर्थिक आघाडीवर थकविणारा ( काही कोटी रुपयांचे कर्ज )
मराठा साम्राज्याची (थोड्याकाळासाठी) घडी विस्कटणारा
आजच्या भाषेत बोलायचे झाले तर "Demographic Dividend " ( तरुण लढवय्ये, साहसी सरदार , भावी पेशवा अणि ७००००+ अधिक लोक या लढाईत मारले गेले ) उद्ध्वस्त करणारा हा पराजय होता।
"जिहाद " ही संज्ञा वापरून झालेली पहिली हिन्दू-मुस्लिम लढाई ज्या मध्ये हिन्दू सरदार (मराठे) दिल्लीच्या तख्तासाठी (मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी की मातृभूमीच्या रक्षणासाठी) परकीय मुसलमान आक्रमकांसोबत (अफगान दुर्रानी , रोहिल्ला ) लढले होते।
अशी भौगोलिक ,आर्थिक ,राजकीय अणि धार्मिक कंगोरे असलेली इतिहासातील ती बहुदा पहिलीच मोठी लढाई।
अशी दुःखे किंवा मनाला लागलेली टोचणी / खंत आपल्याबरोबर एक भाबडी आशा घेऊन येते। जी आशा शक्याशक्यतेच्या हिंडोळ्यावर आपल्याला झुलायला लावते। अमुक केले असते तर कदाचित तमुक झाले असते असे गणिती समीकरण मांडून इतिहास कदाचित वेगळा असता अशी वेडी उम्मीद जागवते । याच समीकरण मांडणीत मग घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला जातो। लढाईची परिस्थिति, त्यातील मोहरे , डावपेच , नेतृत्व यांचे सविस्तर विश्लेषण करून वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात। ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटते कारण त्याने जरी इतिहास बदलणार नसला तरी झालेल्या चूका , चुकलेले डावपेच याचे नेमके आकलन होते अणि भविष्यात तशा चूका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेता येते। कारण विस्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे " Longer you look back, farther you can look forward."
तसे पाहिले तर ही ऐतिहासिक घटना आणि आजचे आपले जीवन ,उद्योग यात काय संबंध। त्यातील घटना आजच्या व्यवस्थापकीय रचनेसाठी ( Modern Management) खूप काही धड़े , शिकवण समोर ठेवते। कारण शेवटी काळ बदलला तरी " जिंकणे अणि त्यासाठी शत्रूचा पराभव करणे " हेच समान सूत्र आहे। आजच्या व्यवस्थापकीय रचनेचा पायाच यावर रचला केला आहे। त्यामुळेच या रचनेत " Battle Field ", "Logistics ", " Leading by Example", " Personality Cult / Character " , " Territorial gains( Market Share) या सारखे शब्द येतातच ।
व्यवसाय नियोजन अणि विस्तारीकरण( Business Management & Expansion ) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अणि कोणत्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे याचा ऊहापोह करते।त्याकडे वळण्यापूर्वी प्रथम या लढाईची पार्श्वभूमी विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे ( घाबरू नका " पानिपत घडण्याची ५ कारणे सांगा " या सारख्या शालेय इतिहासाच्या पेपरातील प्रश्न मी नक्कीच तुमच्या समोर मांडणार नाही। चिंता नसावी )
त्याची पार्श्वभूमी दडली आहे ती " राघोबा दादा( रघुनाथराव ) यांची मल्हारराव होळकर अणि दत्ताजी शिंदे यांच्या साथीने उत्तरेतील साम्राज्य विस्ताराची मोहिम ( Northern expedition १७५७ -१७५८ )ज्यामध्ये मुघल बादशहाचे रक्षक म्हणून प्रथम केलेला नजीब खान रोहिल्याचा पराभव ( मीर बक्षी* होण्याची त्याचे मनसूबे धुळीला मिळविणारा ) अणि अफगाण आक्रमणापासून केलेले दिल्लीचे संरक्षण। त्यापुढे या शूर वीरांनी मारलेली पंजाब अणि लाहोर प्रांतातील मुसण्डी( अटकेपार झेंडा याच मोहिमेची फलश्रुती )। एकीकडे नजीब खानाला त्याची जागा दाखवून देतानाच दुसरीकडे अहमद शाह अब्दालीच्या मुलाचा (तैमूर खानचा ) केलेला पराभव व दुर्रानी फौजांनी काढलेला पळ। याचे नैसर्गिक परिणाम म्हणजे बदला घेण्यासाठी टिपलेले दुर्रानी अणि रोहिले। या दिग्विजयाततील काही अडचणी , आखलेले मुस्सदी डावपेच उलगडणे तितकेच गरजेचे । या मोहिमेसाठी लागणारी आर्थिक कुमक जमविताना राघोबा दादांना आलेल्या अडचणी , राजपुताना प्रदेशात लूट करून करावी लागलेली सैन्याची व्यवस्था, ती सोय लावण्यासाठी वेळोवेळी जाट लोकांशी अणि राजपूत लोकांशी झालेल्या झटपटी जेणेकरून लढणारे सैनिक उपाशी राहणार नाहीत . ही सोय लावत असतानाच ज्याला आपण मुस्सदी डावपेच म्हणतो तो म्हणजे अवधचा नवाब "सिजा उद दौला " याने घेतलेला तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय ज्यामुळे नजीब खान रोहिल्याची गंगा यमुना दोआब भागात मराठे लोकांना करता आलेली कोंडी। या दिग्विजयानंतर मुग़ल भारतात उठलेली आवई ती म्हणजे " विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बसविणार बादशाह म्हणून ।
*(मीर बक्षी: Paymaster General / Commander in Chief)
यातूनच पानिपतच्या लढाईची बीजे रोवली गेली ती अशी
रोहिले अणि दुर्रानी यांच्यातील मराठ्यांबद्दलची बदल्याची भावना
हिन्दू पद पादशाही (" विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बादशाह म्हणून नेमणार) या पहिल्या बाजीरावाच्या स्वप्नाची पूर्ति होणार या भीतीने मुस्लिम मुस्सदी अणि धर्मगुरु यांनी दिलेली इस्लाम खतरेमें ची हाक अणि दुर्रानी राजाला (अहमद शाह अब्दालीला ) धर्म वाचविण्यासाठी केलेली विनंती
मराठे दिल्लीच्या गादीवर बसले तर आपल्याला जास्त चौथाई/महसूल द्यावा लागेल या भीतीपोटी विरोधात गेलेले जाट, गुर्जर & तटस्थ राहिलेले राजपूत
इस्लाम खतरेमें च्या नावाखाली "जिहाद " पुकारून अवधचा नवाब "सिजा उद दौला " या शिया मुस्लिम प्रशासकाला आपल्या बाजूने वळविणारी नजीब खान रोहिला या सुन्नी मुस्लिम सेनानीची मुस्सदेगिरी।
आता लढाईची पार्श्वभूमी समजल्यानंतर आजच्या व्यवस्थापकीय रचनेच्या ( Modern Management) दृष्टीकोनातून त्याचे विश्लेषण करणे थोड़े सोपे जाईल
१७५७ -१७५८ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ज्यावेळी अहमद शाह अब्दाली अणि नजीब खान यांच्या फौजेनी दिल्ली गाठली अणि बादशाहला ताब्यात घेतले तेव्हा त्यांचे संरक्षक म्हणून मराठे जेव्हा दिल्लीकडे जायला निघाले तेव्हा
नेतृत्व (Leadership ) :
वर उल्लेखलेल्या यशस्वी मोहिमेनंतर राघोबा दादा अणि होळकर , शिंदे, बुंदेले हे सरदार या मोहिमेचे नेतृत्व करणार यात काहीच शंका नव्हती। मागच्या मोहिमेतील अनुभवावरुन या मोहिमेवर जाण्यासाठी राघोबा दादां नी कोटी रुपयांची मागणी केली। सैन्य जगविण्यासाठी रसद , धान्य पुरेसे असावे अणि राजपूत, जाट, गुर्जर यांच्या कडून फारशी मदत होणार नाही हे ओळखून ही मोठ्या रकमेची मागणी होती त्यावेळेच्या आर्थिक परिस्थितीत नानासाहेब पेशवा ती मागणी मान्य करणे अवघड होते। नुकत्याच निजामविरुद्ध झालेल्या लढाईत विजय मिळविलेला सदाशिवराव भाऊ अर्थातच जोशात होता त्याने या मोहिमेचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शविली। भाऊ अणि विश्वासराव कितीही पराक्रमी असले तरी उत्तरेतील त्यांची ही पहिली मोहिम होती . राघोबा दादा सारखा अनुभव अणि येणाऱ्या संकटांचा अंदाज त्यांना नव्हता। होळकर , शिंदे , बुंदेले मदतीला होतेच पण कुठेतरी अनुभवी अणि पराक्रम सिद्ध केलेल्या सरदाराला डावलून तरुण धाडसी पण अननुभवी नेतृत्वाच्या बरोबर लढणे त्यांच्या पचनी पड़णे थोड़े अवघड होते। त्यांच्या निष्ठेविषयी शंका कधीच नव्हती पण त्यातून जाणाऱ्या इशाऱ्याची भीती होती।
Modern Management Lessons:
Put Your Best foot forward
Opportunity must be given to Young/Energetic Turks, but the same needs to be calibrated by Experienced Commander in chief ( Leader) who understands the intricacies of battlefield to avoid disruption
संसाधने (सैन्य , लवाजमा , युद्धसज्यता , रसद ): Resources
मराठ्यांच्या शौर्याचा डंका पूर्ण भारतवर्षात गुंजत असताना सदाशिव राव भाऊ , विश्वासराव २०००० चे सैन्य अणि इब्राहिम गर्दीचे ९००० सैनिक अशी फौज घेऊन दिल्लीकडे निघाले। होळकर , शिंदे , बुंदेले हे सरदार अणि त्यांची मंडळी पण बरोबर होतीच। तोफखाना , बन्दुका , घोड़े हत्ती , तोफा असा मोठ्ठा लवाजमा बरोबर होता। त्यावेळी मराठे अशा विजयी मानसिकतेत होते की ही लढाई एक औपचारिकता होती या अफगाणी लोकांचा पुन्हा पराभव करण्याची। साहजिकच उत्तरेतील मोहिम असल्यामुळे अणि त्या भागात हिन्दू तीर्थस्थाने येत असल्याने तीर्थयात्रा करण्यासाठी सुमारे २००००० लोक( सरदारांच्या बायका , त्यांचे सेवक , तीर्थयात्री ) या सैन्याबरोबर दिल्लीकडे निघाले होते। मराठी सैन्याने मार्च १७६० मध्ये दिल्लीकडे कूच केली। तापी , नर्मदा , चंबळ , यमुना ओलांडून दिल्ली गाठायाची होती। साधारण पावसाळा ( जुलेे ) सुरु होण्यापूर्वी या नदया ओलांडणे गरजेचे होते। हा प्रचंड लवाजमा , तोफखाना या सर्वांसकट चंबळ ओलांडून आग्र्याच्या वेशीपर्यंत पोचण्यासाठी मराठी लवाजम्याला जून १७६० उजाडला। गंभीर नावाची छोटी नदी पार करून आधी आग्रा अणि यमुना पार करून मग दिल्लीकडे जाण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले। पहिला बाजीराव जे अंतर ४ दिवसात कापायचा ते अंतर पार करण्यासाठी या लवाजम्याला २० दिवस लागत होते। अथक प्रयत्न करून गंभीर नदी ओलांडल्यानंतर आग्रा पोहचेपर्यंत " जिहादच्या हाकेने "अवधचा नवाब 'सिजा उद दौला' नजीब खान रोहिला अणि अब्दाली यांना मिळाला होता। पावसाळा चालू झाल्याने नदी पार करणे कठीण जात होते , अनेक घोड़े "तमाशा" या रोगाने मरण पावले। पावसाळ्यामुळे तोफखाना घेऊन नदी ओलांडणे अवघड जात होते । अन्नधान्य संपत चालले होते रसद पुरविण्यासाठी उपयुक्त असलेला अवध प्रान्त त्याच्या नवाबमुळे विरोधात बसला होता। अशा बिकट परिस्थितीत खूप प्रयत्नान्तर मराठे सैन्य दिल्लीत (यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर )पोहचले। दिल्लीत अफगानी लोकांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली। तिथे पैसे (सिंहासन वितवळून चांदीची नाणी पाडली ) अणि रसद, धान्य यांचा बंदोबस्त केला। अब्दाली अणि नजीब खान यमुनेच्या पूर्वेला होते।
पूर्वीच्या युद्धपद्धतीनुसार नदी ओलांडायचे जे उतार असतात ते अडवून शत्रुला जेरीला आणायचे असते। ते काम अर्थातच दत्ताजी शिंदेंकड़े होते। याच सुमारास सूरजमल जाट लढाईतून माघार घेऊन तठस्थ राहिला ( कारण आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार )।
Modern Management Lessons:
This is like Cricket. Centurion in one game needs to go out in the second game and start making runs from zero. Or like Mutual Fund advisory : " Past Performance does not guarantee future returns"
Lean & Mean resource Management to achieve timely delivery & battlefield readiness( Time to market)
No Mixing of Business & Pleasure
Clear & Effective Communication to forge critical alliances
Resource Management
युद्धाची ठिणगी व मराठ्यांची कोंडी ( Building up to Battle)
दिल्ली हातची गेल्यामुळे अब्दाली अणि नजीब खान संधीची वाट पाहत होते। एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी थोड्या चकमकी होत होत्या। यमुना पर करण्याचे प्रयत्न होत होते। अश्याच एका चकमकीत बुरारी घाट येथे दत्ताजी शिंदेंना अफगाणी फौजांनी मारले। ही बातमी कळल्यानंतर मराठे सैनिकांनी बदला घेण्यासाठी कुंजपुरा किल्ल्यावर जेथे अफगाणी फौजेची रसद होती , धान्य होते अणि अब्दालीचे शूर सरदार होते तिथे हल्ला करून अफगाणी लोकांचा पराभव केला। १०००० अफगाणीसैन्याची कत्तल केली। धान्य , रसद गोळा केली। विजयानंतर कुरुक्षेत्र जवळ असल्याने तीर्थयात्रेसाठी मराठी लवाजमा तिकडे गेला। अब्दालीला ही गोष्ट कळल्यानंतर याचा बदला घेण्यासाठी पावसाळ्यांत दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडण्याचा बेत त्याने आखला। गुलाबचंद गुर्जर (आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार , म्हणून अब्दालीला सामिल झालेला ) याने त्या वेळी यमुना पार करण्यासाठीचा बागपत जवळील उतार अब्दालीला दाखविला अणि अब्दाली सैन्यासह दिल्ली अणि कुरुक्षेत्र याच्या मध्ये येऊन थांबला। या पुढील काळात जवळ जवळ दोन महीने चकमकी होत राहिल्या , दोन्ही बाजूचे काही सैनिक मारले जात होते। अब्दालीच्या सैन्याच्या ठिकाणामुळे मराठे सैन्याला रसद, मदत मिळणे अवघड झाले। ऑक्टोबर ते डिसेम्बर या दोन महिन्यात धान्य , रसद संपत चालली होती। चारा नसल्यामुळे जनावरे मरणे चालू झाले होते। दिल्ली कडून मदत घेऊन येताना बुंदेले , मानकेश्वर सरदार पकडले गेले अणि अब्दाली अणि त्यांच्या सैनिकांनी त्यांना मारून पैसे लुटले। भाऊ अणि त्यांचे निरोप पुण्यापर्यंत पोचण्यासाठी वेळ लागत होता। त्याच वेळेला पश्तून सैनिकांच्या टोळीने पंजाब प्रांता कडून मराठ्यांना घेरून रसद मिळविण्याचा मार्ग बंद केला। राजपूत , गुर्जर तठस्थ होते त्यामुळे मदत मिळाली नाही। मराठे सैन्याचे मनोबल खच्ची होत चालले होते लढाईत मरण्यापेक्षा उपसमारीने मरण्याची वेळ सैन्यावर आली होती। अशा परिस्थितीत आक्रमण करण्याची तयारी भाऊ , गार्दी , मराठे सरदार यांनी चालू केली। अब्दालीकडे असणाऱ्या दुर्बिनीने तो हे सर्व पाहत होता। उंटावरुन चालविल्या जाणाऱ्या तोफा त्यांच्या कड़े होत्या। हे कमी म्हणून की काय हवेची दिशा पण मराठे लोकांना साथ देत नव्हती , त्यामुळे मेलेल्या लोकांच्या , जनावरांच्या प्रेताच्या दुर्गंधीने मराठे हैराण झाले होते।
Modern Management Lessons:
Clear & Effective Communication about the intent, goal, possible outcome with allies, partners.
Channel preparation for seamless flow of information, resources in case of crisis
Expect the unexpected due to uncontrollable factors like weather,, Rules, Regulation change etc.
Use of latest Technology
प्रत्यक्ष युद्ध (Battle )
उपासमार यामुळे होणारे सैनिकांचे हाल , लोकांचे खचत चाललेले मनोधैर्य यामुळे भाऊ अणि विश्वासराव यांनी आता लढाईचा पवित्रा घेतला। त्याप्रमाणे व्यूहरचना तयार केली। इब्राहिम गार्दी ह्याने फ्रेंच लोकांकडून शिकलेले "Qol" किंवा " Ghol" हे युद्ध तंत्र वापराचे ठरविले ज्यामध्ये तोफखाना , त्यामागे दोन सैनिक तुकडीमध्ये ,मध्ये बरोबरचे लोक (जे सैनिक नाहीत ), त्यानंतर भाउ विश्वासराव यांची हुजरात व शेवटी लढणारी तुकडी असे स्वरुप होते। एका बाजूला गार्दीच्या तोफा होत्या , दुसरीकडे जनकोजी शिंदे , होळकर यांच्या तुकड्या होत्या। गार्दीच्या तोफांनी रोहिल्ल्यांची
दाणादाण उडवली होती काही हजार रोहिले मरण पावले। मराठे अब्दालीला भारी पडत होते। इथे दोन गोष्टी घडल्या। या मराठ्यांच्या आक्रमणाने उत्साहित होऊन जनकोजी शिंदे अणि काही सरदार मंडळी "Ghol " तोडून लढायला पुढे सरसावली त्यामुळे गार्दी लोकांना तोफा थांबवायला लागल्या। त्यातच अब्दालीने उंटांवरून तोफा डागल्या। अणि एक गोळी विश्वासरावला लागली। अपशकुन झाला। खचलेले सैन्य सैरभैर पळ लागले। भाऊ लोकांना लढायचे आव्हान करतो आहे पण लोक पळून गेले। तेव्हा अब्दालीने आपली १००००+ लोकांची reserve फौज बाहेर काढली अणि त्या फौजेने दमलेल्या मराठे सैनिकांचा पराभव केला। दुसऱ्या दिवशी कुंजपुराच्या सैनिक कत्तलीचा बदला म्हणून ४००००+ लोकांची कत्तल केली।
Modern Management Lessons:
Strategy needs to be explained to people on the ground to make that effective
clear communication w.r.t strategy will make it more reliable for execution.
पराभव नंतर ....
साधारणपणे जेता अणि पराजित यामध्ये जे नाते असते तसे या लढाई नंतर झालेले दिसले नाही. एक तर या युद्धाआधी बरेच दिवस भारतात तळ ठोकून बसलेल्या अब्दालीला अफ़ग़ाणिस्तानात बं डाळीची भीति निर्माण झाली त्यामुळे पराभव नंतर देखील मुघल इंडिया चे संरक्षक म्हणून मराठेंना कायम करण्यात आले। अब्दालीचे पण ५००००+ अधिक लोक मारले गेले होते। खऱ्या अर्थाने ही लढाई "Pyrric victory" होती ज्यामध्ये दोन्ही बाजूचे खुप नुकसान झाले।
Modern Management Lessons:
Price war, Win at any cost sometimes create huge drain on resources which result in log term reverses for the organisation even in the short term victory/ territorial gains
साहजिकच पुढे थोरल्या माधवरावच्या नेतृत्वाखाली मराठे लोकांनी नजीब खानाला धड़ा शिकवला। दिल्ली चे संरक्षक म्हणुन आपली जागा अधिक पक्की केली अणि २० + वर्षे दिल्लीत आपला भगवा ध्वज मानाने पडकत ठेवला।
" त्यावळेची हिन्दू पद पादशाही " अणि आताचे " हिन्दू राष्ट्र " या संकल्पनांमध्ये कमालीचे साम्य आहे। त्यावेळेच्या चूका पुन्हा करायच्या नसतील तर संवाद (Communication) हे अत्यंत महत्त्वाचे आहे। पेशवा दिल्लीच्या गादीवर बसणार म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरविणारे जाट अणि राजपूत हिन्दूच होते। " Citizen Amendment Act(CAA): च्या मुद्द्यांवर "गुद्दापेक्षा चर्चा " महत्त्वाची ठरणार आहे। CAA ला विरोध करणारे पण हिंदूच आहेत। तो निर्णय हा का गरजेचा आहे हे पटवून सांगणे गरजेचे ठरेल। " इस्लाम खतरेमें " ची आवई तेव्हा पण होती आज पण माध्यमे तीच धून गात आहेत। पूर्वी आक्रमणे खैबर खिंडीतून होत होती आज "खैबर पख्तूनका (KPK), बालाकोटमध्येच भारताचे शत्रू दडलेले होते । राष्ट्रभक्त मुस्लिम लोकांना काळजीचे कारण नाही हे ठसवणे तितकेच गरजेचे कारण त्यावेळी पण गार्दी लोक पेशवांंसोबत होतेच।
संक्रांत साजरी करताना पानिपतचे स्मरण गरजेचे आहे कारण त्यातून मिळणारी शिकवण पुढे संक्रांत ओढ़विणार नाही यासाठी उपयुक्त ठरु शकेल।
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।
छान
छान
>>साहजिकच पुढे थोरल्या
>>साहजिकच पुढे थोरल्या माधवरावच्या नेतृत्वाखाली मराठे लोकांनी नजीब खानाला धड़ा शिकवला।<<
माधवरावांच्या नेतृत्वाखाली? महादजी शिंद्यांच्या खांद्याला खांदा भिडवुन ते लढले काय? आणि नसतील लढले तरी त्यांचं श्रेय त्यांना का? छ. राजाराम (रामराजा) यांना का नाहि? शेवटी, पेशवे छत्रपतींचे चाकर होते, बरोबर?
स्वराज्य स्थापन केल्यावर महाराजांनी एक नियम घालुन दिला होता कि स्वराज्य सगळ्यांचं आहे, त्यात जहागिरदार, वतनदार इ. जागा नाहि. संभाजी महाराजांनी सुद्धा तो पायंडा पुढे पाळला, गणोजी शिर्के यांच्यासारखे अस्तनीतले निखारे जवळपास असुन हि. पुढे, पहिला बाजीराव स्वकर्तुत्वावर मोठा झाला पण पेशेवेपद आणि इतर सरदार यांच्यात वंशपरंपरागत सत्ता/अधिकार लायकि नसुनहि जाणं हे मराठा साम्राज्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं. वंशपरंपरागत आलेली सत्ता टिकवुन ठेवण्याकरता स्वकियांशीच तेढ निर्माण करण्यात पेशव्यांच्या पुढच्या पिढिने धन्यता मानली, अर्थात तो डाव त्यांच्यावरच यशवंतराव होळकरांनी चोप देउन उलटवला, पण या सगळ्यात नुकसान कोणाचं झालं असेल तर - मराठा साम्राज्याचं. पानीपतच्या दारुण पराभवानंतरहि मराठ्यांची एक्जुट टिकुन राहिली असती, तर काय बिशाद होती इंग्रजांची स्वराज्यावर वाकडी नजर टाकण्याची...