Submitted by सिद्धेश्वर विला... on 7 January, 2020 - 07:01
तुझा निरोप घेताना
मन दाटून आले
का कुणास ठावूक
पण माघारी फिरताना
मनी धैर्य कोठून आले
मन हिमाच्छादित गोठले होते
विचारांनी वेढले होते
हात हलत होते
निव्वळ तुझ्या हातांना प्रतिक्रिया म्हणून
डोळे स्तब्ध होते
हातांचे खेळ बघून
आठवणींचा भृंग पिंगाया लागला
क्लेशांचा अरी जोर धराया लागला
जवळच एका पारावर बसून
समस्त आठवणीना एक करून
वाज वळू लागलो
अश्रुनी दिवा भरून
माघारी चालू लागलो
==================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काय हे? निघालात की काय..??
काय हे? निघालात की काय..??
नाही ओ .. हा काय आलो परत नवीन
नाही ओ .. हा काय आलो परत नवीन काहीतरी घेऊन .. कळवा आपले मत ..