गावाच्या बाहेर असलेल्या त्या भव्य झाडाबद्दल एक कहाणी गावकऱ्यांनी अनेकदा इतरांना सांगितली होती. काहींना ती पटत नव्हती. लहान मुलांना त्या झाडाखाली खेळणं नेहमीच आनंददायी वाटायचं. पण त्या झाडावर टमक्या नावाचा वेताळ वास करतो, हे सर्वांनाच ठाऊक होतं. टमक्याची कहाणी सांगताना लोकांच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव पसरायचा. संध्याकाळी आठ वाजेनंतर सकाळचा सूर्योदय होईपर्यंत त्या झाडाभोवतीच्या वर्तुळाकार परिघामध्ये कोणीही जात नसे. ते झाडही तो टमक्या तोडू देत नव्हता. दिवसभरात केव्हाही ते झाड तोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस रात्री आठ वाजेनंतर जिवंत रहात नसे. झाडाला कुंपण बांधणेसुद्धा त्याला मान्य नव्हते.
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
दुर्गेश आणि अन्विता हे नवविवाहित दांपत्य काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नव्या घरात राहायला आले होते. त्यांचं नवीन दोन मजली घर नुकतंच त्यांनी शहराच्या बाहेर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घेतलं होतं. रात्रीची वेळ होती, आणि दूरवर झाडांच्या सळसळण्याचा आवाज सोडून आजूबाजूला अगदी शांतता पसरली होती. दुर्गेशने घराच्या बाहेर एका मोटारीचा थांबण्याचा आणि दार उघडून कुणीतरी उतरण्याचा आवाज ऐकला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. घराचा दरवाजा उघडून त्याने बाहेर इकडे तिकडे जाऊन पहिले पण कुणीही दिसले नाही.
द बर्निंग ट्रेन हा चित्रपट पाहताना जेव्हां बचावकार्य सुरू झाले तेव्हां न राहवून चिकवा - १० वर प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर धागा पळू लागल्याने वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद हलवण्याची सूचना आली. ती पटली आणि शिरसांवंद्य समजून वेगळा धागा सादर करत आहे. नवे प्रतिसाद या धाग्यावर देऊ शकता.
ती सूर्यप्रकाश नसलेली जुलै महिन्यातील पावसाळ्यातील सकाळ होती. दहा वाजले होते. उभ्या रेषांचा हिरवा टीशर्ट आणि करड्या रंगाची जीन्स अशा पेहरावात "दामोदर दूधखुळे" हा महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनवरील "मज्जा पॉइंट" जवळ असलेल्या संरक्षक कठड्यावर निवांतपणे हात ठेऊन समोरचे निरीक्षण करत उभा होता. नुकताच पाऊस पासून गेलेला होता. आजूबाजूचे छोटे मोठे धबधबे वाहते झाले होते.
मनात माझ्या येते अवखळ
मनात माझ्या येते अवखळ काही बाही
सदा कदा ते शोधत जाते, खुळेच पाही
मूल होऊनी बागडते ते अंगणदारी
फुलपाखरे शोधीत बसते सांज सकाळी
दुःख उराशी कधी काळचे कुरवाळुनिया
थोपटून ते जागे करते वेळी अवेळी
मधेच शोधे पुढील काही धसकुन जाई
उगाच खंती करता करता गाणे गाई
नित्य नवे हे चाळे निरखित दिवसा राती
किती गुणाचे बाळ म्हणोनि कौतुक पाही
समजाउनिया ऐकत नाही, चापट देई
लांब उभा मी, मनात येवो काही बाही
चित्रपट दीवार
शशी कपूर पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर आला आहे. त्याला फोन कॉल आला आहे. निरोप देणारा पोलीस "लडकी का फोन" म्हणताना चांगलाच जळलाय. हा इकडे पोरीबरोबर बोलतो आणि समोरून नीतू सिंग धावत येते.
दोघे पोलीस म्हणतात " कम सून !"
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय सारी धडपड"
जरी हे जगास कथितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी?
"तोंड आणि शरीर लहान पडते म्हणून मोठा मासा हा मगरीला आणि शार्कला खाऊ शकत नाही. त्यामुळे तो छोट्या माशाला खातो" या म्हणीप्रमाणे, आजकाल भारतातील ट्राफिक झाली आहे. विशेषकरून शहरांमध्ये!
"हीट एंड रन" अपघात आता इतके कॉमन झाले आहे की, बिचारा कॉमन मॅन पटापट मृत्यूला प्यारा होऊ लागला आहे. आता "सुपर मारिओ" या मोबाइलमधल्या "जंप एंड रन" या प्रकारात मोडणाऱ्या गेमसारखा "हीट एंड रन" गेमपण लवकरच बाजारात येईल. रस्त्यावरील वाहने म्हणजे यमदूतांनी नेमून दिलेले असिस्टंट आहेत की काय असे वाटण्यासारखी भीषण परिस्थिति झाली आहे!
अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली.