आद्याक्षरांवरून म्हण ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 March, 2024 - 11:07

दिलेल्या आद्याक्षरांवरून म्हण ओळखायची.
ज्या व्यक्तीने ओळखली तिने पुढील कोडे घालावे अथवा इतर कुणी घाला असे सांगावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर रेवती.
माधव, तसंही चाललं असतं पण लक्षात आलं नाही. आणि तुम्हाला कळलंचकी Happy

असतील मुली तर पेटतील चुली>> ही म्हण पहिल्यांदा ऐकली
चुकली मुलगी ब्युटीपार्लर मध्ये>>>> अशी काही म्हण पण नाहीये..
किती sexist म्हणी काढताय..? का??

हिंट म्हणुन कंसात त्या शब्दातली अक्षरे देतोय (प्रत्येकवेळी दिलीच पाहिजेत असे नाही.)

मि(२) मु(४) दा(२) हा(४)

उत्तर बरोबर.
अज्ञानी संदर्भ देणे गरजेचे नाही.
मॉडर्न म्हणी आहेत इमेल फॉरवर्ड च्या काळातल्या. लोकप्रभा / चित्रलेखा मधे असायच्या.

म दीर्घ हवा होता. देताना याबद्दल गोंधळ होता आणि बृहद्कोषात मुठ शोधुन शब्द पाहिला पण घाईत नीट अर्थ वाचला नाही, एरर दिली नाही आणि मु(मू)ठ याचा अर्थ दिला एवढेच पाहुन मु लिहुन कोडे दिले.

नव्या म्हणी अधुन मधुन गंमत म्हणुन ठीकच. भर प्रचलीत म्हणींवर असावा असे सुचवतो.

पुढिल कोडे:
का मा पा दु ना

का क का का ए त झा ला >> ही म्हण तळजाईवर फिरणार्‍यांना परिचयाची असेल. आता माहीत नाही, काही वर्षांपूर्वी तरी तिथे लिहिलेली होती.

अशी म्हण असेल तर मला माहित नव्हती.
रघु आचार्यांचे उत्तर बरोबर आहे, अशी म्हण असेल तर तुमचेही बरोबर.

हिंट देते म्हणीन्च्या धाग्यावर आत्ता याच्या पहिल्या शब्दाशी साम्य असलेला शब्दाच्या म्हणी आहेत

चूक Lol
उत्तर आहे चोरून पोळी बोंबलून तूप

पुरणपोळी चोरून आणायची आणि त्यावर बोंबलून तूप मागायचं म्हणजे तूप कशाला तर पोळीला अस म्हणून पोळीची चोरी पण उघडी पडणार अस,म्हणजे गुपचूप एखादी गोष्ट करायची आणि related एखादी गोष्टी चा बोभाटा करायचा मग गुपचूप केलेल्या गोष्टी चा काय उपयोग

"मुच्ची हूर्णद होळगी हाकिद्दरे वदरी तुप्पा बेडिदा" असं ते कानडीत आहे चो पो बों तू.

ओह मग माझ्या कानावर ही म्हण आजी कडून च पडली असेल. तीच माहेर कर्नाटकात बॉर्डर ला होत आणि तिला थोडं कन्नड यायचं

"मुच्ची हूर्णद होळगी हाकिद्दरे वदरी तुप्पा बेडिदा" असं ते कानडीत आहे चो पो बों तू. >> द्वैभाषिक म्हणीसंचार आवडला.

बा द वे, मुच्ची म्हणजे बंद करणे ना? बायी मुच्ची - म्हणजे तोंड बंद कर. का इथे काही वेगळा अर्थ आहे? हूर्णद होळगी हाकिद्दरे = पुरणाची पोळी घालून/ठेवून हे कळलं. "वदरी तुप्पा बेडिदा" - ही उत्तर कर्नाटकातली भाषा आहे का?

<<का क का क न लु धां क ( जळगावकडची म्हण. रिकामा न्हावी........ अर्थाची)>>
हे सोडवायचे आहे अजुन. हिंट द्या SRD.

हपा, दोन्हीं अर्थ आहेत. यल्ले मुच्चि इट्टी म्हणजे कुठे लपवून ठेवलस या अर्थी. लपवून पुपो वाढले तर ओरडुन तूप मागतोय असा अर्थ घेतलाय. मी पण हे माझ्या आजी कडूनच ऐकलं आहे. ती कोप्पल ची आणि कोप्पल उत्तर कर्नाटक. यू आर राईट.

बाय द वे, "चोर ने के चोरी कर अने सावकार ने के जागतो रे." या गुजराती म्हणीचा अर्थ म्हणजे चोराला सांगायचं ( सावकाराच्या घरात) चोरी कर आणि सावकाराला सांगायचं की जागा रहा. अशा अर्थाची एखादी मराठी म्हण आहे काय?

Pages