बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकिता कॅप्टन कशी झाली हे इमॅजिन करता येत नाहीये Happy खरंच अहे का ते? तो अ‍ॅक्ट रायडर अन इतर यूट्यूबर्स फालतू गोष्टी उगीच रंगवून सांगतात. काल ब्रेकिंग न्यूज , हेडलाइन वगैरे निकीचा ग्रुप फुटला वगैरे होत्या पण तसे काही वाटले नाही अजिबात. थोडे फार वाद झाले पण तेवढे मोठे काही नाही. निकी खरंच हुषार प्लेयर आहे. तिने काल मस्त गेम केला आपल्याच ग्रुप चा.त्यामुळे ते निगेटिव आणि ती पॉझिटिव दिसली काल.
गंमत म्हणजे मनात येईल तेव्हा ती तसे पुन्हा करू शकते आणि तरी त्यांना तिच्याशिवाय पर्याय नसणार.
अभिजीत आता लीडर दिसतो आहे ते चांगले आहे. त्याला ऑपोजिट ग्रुप जरा रिस्पेक्ट पण देत आहेत. ( की त्यांनाच तो विरोधी लीडर म्हणून चालेल पण इतर कोणी नको आहेत?) तो डिपी स्मार्ट आहे पण अजिबात कुठल्याही भांडणात कुणाची साइड किंवा काही स्टँड घेत नाही, तो त्याच्या युट्यूब चॅनल कॉमेडी कन्टेन्ट मोड मधेच असतो नेहमी. पुढारी मस्त एन्टरटेन करतोय. त्याला कुणी सिरियस कन्टेस्टन्ट मानत नाही असे वाटते पण महत्त्वाच्या वेळी दोन्ही पैकी कोणत्याही ग्रुप चा गेम प्लॅन पलटवून टाकण्याचे पोटेन्शियल आहे त्याच्यात!
आर्या आणि अंकिता ने बॅकसीट घ्यायला नको. त्या दोघी आणि अभिजित मिळून स्ट्राँग ग्रुप बनवला तर टफ फाइट देतील. योगिता आणि सूरज ला घरी जाऊ द्या आता. त्या निखिल ला पण घालवा.
जान्हवी का रडली ते कळलेच नाही मला. कुठला प्लॅन तिचा होता आणि निकीने क्रेडिट घेतले? तसाही कुठला असा गेम जिंकलेत ते ? तिला अँगर इश्यूज दिसतात. किंवा तसे दाखवायचे हाच गेम असेल तिचा. वर्षा उसगावकर एखाद्या नाटकातलं कॅरेक्टर असावं तशी स्वगतं आणि डायलॉग बोलत एकटीच फिरते असे वाटते. अनसीन अनदेखा च्या क्लिप्स दिसतात त्यात जरा गप्पा मारताना दिसते अधून मधून. पण तरी एकूण रथ दोन बोटे वर असल्यासारखे वागणे असते, ती हिरॉइन आणि बाकीचे सेटवरचे एक्सट्रा असावेत असे.

अंकिता कॅप्टन झाली असेल तर आत्ता मुद्दाम नडणार सगळे तिला व्हिलन ग्रूपमधले..... कस लागेल तिचा दुसऱ्याच आठवड्यात आणि ती किती पाण्यात आहे ते पण कळेल!!
काल त्या पुढाऱ्याला समजावताना तिने जरा चमक दाखवली आहे!! ती आर्या तिथे आल्यावर जेंव्हा पुढाऱ्याचे न ऐकता तिथेच बसून तिने ते संभाषण संपवले ते आवडले ::)

मस्त होता आजचा एपिसोड...वर्षा ताईंनी अतिशय योग्य decisions दिलेत...त्यांनी पहिल्या round मध्ये निर्णय दिल्यानंतर अरबाजने अभिजीतला खूप विचित्र पद्धतीने ढकलून मारलं...पण अभिजीत काहीच बोलला नाही...जान्हवी किती विचित्र वागतेय...अगदीच बावचळल्यासारखी करते...कित्ती राग राग करते.. बापरे मला तर निक्कीपेक्षा तीच danger वाटते...पण या वेळी भाऊच्या धक्क्यावर रडण्याची वेळ तिचीच असेल ...निकीने मात्र एक आठवड्यात एकदम बदल केलाय स्वतः मध्ये...आणि त्या पुढाऱ्याचं काय मधेच?? किती ती रडायची अ‍ॅक्टींग...तो बोलायला लागला की जाम हसायला येतं...आर्या मस्त strong आहे...पण खूपच emotional आहे...तिने तिचे emotions थोडे control करायला पाहिजे...

मी काय पाहत नाहीये सिजन हा

पहिला सिजन भारी होता.

नंतर एका सिजनला इथल्या कॉमेंट वाचून विशाल जिंकलेला त्यातले काही एपिसोड पाहिले होते.

वर्षा उसगावकर आणि सचिन पिळगावकर
सिनेमा मध्ये ह्यांचे मराठी इतके खटकत नव्हते.
पण इतर वेळी ते बोलतात तेव्हा काहीतरी कृत्रिम ऐकतोय असेच वाटते. हे लिहायला आलो इथे.

मी आज नऊ ते साडेनऊ बघितलं. पहीला वर्षाताईंचा निर्णय बायस्ड वाटला नाही मला. अभिजीत सिटवर होता नीट, वर्षाताई कन्फुस्ड होत्या पण निर्णय बरोबर दिला.

मी आधी लिहिल्याप्रमाणे जान्हवीची व्हिलन नंबर एक होण्याकडे वाटचाल. ती सिरियलमध्ये डोक्यात जायची, एकसूरी अभिनय, इथेही जातेय. तिला निक्की पुढे जाईल ही भीती वाटतेय आणि सावली म्हटलं रितेशने म्हणूनही असेल. कलर्स फेस म्हणून तीच असेल फायनल पांच मध्ये. दामले आणि योगिता काहीच धड करत नाहीयेत. अरबाझ टोटली व्हिलन झालेला आणि हा जळतो अभिजीतवर . दामलेला काढणार नाहीत लवकर पण तो एकदम पुचाट वाटतोय.

अंकिता जिंकलेली बघितलं नाही. डीपिने सीट पकडली आणि योगीता सीटवर बसली ते बघितलं होतं, नंतर मला वेळ नव्हता, तिने अंकिताचं नाव घेतलं असेल तर अंकिता झाली असेल, त्या फ्रेंडस झाल्यात चांगल्या.

निक्की, pady, सुरज, निखिल, पुढारी नॉमीनेट झाले अशा न्यूज येतायेत.

सुरज किंवा pady जातील बहुतेक. निखिल जायला हवा, तो काय करतो घरात. योगिताही काही करत नाही पण ती नॉमिनेट नाही. निखिल जस्ट सिरियल संपवून आलाय म्हणून तो डायरेक्ट कलर्स माणूस आहे पण म्हणून त्याने असेल माझा हरी (कलर्स चॅनेल) तर देईल खाटल्यावरी असं करायचं का.

मेकर्सनी निक्षून सांगायला हवं, काही केलं नाहीत तर बाहेर काढणार. ती जान्हवी खुनशीपणा करून तरी दिसते. ही दोघं काहीच करत नाहीत.

हो वर्षा उसगावकर यांनी योग्य तो निर्णय दिला आहे . अरबाज , जान्हवी आणि निक्की आता मला माणूस कमी आणि गुंड जास्त वाटू लागलेत .
किती ती गुंडगिरी ? पिवळ्या रेषेच्या बाहेर पाय , ढकला ढकली, जाहीर निषेध , संचालकांना उलट उत्तर देणे , कोणीही कॅप्टन झालं तर मी काम करणार नाही अशी धमकी देणं.

मला एक सांगा , या लोकांना वोट करायचं असेल तर कसं करायचं ? मार्गदर्शन करणारी काही वेबसाईट वगैरे आहे का ?

उसगावकरांच संचालन चांगलं होतं पण फारच नाटकी बोलण आता ना डोक्यात जायला लागलं आहे.
जान्हवी बहुतेक निक्की होण्याचा प्रयत्न करत आहे.हे निक्कीला कळून चुकलं आहे.ती बरोबर जागा दाखवेल जान्हवीला.आर्याने रडणं थांबायलाच हवं.सारख काय मला मारलं ,मला मारलं.आधीचे सिझन पाहिले नाहीत का हिने काय काय झालं होतं ते.
योगिता अपेक्षेपेक्षा टास्क चांगला खेळली.
अभिजित आता मुरला आहे,तो जाईल पुढे.पण आता अंकिता मध्ये विनिंग मटेरियल दिसायला लागलं आहे हळूहळू.योग्य वेळी योग्य पत्ते टाकले तर विनर होऊ शकेल.
अरबाजने राग कंट्रोल केलाच पाहिजे.
दामले तर"अरे मी कुठे आलो"अशा थाटात वावरत आहे.त्याला बहुतेक इंटरेस्ट नाही किंवा गेलेला दिसतो,जर नॉमिनेशन मध्ये असेल आता तर जाईल बाहेर.तसही कोर्सचे दोन चेहरे आहेत.याची गरज नाही.त्या एखादी सिरियल नक्कीच मिळून जाईल.
पुढारी पण एवढ्या लवकर जाणार नाही.बहुतेक दामले असेल तर त्याचाच नंबर लागेल.एरिनाला पण फारच काळ ठेवतील असे वाटत नाही.तिने हिंदीमध्ये जायला हवं होतं.कदाचित पुढे जाईल ही.
वैभव मला नाहीच आवडला.
पॅडी ओके .

उसगावकरांच संचालन चांगलं होतं पण फारच नाटकी बोलण आता ना डोक्यात जायला लागलं आहे.
जान्हवी बहुतेक निक्की होण्याचा प्रयत्न करत आहे.हे निक्कीला कळून चुकलं आहे.ती बरोबर जागा दाखवेल जान्हवीला.आर्याने रडणं थांबायलाच हवं.सारख काय मला मारलं ,मला मारलं.आधीचे सिझन पाहिले नाहीत का हिने काय काय झालं होतं ते.
योगिता अपेक्षेपेक्षा टास्क चांगला खेळली.
अभिजित आता मुरला आहे,तो जाईल पुढे.पण आता अंकिता मध्ये विनिंग मटेरियल दिसायला लागलं आहे हळूहळू.योग्य वेळी योग्य पत्ते टाकले तर विनर होऊ शकेल.
अरबाजने राग कंट्रोल केलाच पाहिजे.
दामले तर"अरे मी कुठे आलो"अशा थाटात वावरत आहे.त्याला बहुतेक इंटरेस्ट नाही किंवा गेलेला दिसतो,जर नॉमिनेशन मध्ये असेल आता तर जाईल बाहेर.तसही कोर्सचे दोन चेहरे आहेत.याची गरज नाही.त्या एखादी सिरियल नक्कीच मिळून जाईल.
पुढारी पण एवढ्या लवकर जाणार नाही.बहुतेक दामले असेल तर त्याचाच नंबर लागेल.एरिनाला पण फारच काळ ठेवतील असे वाटत नाही.तिने हिंदीमध्ये जायला हवं होतं.कदाचित पुढे जाईल ही.
वैभव मला नाहीच आवडला.
पॅडी ओके .

अरबाज , जान्हवी आणि निक्की आता मला माणूस कमी आणि गुंड जास्त वाटू लागलेत . >>> अरबाज जान्हवी तर अति अति गुंडगिरी. अरबाज तर काल मला अफझलखान, औरंगजेब टाइप क्रूर वाटला किंवा आपले दानव, राक्षस म्हणूया. जान्हवीही राक्षसिण वाटली. सॉरी फॉर धिस वर्डस. दोघेही क्रूरकर्मा वाटले एकंदरीत.

अभिजीत हवा होता कॅप्टन. अंकिताला गुंडाळतील बहुतेक.

योगिता अपेक्षेपेक्षा टास्क चांगला खेळली >>> तिला मागचा टास्कही समजलेला पण ती आपलं म्हणणं नीट मांडू शकली नाही. ढोल अडवायला हवा हे तिच्या लक्षात आलेलं. ती घाबरट वाटते, ठामपणा कमी पडतो. थोडी धीट व्हायला हवी. डोकं आहे तिला.

मला एक सांगा , या लोकांना वोट करायचं असेल तर कसं करायचं ? मार्गदर्शन करणारी काही वेबसाईट वगैरे आहे का ? >>> जिओ app घ्यायला लागेल बहुतेक. नवऱ्याकडे आहे त्यामुळे मला जेव्हा करायचं असेल तेव्हा तिथून करेन. तो बघत नाही बिग बॉस.

निक्की काहीच नाही इतकी ती जान्हवी शैतान कि खाला आहे, काय ते अँगर इश्युज आणि सायकोपन्ती, शिवानी सुर्वे सुद्धा सौम्य दिसेल तिच्यापुढे !
अरबाझ खरच अफझल खान आहे म्हणूनच रितेशला गनिमीकावा शब्दं सुचला Biggrin
आज डीपी फायनली अ‍ॅक्टिव्ह झाला आणि बाजी मारली शेवटी , जान्हवी जळून जळून हवेत धूर बनून वाहून चालली होती Proud
वर्षा उसगावकर इतल्या शान्तपणे सगळा दंगा बघून निर्णय देते, कायमची संचालक बनवा तिला Happy
आर्या मधेच काय रडारड करते, निक्की आणि जान्हवीशी नडते हे मजा येते पहायला पण आर्यामधेही
किडे आहेत !
मला ती एरीना पण आवडत नाही, उगीच सूरजला शान्त करत होती त्या बैलबुद्धी वैभवला ओरडायच्या ऐवजी, उगीच फेक लव्हस्टोरी प्लॅन करतायेत हे लोक !
आज मेघा एका लाइव्ह मधे येऊन म्हणाली कि जन्हवीला जाऊन झोडावस वाटतं Biggrin

निक्की, pady, सुरज, निखिल, पुढारी नॉमीनेट झाले अशा न्यूज येतायेत.
सुरज किंवा pady जातील बहुतेक.
<<<<
नाही नाही, सूरज या सर्वां मधे नं. १ वर असणार, भरघोस वोटिंग होते त्याला.
एम्सी स्टॅन सारखा या सिझनचा डार्क हॉर्स आहे, फार काही न करता फिनालेला जाणार नक्की ज्या प्रकारे सोशल मिडियावर सपोर्ट मिळतोय त्याला !
निखिल जाईल .

निखिल जाईल >>> जाऊदे, काहीच करत नाही. दिसतही नाही. काढा त्यालाच.

एम्सी स्टॅन सारखा या सिझनचा डार्क हॉर्स आहे, फार काही न करता फिनालेला जाणार >>> हो कोणीतरी त्याला मराठीतला एम सी स्टान म्हणाले परवा.

जानव्ही किती लायकी काढते लोकांची, सगळी लायकी अन अक्कल हिलाच दिली आहे जणु देवाने.. अगदि डोक्यात गेलीय... आर्याने बरोबर तिल व्हीलन म्हणुन घेतलं होतं.. आर्या सगळ्यात बेस्ट आहे..पण एकदा झापल्यावर शांतच झाली आहे.. तो सुरज काल जानव्ही अन वैभव ला मस्त नडला.. तो वैभवचा पाय ओढताना खुप हसु आलं
छान आहे या वेळचं बिगबॉस.. अजुन पॅडी, योगीता, निखिल, यांना सुर गवसला नाहिय.. अंकिता योग्य वाटेवर.. वर्षांचं बोलणं मजेशीर वाटतं.. शांत राहुन छान खिल्ली उडवतात त्या व्हिलन कंपुची Happy

कोणीतरी त्याला मराठीतला एम सी स्टान म्हणाले परवा.

>> त्याचे insta पेज बघितले तर केसांचे दोन बो बांधून खूप पावडर थापून कोणत्यातरी मुलीला प्रपोज करत होता. या अश्या माणसाचे नक्की कोण फॅन आहेत देव जाणे. Insta वर त्याच्या रील खाली कमेंट्स पण अपमानास्पद आणि घाणेरड्या आहेत. त्याचं कौतुक बिवतुक करणाऱ्या कमेंट्स नव्हत्या अजिबात. याला नक्की कोणाचातरी पॉलिटिकल पाठिंबा आहे. (कोणाचा आहे तेही खाजगी वर्तुळात ऐकले आहे). पण त्याला फिनाले ला पाठवण्याची मी कल्पना पण करू शकत नव्हती. काल एरिना ने त्याला उगाच थांबवलं. भांडण पुढे गेलं असतं काहीतरी तर फुतेज मिळालं असतं त्याला. लोकांनाही कळलं असतं की त्याच्यात काही आहे का वोट देण्यासारखे.

कालच्या टास्क मधे अरबाज ची टीम जिंकली नाही याचेच आश्चर्य वाटले मला. किती ते अँगर आणि अ‍ॅग्रेशन. वर्षाचे मला कौतुक वाटले, इतके ते सगळे तिच्यावर धावून जात होते तोंडाजवळ जाऊन ओरडत होते पण तिने निर्णय बदलले नाहीत की जराही घाबरली नाही विचलित झाली नाही.
जान्हवी मला वाटते तिच्या व्हिलन टाइप रोल्स साठी ऑडिशन देते आहे सतत. तीच इमेज तिला मेन्टेन करायची आहे. उगीच दंगा करते सतत. काल एकदा म्हटली सुद्धा मी सगळ्या घरासोबत पंगा घेतला आहे पण हे बाकीचे इतरांशी बोलून मला वाईट करतयात. म्हणजे मुद्दाम च करते आहे जे करतेय ते.
अंकिता कॅप्टन झाली चांगले झाले पण तिला कुणीतरी सांगा कॅप्टन झाली तरी असे भांडण वगौरे नसते सोडवायचे बिबॉ मधे! तेही ऑपोजिट ग्रुप मधले?? Happy की आता सगळ्यांच्या गुड बुक्स मधे रहायचा पुळका आला की काय . कशाला त्या जान्हवी - निकी आणि अरबाज मधले भांडण सोडवायला गेली? चांगले मस्त पेटले होते, आमच्या शत्रूशी (आर्या) अरबाज बोलतो म्हणून दोघी आरडाओरड करत होत्या. वैभव पण अरबाज शी बाजू घेऊन त्यांच्याशी वाद घालत होता, मस्त मज्जा बघायची सोडून अंकिता मधे येऊन भांडण सोडवत होती.
इरिना पण डबल ढोलकीपणा करते आहे. दोन्ही ग्रुप्स मधे असते. आता वैभव सोबत लव अँगल चा प्लान आहे . अजिबात आवडत नाहीये . ओढून ताणून वाटतेय. पुढारीने काल पुन्हा भोकांड पसरले अरबाज हरला म्हणुन Lol मजेशीर आहे तो.
आर्याचा कुठेतरी सूर हरवलाय असे वाटतेय सोमवार पासून. काल तर अगदी रडका, पराभूत अ‍ॅटिट्यूड होता तिचा. तिने कॉन्फिडन्स पुन्हा आणायला पाहिजे. योगिताही तशीच, काल पूर्ण वेळ अदृश्य होती , कशी तरी शेवटी खुर्ची वर बसली पण तरी कुठेतरी हरवलेली वाटते तीही. ती अन निखिल यांना घरीच जाऊ द्या.

वर्षा उसगावकर काल पहिल्यांदा आवडल्या..... मस्त बेअरिंग पकडले होते संचालकपदाचे!! रेषेच्या पुढे उभा राहिला म्हणून अरबाझला गेमच्या बाहेर काढले असते तर अजुन मज्जा आली असती Wink
आर्या काल एकदम डेस्परेट वाटत होती.... ते तिने मला मारले वगैरे उगाच!!
वैभव जरा सेन्सिबल वाटला
डीपी, अभिजीत, योगिताने टास्कमध्ये अनपेक्षितरित्या चांगले कॉंट्रीब्यूट केले.
अरबाझ पहील्या राउंडमध्ये त्याच्या ग्रूपला एकपण सीट न मिळाल्यामुळे फारच बिथरला होता..... त्याच्या एकदम घाव वर्मी लागला होता!!
निक्की फारच डिप्लोमेटिक खेळतीय..... तिथे म्हणाली की कुणीही कॅप्टन झाले तरी मी काम करणार नाही आणि नंतर येऊन एकटीनेच अंकिताचे अभिनंदन करुन गेली.
अंकिताने काल आर्या अरबाझ प्रकरणात त्यांच्या ग्रूपमध्ये जाऊन अरबाझची बाजू घेतल्यामुळे अरबाझ पण तिला कॅप्टन्सी ड्यूटीमध्ये सहकार्य करेल असे वाटतेय..... वैभवनेच तिला निवडले असल्यामुळे तो पण फारसा विरोधात जाणार नाही..... राहिता राहिली जान्हवी; बाकी सगळे थंड पडले तर ती एकटी नडणार नाही अंकिताला असे वाटतेय! थोडक्यात गूड मूव्हज अंकिता Happy
बाकी पॅडी, पुढारी, निखिल वगैरे काल असून नसल्यासारखे होते!!
काल डीपी आणि ग्रूपने उचलून अंकिताला कॅप्टन्सी रुममध्ये नेले आणि तिच्या साठी जे गाणे म्हंटले ते फारच आवडले..... कधी नव्हे ते सगळे एक 'ग्रूप 'म्हणून एकत्र दिसले!!

आणि शक्य झाले तर कोण कॅप्टन झाले, कोण नॉमिनेट झाले, कोण इलिमिनेट झाले वगैरे इथे लिहू नका प्लीज Wink काल अंकिता कॅप्टन झाली हे आधीच इथे वाचल्यामुळे बघण्यातली सगळी मजा निघून गेली!!

तिला कुणीतरी सांगा कॅप्टन झाली तरी असे भांडण वगौरे नसते सोडवायचे बिबॉ मधे! तेही ऑपोजिट ग्रुप मधले??
<<<<<<<
होना, कशाला गांधीगिरी ? मजा येत होती राडा बघताना, बाकी तो अरबाझ कसाही असो, आधी टास्क्स मधे घामाघूम होईपर्यन्त धक्काबुक्की आणि नंतर सतत किचनमधे राबत असतो, कालही कणीक मळता मळता आला भांडण सोडवायला Biggrin
काल मला अजुन एका गोष्टीचा आश्चर्य वाटलं, वैभवकडे निर्णय असताना त्याने आन्किताला का नाही आउट केले ? आर्या आणि स्वतःचा मित्रं पुढारीला काढले बाहेर, काहीतरी गडबड आहे..अन्किता आणि वैभव दोघे गुडबुक्स मधे रहातायेत.
येडा पुढारी का नाही भांडला तिथे ?

कोणीतरी त्याला मराठीतला एम सी स्टान म्हणाले परवा. >>> युट्युब शॉर्टस असतात ना त्यात बघितलं. मी ह्याला ओळखत नव्हते, गुलीगत अर्थही मी इथेच विचारला. अजूनही त्याचं काहीही जाऊन बघितलं नाही पण तो निक्की जान्हवीला नडला ते आवडलं होतं मला.

आज वर्षाताई स्वतःच्या मतावर ठाम राहील्या नाहीत ते काही पटलं नाही, मत काहीही असो, त्यांना वाटत होतं त्यावर ठाम रहायला हवं होतं. जान्हवीच्या हो त हो मिसळलं शेवटी. नाही होत आहे एकमत, करा नॉमिनेट आम्हाला म्हणायचं. अर्थात तो निखिल आणि सुरज मला आवडत नाहीत, नॉमिनेट झाले तर झाले पण त्यांच्या मताबद्द्ल म्हणतेय मी.

आता काय बिग बॉस लव ट्रँगल करणार का, आर्या उद्या रडणार, तिला वैभव आवडतो आणि वैभव इरीना एकमेकांच्या प्रेमात. बिग बॉस आहे की लवस्टोरीज. आम्ही लवस्टोरीज बघायला बिग बॉस बघत नाही.

काल मला अजुन एका गोष्टीचा आश्चर्य वाटलं, वैभवकडे निर्णय असताना त्याने आन्किताला का नाही आउट केले ? >>> तिने त्याला वाचवलं म्हणून असेल आणि स्वअस्तित्व दाखवायचं असेल, कॉपी म्हणाले होते ना. मी सुद्धा विचार करु शकतो वगैरे.

येडा पुढारी का नाही भांडला तिथे ? >>> तो सिलेक्टीव्ह भांडतो.

आणि शक्य झाले तर कोण कॅप्टन झाले, कोण नॉमिनेट झाले, कोण इलिमिनेट झाले वगैरे इथे लिहू नका प्लीज >>> नक्की.

वैभव? मला वाटले आर्याचा अरबाज वर क्रश आहे. त्याला वीकेन्ड ला तयार झाल्यावर काला टिका वगैरे लावला तिने असं पॅडी आणि निकी बोलत होते. काल पण सारखी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती त्यामुळेच तर ते भांडण झाले, अरबाज आर्याशी का बोलतो म्हणून,
ईदर वे, यातली कोणतीही लवस्टोरी बघायला बोअर च होईल, अगदीच फेक! अजून कुणाचेच खरे खुरे बाँडिंग दिसत नाहीये. नाही म्हणायला अरबाज आणि वैभव चा ब्रोंमॅन्स सुरु असतो रात्री कुचू कुचू बोलत असतात.

त्या सूरजला आजही काही कळत नव्हत.त्याला खरतर काढल पाहिजे .पण लास्ट विक वोटिंग मध्ये तो नंबर 1वर होता.कोण करत त्याला वोटिंग?
ती आर्या प्रत्येक एपिसोडमध्ये रडणार आहे का?
मारल,लगेच रडली.पैसै लपवले रडली.तिला ती कुठलीशी रुम असते जिथे त्या श्रुंगारपुरे ला पहिल्या सिझन मध्ये ठेवल होत ,तिथे पाठवून सिझन 1,3 आणि सिझन 2 मधली शिवानी सुर्वे आणि परागचा तो खुर्चीसम्राट टास्क दाखवा ,आणि विचारा,खेळणार आहेस की घरी जाणार आहेस?
आता काय लव्ह ट्रँगल...तिथे रडणार.
पुढारी पण जाम बोअर करायला लागला आहे.

अंकिता मस्त टोमणे मारते...आज चक्क पुढाऱ्याला बटाटा म्हणाली आणि त्याला ते कळलं पण नाही...उगाच दात काढत होता...बाकी यावेळी चुगली बूथ असायला हवे...आणि जान्हवी नेहमीच निकिच्या चुगल्या करत असते त्या दाखवायला हव्या निकिला...मग मज्जाच मज्जा...तसाही त्यांचा ग्रुप अजिबात strong नाहिये...सतत आपापसात भांडत असतात...उद्याचा promo काही कळलाच नाही मला...आर्या रडत होती तर मला वाटलं... तिला सतत टारगेट करतात सगळे म्हणून रडतेय...आज तर चक्क एरिना बोलली तिला...पण fb वर सगळे म्हणत आहेत की तिला वैभव आवडतो..हे काय आता नवीनच?

बिगबॉसने आधी इमोशनल ब्लॅकमेल केले वर्षाताईंना आणि मग बाकीच्यांनी त्यांना तुम्हाला वॉशरुमला नंबर देतो म्हणून गुंडाळले!!

आर्याला फारच टारगेट केलेय निक्कीच्या ग्रूपने..... जरा तिने शांतपणे घेतले तर आपोआप सिंपथी मिळेल तिला पण ती फ्रस्त्ट्रेट आणि डेस्परेट होतेय..... आता लव्ह ॲंगल मुळे अजुनच व्हलन्ररेबल होण्याची शक्यता आहे ती आर्या!!

अंकिताने आज पण चांगले लीड केले Happy

Pages