Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा केल्याबद्दल थँक्स.
धागा काढण्यासाठी थँक्स सोनाली.
रविवारचा नाही बघणार, नाच गाणी आणि intro असतो फक्त. सोमवारी बघेन.
मस्त, 10 स्पर्धक फिक्स झालेत
मस्त, 10 स्पर्धक फिक्स झालेत
अंकिता वालावलकर
वर्षा उसगावकर
शुभंकर तावडे
शुभकरची गर्लफ्रेंड समीक्षा टक्के
अभिजित सावंत
एक युक्रेन मधील परदेशी स्पर्धक erina
Nikki तांबोळी
वैभव चव्हाण
Splits Vila मधील अरबाज पटेल
कोल्हापूर youtuber
Rapper आर्या जाधव
कसं समजलं.
कसं समजलं.
वर्षा असेल हा अंदाज होता.
बिबॉच्या चाहत्यांना शुभेच्छा
बिबॉच्या चाहत्यांना शुभेच्छा !
हिंदी आणि मराठी दोन्हीही बघत नाही.
बरं झालं धागा आला !
बरं झालं धागा आला !
अभिजीत सावंत , निक्की तांबोळी सोडून कोणी माहित नाही, तरी बघताना मजा येतेच एक एक कॅरॅक्टर्स बघताना.
मागच्या वर्षी सारखा बायस्ड नसेल तर चांगला होईल सिझन !
वर्षा उसगावकर खरच येणारे कि अफवा आहे ?
रितेश देशमुख वर मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आहे .
यु ट्युबर्स इतके फेमस
यु ट्युबर्स इतके फेमस होताहेत…..
चाहत्यांना शुभेच्छा…
दोन तीन नावे सोडली तर बोअर
दोन तीन नावे सोडली तर बोअर आहे लिस्ट (जर खरी असेल तर) आणि त्यातून रितेश चावडी घेणार..... अवघड आहे!!
रितेशला फार जड जाऊ नये म्हणून फार एस्टाब्लिश लोक नसतील बहुतेक या सीझनमध्ये.
अर्थात दोनचार आठवड्यांनीच कोण किती पाण्यात आहे हे लक्षात येईल
पण आताश्या फार प्रेडिक्टेबल व्हायला लागलेय बिग बॉस आणि त्यातून टास्कमध्ये पण शून्य क्रिएटिव्व्हीटी असते!!
पहिल्या सीझनची मजा नाही
कोल्हपुर youtuber Dhananjay
कोल्हपुर youtuber Dhananjay Powar
मागच्यावेळी तेजु आवडलेली आणि
मागच्यावेळी तेजु आवडलेली आणि तिला जावं लागलं, नंतर अमृता आवडली पण तिलाही जावं लागलं. मग त्यातल्या त्यात कंटेंट देणारे पहिले 3 नंबर लावले ते बरोबर होते, सगळे व्हिलन कॅटेगरी, नंतर एक नंबर आला त्याने व्हिलनपणा कमी केला पण अगदी शेवटी, कलर्स हिंदीचा हिरो म्हणून त्याला झुकतं माप दिलं असावं पण मनापासून आवडलेली व्यक्ती तेजुच होती.
प्रसाद बऱ्याच जणांचा लाडका होता पण मला नव्हता आवडला.
खरंतर बरेच जण हिंदी बघत होते आणि trp ही नव्हता.
त्या आधीच्या सिझनमध्ये मीनल लाडकी होती. पहिला सिझन स्मिता लाडकी, मेधा आवडली. दुसरा सिझन शिव वीणा आवडले. हुश्श, झालं लिहून. यावेळी कोण आवडतं, बघुया.
रितेश भाऊ मला तरी आवडले
रितेश भाऊ मला तरी आवडले.उसगावकर माझ्या आताच डोक्यात गेली.तिला लवकर हाकला नाहीतर अतिशहाणेंसारखी सीट अडवून बसेल.
अंकिता राहिल म्हणजे ठेवतील शेवटपर्यंत.निखिल दामलेबरोबर कलर्सचा आणखी कुठला फेस आहे आणि कलर्सला कोण हव आहे त्यावर कोण राहिल ते कळेल.
आलीना उसगावकर. मला वाटलंच
आलीना उसगावकर. मला वाटलंच येईल ती. ती मला पहा आणि फुलं वाहा करेल बहुतेक . सुख मध्ये चांगलं काम केलेलं मात्र, दिसते ग्रेसफुल पण गर्व आहे तिला.
निखिल दामले म्हणजे रमा राघव मधला राघव का. कलर्सचा चेहेरा, शेवटी पाचात असू शकेल. मालिका आज संपतेय बहुतेक.
मी आत्ता लास्ट मोमेंट ला
मी आत्ता लास्ट मोमेंट ला लावलं कारण मला नाच गाणी बघायची नव्हती.
पॅडी दिसला, जीव माझा गुंतला वाली अंतरा म्हणजे योगिता चव्हाण दिसली, ही आणि तिचा नवरा म्हणजे त्या सिरीयलचा हिरो मागे विशाल चे मित्र म्हणून भेटायला आलेले. विवेक सांगळे येईल वाटलेलं पण त्या सिरीयलमधली व्हिलन आलीय.
निखिल दामले लेटेस्ट चेहेरा कलर्सचा, नीट वागला तर शेवटी पाचात नक्की.
बरा झाला प्रीमियर!!
बरा झाला प्रीमियर!!
रितेशचे उच्चार बऱ्यापैकी सदोष असले तरी त्याचा एकंदर वावर चांगला वाटला..... हळूहळू त्याला आणि आपल्याला पण सवय होईल
अंकिता आणि डीपी दोघांचेही फॅन फॉलोइंग चांगले आहे त्यामुळे ते जातील पुढेपर्यंत..... बाहेर त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे पण आत डीपीने अंकिताला एकदम थंडा रिस्पॉन्स दिला असे जाणवले!!
वर्षा उसगावकर मिनिमम गॅरेंटी घेऊन आल्या असतील त्यामुळे त्या राहतील बरेच दिवस (कदाचित फिनालेपर्यंतही)
ती योगिता चव्हाण पण हुश्यारीने खेळेल असे वाटतेय.... पॅडी, तो पुढारी आणि किर्तनकार जातील अध्येमध्ये!!
निक्की आणि अरबाझ एकमेकांना धरुन जातील बहुतेक पुढ्येपर्यंत!!
तो रमा माधवचा हिरो एकदम मवाळ वाटतोय सध्यातरी!!
बाकी लोकांबद्दल अंदाज यायला वेळ लागेल
ती योगिता चव्हाण पण
ती योगिता चव्हाण पण हुश्यारीने खेळेल असे वाटतेय.... >>>मला पण हेच वाटतंय....तसं आत्ताच जास्त काही सांगता येणार नाही...पण ती सगळ्यात जास्त आवडली.. एकदम positive वाटली...मला आर्या पण आवडली...सगळ्यात जास्त डोक्यात गेली ती जान्हवी...आणि इतक्या चांगल्या contestants मध्ये ते 'गुलीगत' प्रकरण का आणलं ते त्या bigg bossलाच माहीत...
रितेश देशमुख आवडला एकदम..
रितेश देशमुख आवडला एकदम...अजिबात बोअर केलं नाही त्याने उलट त्याच्या sarcastic comments आवडल्या...अभिजीतला म्हणे तू आधी दिसायचा तस्साच आहेस अगदी. आणि गुलीगतला म्हणे तुम्हाला बघून प्रसन्न वाटलं...
अंकिता कोण.
अंकिता कोण.
जान्हवी तीच ती व्हिलनबाई, ती अशीही सिरीयलमध्ये डोक्यात जायची म्हणून मी बघत नव्हते, विवेक सांगळेची सिरीयल, भाग्य दिले तू मला. जान्हवी किल्ले दार त्यात व्हिलन होती, एकच style, बोअर अभिनय.
बरा झाला की प्रिमियर. रितेश
बरा झाला की प्रिमियर. रितेश नॉट बॅड. सदोष भाषा खटकत होती जरा पण.
कन्टेस्टन्ट पैकी वर्षा उसगावकर विचित्र कृत्रिम आणि अवघडलेली वाटली. रमा माधव हिरो बावळट वाटला एकदम. रिक्षावाली योगिता स्मार्ट आहे. कोकण हार्टेड गर्ल पण स्मार्ट वाटली. पॅडी , कीर्तनकार बाबाचे फार चालेल असे वाटले नाही. बॉडी बिल्डर हिरोपैकी वैभव चव्हाण विशाल ची स्टाइल मारत होता असं वाटलं जरा. तो लहान दिसणारा राजकीय नेता एक चॅप्टर कॅरेक्टर दिसतंय
अन तो कोण गुलीगत? काय ध्यान आहे! पण त्याची मज्जा येईल तिकडे, बिचुकले टाइप इरिर्टेट करेल बहुतेक लोकांना. आणि आपल्याला एन्टरटेन! तो पवार कोण इन्फ्लुएन्सर आहे तो फार बोअर वाटला.
बाप रे हि काय लिस्ट आहे? मी
बाप रे हि काय लिस्ट आहे? मी फक्त धाडे बाई होत्या तो सिझन पाहिला होता. नन्तर काही धाडस झाले नाही.
एकूण रील स्टार्स विरुद्ध
एकूण रील स्टार्स विरुद्ध ऍक्टर्स अशी थीम दिसते आहे. हिंदीत पण युटूबर्स/रील स्टार्स जिंकत आहेत. त्यांचा फॅन बेस कट्टर असतो व वोट पण करतो.
वर्षा ऊसगावकर अतिशय कृत्रिम वागत होती. मी एवढी मोठी स्टार, मी कोणालाच ओळखत नाही , पॅडीला अंशुमन म्हणणे, इतरांना तू ऍक्टर आहेस का असे विचारणे अशी नाटके करत होती. आता बिग बॉस मध्ये येताना सर्वजण आपले कोण प्रतिस्पर्धी आहेत ह्याची पूर्ण माहिती काढून येतात त्यामुळे तिला काहीजण सोडले तर कोणी माहित नसेल ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण ती फिनाले पर्यंत जाणार हे नक्की. योगिता चांगली वाटली. निकी अतिशय ड्रॅमेबाज व बिग बॉस मटेरियल आहे त्यामुळे कल्ला होणारच. पण यावेळी एकूण चांगले कॉन्टेस्टंट्स मिळवले आहेत मराठीत.
रितेशचे केस प्रोमोत छान वाटत होते. पण काल नाही आवडले. त्याची सुरवात जरा चाचपडत झाली पण नंतर तो बऱ्यापैकी सरावला पण उच्चार कानाला त्रास देतात. बघूया पुढे.
नेहमीप्रमाणेच चिकन, मटण, अंडी, कॉफी, आणि पाणी यावरून भांडा हे प्रीमियर मध्येच सुचवले आहे. बोर होते ते. त्यामुळे मी अधून मधून पाहीन.
झाली ना लिस्ट खरी ?
झाली ना लिस्ट खरी ?
सुरज चव्हाण आणि पॅडी कांबळे हे सरप्राईज होते
पाणी तोडलंय , आता भांड्याला भांड लागणारच , मज्जा येणार आहे , OTT दिवसभर लिव्ह असते तसेच मराठी बिग बॉस दिवसभर लाईव्ह असेल का जीव सिनेमा प्रीमियम वर ?
शुभंकर तावडे आणि त्याची
शुभंकर तावडे आणि त्याची गर्लफ्रेंड समीक्षा टक्के दोन्ही नवे कन्फर्म आहेत , पाट्या पण १८ आहेत आणि १६ स्पर्धक आत आलेत, कदाचित हे दोघेही जण कन्टेन्ट कमी होईल तेव्हाची राखून ठेवलेले पत्ते आहेत असे आतातरी वाटतंय
एपिसोड कुठे बघायला मिळतील ?
एपिसोड कुठे बघायला मिळतील ?
शुभंकर तावडे आणि त्याची
शुभंकर तावडे आणि त्याची गर्लफ्रेंड समीक्षा टक्के दोन्ही नवे कन्फर्म आहेत ,......वाईल्ड कार्ड एंट्री असतील.
उसगावकर म्हणजे"झगामगा आणि माझ्याच कडे बघा"हा प्रकार आहे.
बाकी ,कंटेस्टंपैकी तो रँपर ,कीर्तनकार लवकर जातील.
निक्की तांबोळीला मध्येच कधीतरी काढतील.
मागच्या वेळेसारखा फ्लॉप जाऊ नये म्हणून जवळजवळ हिंदीसारखा केला आहे.
>>म्हणून जवळजवळ हिंदीसारखा
>>म्हणून जवळजवळ हिंदीसारखा केला आहे.
त्या नादात धेडगुजरी झाला नाही म्हणजे मिळवली
तसेही काल हिंदी गाण्यावर नाचतच एंट्री घेतली बऱ्याच जणांनी!!
पहिल्याच भागात इतके चिकन आणि मटणाचे उल्लेख आणि तेही रितेश गेली काही वर्षे वेगनची भलामण करत असताना?
बिग बॉसच्या एकदोन क्लिप काय बघितल्या यूट्यूबवर आणि आता त्या टुकार रिव्ह्युवर्सचे व्हिडिओज फीडमध्ये यायला सुरुवात झाली
आता इतके सगळे बदललेय यावर्षी तर ते दांडगट रानटी टास्क बदलून जरा डोके लावायला लागणारे टास्क द्या यावर्षी
ती शेवाळी टिशर्ट वाली कोण
ती शेवाळी टिशर्ट वाली कोण होती, तिला नाही ओळखलं. आज योगिता, अ सा, ती शेवाळी टिशर्ट वाली, कीर्तनकार तसे गप्प होते.
वर्षा, पुढारी, पॅडि, एरिना, जान्हवी, अंकिता जास्त फुटेज घेत होते.
तो डी पी आवडला मला, पंचेस जास्त टाकतो. गुलीगत काही माहिती नव्हतं, आज समजलं. त्याला म्हणजे सूरजला एकेकाळी खूप पैसे मिळायचे, मित्रांनी फसवलं म्हणाला, पैसे नीट जपून वापरायला हवेत, कधी खाली येऊ सांगता येत नाही.
पुढारी मुळे कुठला नेता पडला, जो कायम निवडून यायचा, काही लिंक लागत नाहीये.
पुढारी मुळे कुठला नेता पडला,
पुढारी मुळे कुठला नेता पडला, जो कायम निवडून यायचा, काही लिंक लागत...
पुढार्याला काढायच असेल तेव्हा त्याच्या असल्याच स्टेटमेंट्सचा वापर करून काढतील.
बाकी उसगावकर बाई किती म्हणजे किती नाटकी बोलतात.
ती जान्हवी पण डोक्यात जात आहे.क्रुत्रिम वागत आहे.
त्या मानाने मग निक्कीच आज बरी वाटली.
त्या फॉरेनरला का घेतल आहे ते बिबॉसलाच माहित.
जान्हवी सिरीयल सारखीच इथेही
जान्हवी सिरीयल सारखीच इथेही डोक्यात जाते.
मला उसगावकरचं टॉयलेट आणि बेडस बाबत पटलं, एरवी ती नाटकीच वाटली.
मला वॉशरूम एरियातले डिझाईन डोळ्यांना जाम त्रास देतंय, जाम विचित्र आणि भडक वाटलं.
नवरा आणि मी आजचा एपिसोड
नवरा आणि मी आजचा एपिसोड भक्तिभावाने बघितला. (आद्य मराठी बिग बॉस फॅन).
बरेच बोर वाटले. नेहेमीप्रमाणे जरा फालतूची गर्दी ओसरली की नीट अंदाज यायला लागेल.
ती लिप जॉब केलेली कोण आहे ती फार विचित्र आहे. सॉरी टू से पण तो सूरज डोक्याने कमी वाटतो. अभिजित सावंत सध्या फक्त अंदाज घेतोय किंवा passive व्यक्तिमव असावे. तो कोल्हापूरचा पुरुषोत्तम कॉमन मॅन आहे आपल्यासारखाच. पॅडी सगळ्यात जास्त सेंसिबल वाटतो. वर्षा उसगावकर यांनी अपेक्षेप्रमाणे मी - माझं - मी सांगते ते ऐका - मला तब्येतीच्या कारणासाठी ब्ला ब्ला टाईप सुरू केलेलं आहे. थोडे दिवसांनी कोणीतरी त्यांना उलट सुलट बोलेल आणि मग त्या वयाचा मान.. सिनियोरीटी.. फिल्म इंडस्ट्री मधला मान वगैरे टेप लावतील. दर वेळी एका सिनियर लेडी सेलिब्रिटीला आणून संगीत मानापमान खेळायला बिग बॉसला खूप आवडते. मागच्या वेळी किशोरी शहाणे आणी त्याच्या आधी सुरेखा पुणेकर होत्या ना?
मराठी व्याकरणाने बिग बॉसच्या दारात जीव दिलेला आहे इतकं भयाण मराठी बोलत आहेत बरेच लोक.
त्या फॉरेनरला का घेतल आहे ते बिबॉसलाच माहित. +१
तिला पहिल्या आठवड्यात
तिला पहिल्या आठवड्यात काढण्यासाठी घेतलं असेल.
वर्षा उसगावकरांचे सासरे
वर्षा उसगावकरांचे सासरे म्हणजे संगीतकार रवी. त्यांना तिने खूप त्रास दिला.
घरात दोन भाग करणारी लाईन आखली होती. शेवटी ते कोर्टात गेले होते.
( घरात रेष मारलेलं कुठल्या सिनेमात होतं ? )
Pages