आद्याक्षरांवरून म्हण ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 March, 2024 - 11:07

दिलेल्या आद्याक्षरांवरून म्हण ओळखायची.
ज्या व्यक्तीने ओळखली तिने पुढील कोडे घालावे अथवा इतर कुणी घाला असे सांगावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोराला सांगायचं ( सावकाराच्या घरात) चोरी कर आणि सावकाराला सांगायचं की जागा रहा. अशा अर्थाची एखादी मराठी म्हण आहे काय?>>>>>>>> तू मारल्यासारख कर, मी रडल्यासारख करतो

+ १

थोडं दुर्लक्ष झालं धाग्याकडे.

का क का क न लु धां क ( जळगावकडची म्हण. रिकामा न्हावी........ अर्थाची)
काय करू काय करू नवीन लुगडे धांडे करू
थोड्या फाटलेल्या कपड्यांना दुसऱ्या कापडाचा तुकडा शिवणे म्हणजे धांडे करणे. एका नवऱ्याला काम नसते म्हणून तो बायकोच्या नवीन लुगड्यालाच धांडे करतो.

आठ हात काकडी नऊ हात बी म्हणजे अतिशयोक्तीचे वर्णन ना.
.........................
गुजराथी म्हण - मामानी शादी अने मा पिरसण - मामाच्या लग्नाच्या जेवणात आईच वाढायला आली ... तर तूप जास्तीच वाढणार ना.
मराठी म्हण थोडी जवळपास
आ हा ज ?

Srd, आपला हात जगन्नाथ?
पण अर्थ तुम्ही गुजराती म्हण लिहिली आहे त्यापेक्षा वेगळा आहे.

गुजराथी म्हण
लक्ष्मी चांदलो करवा आवे त्यां हाथ धोवा जवू.
= जेवणावळी उठणार तेव्हा यजमानीण बाई प्रत्येकास काही भेटवस्तू देण्यास आली तेव्हा हा आमंत्रित अगोदरच उठून हात धुवायला गेल्याने ते मिळाले नाही.
या अर्थाची मराठी म्हण कोणती असेल? मला सुचत नाही. अगदी मोक्याच्या क्षणी हजर नसल्याने लाभ न मिळणे. किंवा संधी साधण्यात चुकणे या अर्थाची.

डाहयी सासरे न जाय अने गांडीने सिखामण आपे

शहाणी स्वतः सासरी जात नाही अन वेडीला उपदेश करते.

अर्थात स्वतः काम न करता दुसर्याला उपदेश करणे

दैव देतं, कर्म नेते. . बरोबर आहे.

-______________________________________
इतर भाषेतल्या म्हणी लिहायच्या का ? त्या देऊन मराठीतल्या शोधायला पाहिजेत.

हिंदी म्हण - ( मध्य प्रदेशात प्रचलित)
सियार की मौत आती है तब वह गाँव की तरफ भागता है।
( वाईट वेळ आली की चुकीचे निर्णय घेतले जातात. सियार - कोल्हा रानात राहतो. तिथे काही शिकार मिळाली नाही, खायला मिळालं नाही की तो गावात जातो कोंबडी मिळवायला आणि मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडतो.)
मराठीत कोणती ?

वि का वि बु

आपण इतर भाषेतल्या म्हणी लिहायच्या का ?>>
चालेल, कोणत्या भाषेतली आहे हे कोड्यात नमुद करावे.
मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेतील म्हणी असतील तर फार लोक सहभागी होऊ शकतील असे वाटत नाही, पण त्यातही प्रयत्न करून पहायला हरकत नाही.

ह प शे
कोकणी म्हण. ' भांगेत तुळस ' च्याच अर्थाची, पण उलट मांडणी.

मी ही म्हण मान सांगावा जनात नि अपमान सांगावा मनात अशी वाचली आहे, पण ठेवावा मनात हेच योग्य वाटतं.

चोराला सांगायचं ( सावकाराच्या घरात) चोरी कर आणि सावकाराला सांगायचं की जागा रहा. अशा अर्थाची एखादी मराठी म्हण आहे काय?>>>>>>>> तू मारल्यासारख कर, मी रडल्यासारख करतो >>>

एकाला सांगायचे पकड आणि दुसर्‍याला सांगायचे धाव

Pages