मनोरंजन

खंतवाणी (मनाचेच श्लोक ! )

Submitted by पॅडी on 1 April, 2024 - 00:06

एका चुकीपायी | झाले पानिपत
काय माझी गत | तुम्हा सांगू ||

तारुण्यात कोण | केला थयथयाट |
विवाहाचा घाट | घातला गा ||

आंधळा बा ऐसा | बांधले बाशिंग |
आणि रणशिंग | फुंकले म्या ||

मधुचंद्राचे रात्री | चौका-षटकार
गडी वाकबगार | ढेपाळला ||

खेळलो एकाग्रे | सामना प्रत्येक |
परि डाव कैक | अनिर्णीत ||

प्रारब्धी पिलांचे | येई संगोपन |
अता यष्टीरक्षण | चाललेले ||

वाईड , नो बॉल | कधी लेग बाय |
नित्य ठांय ठांय | बायकोची ||

टाकता बयेने | मुखे बाउन्सर |
कापे थरथर | कृश काया ||

विषय: 

प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.

स्वराज्य सौदामिनी तारा राणी

Submitted by निमिष_सोनार on 25 March, 2024 - 09:50

2022 ते 2024 दरम्यान जसे जमेल तसे सोनी लीव्ह वर "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" ही सोनी मराठी वरील सिरियल पाहून संपवली. एकूण 221 भाग आहेत. IMBD वर 10 पैकी 9.3 रेटिंग आहे. यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची कथा पुढे सुरु होते. झी मराठी वर "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिका मी बघितली नव्हती कारण तेव्हा जमले नाही, पण ती आत्ता बघायला सुरुवात केली. नंतरचा इतिहास आधी पाहिला गेला आणि आधीचा इतिहास आता बघायला सुरुवात केली.

मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

शब्दखुणा: 

गीत गाया रेसिपियों ने

Submitted by निमिष_सोनार on 21 March, 2024 - 09:52

आजकाल अनेकजण सोशल मीडियावर अखंडपणे रिल्स बनवतात आणि बघणारे ते अखंडपणे आपापले अंगठे वर सरकवत सरकवत बघतात. ज्या त्या प्रेक्षकवर्गाच्या आवडीप्रमाणे असंख्य प्रकारचे रिल्स उपलब्ध असतात. त्यापैकी एक लोकप्रिय रिल्स म्हणजे झटपट पाककृती शिकवणारे रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओ. खरेतर हे उपयुक्त असतात, कारण त्यात पदार्थ बनवताना लागणारे साहित्य, कृती नीट सांगितलेली असते आणि स्क्रीनवर ते साहित्य आणि प्रमाण टाईपसुद्धा केलेले असते.

पण कधी कधी अशा रेसिपीना उगाच बॅक्राऊंडला गाणे टाकलेले असते. तेव्हा त्यात कधीकधी विसंगती निर्माण होऊन खाद्यपदार्थ निर्मितीसोबत विनोदनिर्मिती सुध्दा होते.

स्कोप

Submitted by संप्रति१ on 12 March, 2024 - 09:58

सुजित नोकरीनिमित्त त्या शहरात आला तेव्हापासून तो एका पीजीमध्ये राहतो. पीजी म्हणजे जिथं नोकरी शिक्षणानिमित्त एखाद्या शहरात आलेली माणसं राहतात. जिथं तुम्ही चार जुजबी ओळखीच्या माणसांबरोबर राहणं जमवता.
माणसं येतात, राहतात काही काळ. मग निघून जातात. त्यांच्या जागी दुसरे येतात. जगण्याची ही अशी एक टेंपररी अवस्था असते. सुजितची दहा वर्षांपासून तशी ती आहे. गावाची आणि शहराची अशा दोन्ही पार्श्वभूमी असलेल्या त्याला कशाबद्दलही स्ट्रॉंगली काय वाटत नाही.‌‌ पुस्तकांबद्दल वाटतं. पण तो ही सवयीचा भाग.‌

विषय: 
शब्दखुणा: 

द्वेष : एक भय गूढकथा, भाग १०

Submitted by प्रथमेश काटे on 6 March, 2024 - 12:48

हलकेच दरवाजा पुढे लोटून राजाभाऊंनी घरात प्रवेश केला. त्यांच्या मागून जरा दबकतच सोनाली व प्रिया आत आल्या. हॉलच्या मध्यभागी श्री मघाशी प्रमाणेच पद्मासन घालून डोळे मिटून बसला होता ; पण आता उलट्या बाजूने. मघाशी प्रवेशद्वाराच्या बाजूने पाठ करून बसलेला तो आता दरवाजाकडे, म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून बसला होता. पुढे जमिनीवर मेणबत्ती मंदपणे, स्थिरपणे तेवत होती. तिच्या पलीकडे भस्माने बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे रिंगण केले होते.
कुणी काही बोलण्याच्या आधी श्रीने स्वतःहूनच हळूवारपणे डोळे उघडले. प्रियाकडे नजर वळवून तो शांतपणे म्हणाला -

शब्दखुणा: 

आद्याक्षरांवरून म्हण ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 March, 2024 - 11:07

दिलेल्या आद्याक्षरांवरून म्हण ओळखायची.
ज्या व्यक्तीने ओळखली तिने पुढील कोडे घालावे अथवा इतर कुणी घाला असे सांगावे.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन