बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा उसगावकर मस्त टॅकल करते निक्कीला. एकदम कूल राहून आवाज जराही न वाढवून जोक करून अपशब्द न वापरता तिला वापरायला लावून आणि ती चिडली की या हसत बसतात. मजा आली आज वर्षा ला बघून.
ती अंकिता... म्हणजे कोकणी ना? ती साधी आणि एकदम जेन्युअन आहे. कोकणातली आहे... इति काशिनाथ नाडकर्णी.

वर्षाच्या पुस्तकी मराठीचे हसू येते. मदमस्त तरुणी Lol पण मस्त उचकवत होती तिला.
अंकिता आणि आर्या ने खर तर दोघींनी बरोबर म्हटले की निकी चा गेम मराठी ऑडियन्स ला अपील होण्यातला नाहीये. त्यांनी या मुद्द्यावरच पुढे कॅश करण्याची स्टॅटेजी केली पाहिजे.

वर्षाला स्वत: शांत राहून, तिला चिडवायला जमायला लागलं. निक्की मात्र आपला टोन सोडत नाहीये. रीतेशभाऊ बघूया आज विकेंड वार कसं हॅंडल करतायेत.

निक्की तांबोळी नक्की कुठली आहे छ. संभाजीनगर की डोंबिवली, मी दोन्ही वाचलं. डोंबिवलीत एवढं भयाण मराठी ऐकलं नव्हतं कधी.

वर्षा उसगावकर मस्त टॅकल करते निक्कीला. एकदम कूल राहून आवाज जराही न वाढवून जोक करून अपशब्द न वापरता तिला वापरायला लावून आणि ती चिडली की या हसत बसतात.>>>हो...मस्त वाटते त्यांची गांधीगिरी...जानव्ही किती दुष्ट आहे...अभिमानाने सांगत होती की मुद्दाम वर्षाला त्रास द्यायचा होता म्हणून पण बरी तोंडावर पडली...सगळ्यांनी तिलाच तिची चूक दाखवली...फायनली आर्याला आज तीचं हक्काचं भांडण मिळालं... बरोबर होती पण ती.. रॅप पण भारी होतं तिचं....वेळ फारच कमी केलाय त्यामुळे म्हणावी तशी मजा येत नाहिये अजून....

मारामाऱ्या होऊन डोकी वैगरे फुटली पाहिजेत. या असल्या गुळमट भांडणाला अर्थ नाही. खरं तर आतमध्ये जे गेलेत त्यातला जो शेवटी जिवंत राहिल तो विनर ठरायला पाहिजे. दोन तीन खून झाले तर थोडीफार मजा येईल बघायला.

काल दस्तुरखुद्द बिग बॉस पूर्ण फ्लर्टींग मोडमध्ये होते..... आर्या आणि जान्हवी!! काहीही चाललेय यावेळी बिग बॉसचे!!
लोकांना इंग्लिश बोलण्याबद्दल झापतायत आणि पुढच्याच वाक्यात आर्याला म्हणतायत की तू माझी 'फेव्हरेट 'आहेस/ की मी तुझा 'फेव्हरेट' आहे असे काहीतरी आणि म्हणून तुला यावेळी सोडून देतोय Proud

अंकिता काल पूर्ण मोकळे सोडण्याबद्दल काहीतरी बोलत होती आणि पुढे म्हणाली आपण लिहून दिलेय आणि अडकलोय की असेच काहितरी..... ते बहुदा कॉंट्रॅक्ट बद्दल असावे!!

गेलेत त्यातला जो शेवटी जिवंत राहिल तो विनर ठरायला पाहिजे. दोन तीन खून झाले तर थोडीफार मजा येईल बघायला.
<<<
बोकलतला स्व्किड गेम दाखवा Proud

वर्षा उसगावकरने जाम हसवलं , मदमस्तं माजोर्डी उन्मत्त तरुणी Rofl
निकीने ऑलरेडी हिरो बनवून टाकलय वर्षा उसगावकरला .
पण त्या निक्कीपेक्षा जास्तं चुडैल जान्हवी आहे , मारामार्‍या करतेय !
आज अन्किता का रडली, भांडी धुवायचा फोबिया ? Rofl
काय नमुने आलेत !

ती जान्हवी कधीकधी फार बालिश वागते आणि लाडात येते.काल सुध्दा त्या सूरजला उगाचच झापत होती,पण त्याने बोलती बंद केली.
वर्षाला माईक न घालण्यावरून चांगलाच दंड ठोठावला पाहिजे अस काल मलाही वाटत होत.
काल वर्षाला फुल चान्स होता निक्की आणा जान्हवीचा पोपट करण्याचा,एवढ चादर अंथरायच काय,सरळ जाऊन झोपायच ,काय करणार होत्या दोघी,फिजिकलीतर काहीच करू शकल्या नसत्या कारण निक्कीलख पुरेपुर जाणीव आहे,काय होत त्याची,त्यामुळे जान्हवुला पण थांबवलच असत.पण ताई नुसतीच शाब्दिक मिरामारी करतात,डोक पण वापरायला लागेल आता.
ती अंकिता काय फक्त रडायला आली आहे का,रडी कुठली.
काल आर्याच सॉंग आवडल.
बिबॉस निक्की आणि कंटशपनीच्यि बाबतीत थोडा पार्शियल वाटतो.ःते नुसते बसतात तेव्हा पिकनिक नसते,पण काल अभिजित वगैरे छान गप्पागाणी करत होते तर ती पिकनिक वाटली,ते काय काम सोडून बसले नव्हते,तेव्हा सगळेच बसले होते.
निक्की कधीकधी डोक्यात जाते पण ती "बाई" ज्या पध्दतीने म्हणते ते आवडते.
तिला आता हे लवकर कळायला हव की वर्षा तिला पूर्णपणे बदनाम करण्यावर टपली आहे,तिचा नाद सोडायला हवा नाहीतर पहिल्या पाचात येऊनही काही उपयोग होणार नाही.
तसही मेकर्स तिलि.विनर करतील अस वाटत नाही,की हीच मिनिमम गँरेंटी पिरियड घेऊन आली आहे.
सिझन 4 मध्ये सोमि वोटिंग ट्रेंड बिबॉसने फॉलो केला नव्हता आणि भरपूर शिव्या खाऊन सिझन फ्लॉप झाला होता ,यावेळेस काय करतो बिबॉस बघायच.
कोणी पाहिला आहे का,वोटिंग ट्रेंड,त्या अँक्ट रायडर वाल्याचा बर्यापैकी खरा असतो म्हणे.

मदमस्तं माजोर्डी उन्मत्त तरुणी >> हो! Biggrin
वर्षा इंग्रजी शब्द तोंडातून गेला की लगेच विचार करून मराठी शब्द आठवते आणि बदलते. Happy ते छान दिसत. तिला कॅमेरा सेन्स पण उत्तम आहे. सध्या कुठल्या कॅमेरा चे शूटिंग दाखवत असतील म्हणजे त्या कॅमेरा समोर आले की आपण दिसू वगैरे विचार करून भांडण चालू असताना खोखो हसत कॅमेरा समोर आली. Lol ते जामच स्मारटी प्यांटस होतं.

बाकी ती कोकण हार्टेड अंकिता तशी बरी असेल स्वभावाने वगैरे पण रडी वाटते मला. काल म्हणे भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे मला Uhoh मी कधीच घासत नाही भांडी, माझ्या घरच्यांनाही माहित आहे म्हणे. अन लगेच रडायला सुरुवात! वा रे वा Happy अरे इतरांना काय हौस असते भांडी घासायची म्हणून घासतात की काय. आवडो न आवडो करावीच लागतात कामं. वेलकम टु लाइफ!
बायद वे गेल्या सीझन मधली अमृता देशमुख बिबॉ चे रिव्ह्यू/ रोस्ट करते आहे या सीझन ला. चांगले करतेयः
https://youtu.be/qPE_-ynlO_0?si=Jr8Lha4nCzAQQXLk
आणि या सीझन चं टायटल साँग "भाऊचा धक्का " ३ र्या सीझन च्या उत्कर्ष शिंदेने केले आहे - लेखन, दिग्दर्शन , संगीत सबकुछ उत्क्या!

मलाही आवडलं रीतेशचं. फक्त त्याने जान्हवीला मात्र मस्करीची कुस्करी, आर्याशी भांडण आणि निक्की शॅडो एवढंच सुनावलं. रात्री मुद्दाम बाहेर झोपून वर्षाला त्रास देत होती त्याबद्द्ल काहीच नाही बोलला. वैभवला योग्य सुनावलं.

योगिताला तो गेम कळला होता का, मला ते काही त्यावेळी समजलं नाही. जर असं असेल तर तिचं इतरांनी ऐकायला हवं होतं. ती ठामपणे आपलं म्हणणं मांडत नाही मात्र. तिला एकटीला ते समजलं असेल तर डोकं आहे तिला.

वाईट भाषेबद्द्ल निक्कीला सुनावलं ते मस्त. तरी तिला थोडंच सुधारु देणार बिग बॉस, परत तिच्या हातात कोलीत देणारच. ती संतपदी पोचली तर कसं चालणार बिग बॉस.

हो. रितेशने चांगली घेतली शाळा.
ती इरिना बोलते तेव्हा जाम हसू येतं. एकतर तिला काय बोलायचं आहे ते मला झेपत नाही पण तिच्या चेहेऱ्यावर भाव असतात पण शब्द न सापडल्याने तो प्रकार जाम फनी होतो.

मला आवडला रितेश भाऊचा धक्का आणि उत्कर्षचं गाणं Happy
सगळ्यांना योग्य मुद्द्यावर झापणे , काहींना सौम्य समज , अ‍ॅप्रिशिएट करणे, कानपिचक्या देणे , गृप्स बनवा अशी क्लिअर हिन्ट देणे आणि काहींना एन्करेज करणे सगळे ऑन पॉइन्ट :टाळ्या:
सिनियर्सशी बोलतानाही जरब कायम होती टोन मधली.
"पंढारीनाथ हे तुम्हाला लागलं असेल तर…." मला वाटला आता सॉरी म्हणतोय कि काय.. पण 'लागलच पाहिजे' म्हंटला ,लय भारी !
त्याचा वावर आणि प्रेझेन्स ऑफ माइन्ड हेविली इन्स्पायर्ड बाय सलमान खान वाटलं, इन अ गुड वे.. .. जेंव्हा सल्लु चांगले होस्टिंग करायचा त्यावेळचा सलमन Happy
रितेश भाऊंनी दिलेलं गनिमि काव्याचं उदाहरण आवडलं पण काहींच्या डोक्यावरून गेले असणार Happy
आज एरीनाला जरा जास्तच कौतुक आणि वर्षा उसगावकरला थोडे कमी अ‍ॅप्रिशिएट केले गेले असं वाटलं, पण ठिक आहे तिचा ओव्हर कॉन्फिडम्स थोडा कमी होईल !
सर्वात खुष अरबाझ असेल आज, त्याचीच सर्वात जास्त पॉझिटिव इमेज करून दिली रितेशने , पण खरोखरच तसे आठवून पाहिले तर निकीच्या गृप मधे असण्या व्यतिरीक्त निगेटिव काही केलेलं नाहीये त्याने.
उलट डोकं, ताकद, कुकिंग ड्युटी सगळ्यातच पुढे होता तो त्यामुळे मेक्स सेन्स !
निकीनेही लग्गेच डॅमेज कन्ट्रोल सुरु केले फिडबॅक मिळाल्यावर, प्लेअर म्हणून चांगली आहे यात वादच नाही पण पुन्हा नव्या आठवड्यात तशीच वागेल यात काही शंका नाही !

छान पोस्ट डीजे. गनिमी कावा एकदम भारी होतं.

खरंतर फिजिकल टास्कस असतात तेव्हा दोन वेगवेगळ्या grp मध्ये तगडी माणसे हवीत. खरंतर वैभवला चान्स होता, निक्की आणि अरबाजच्या हाताखाली राहण्यापेक्षा विरुद्ध grp करून लिड घ्यायचा. ताकदीचा उपयोग तिथे करून दिला असता तर वेगळं अस्तित्व दिसलं असतं त्याचं. अजूनही चान्स आहे. डी पि चा अशावेळी काही उपयोग होईल असं वाटत नाही.

वर्षा उसगावकर unintentionally innocent आणि मजेशीर वागतात कधी कधी. मला जाम हसू येत त्यांचं वागणं बघून. एरिना च सुद्धा तसंच वाटत. त्यांच्या दोघींच्यातला एक प्रसंग आज मी पाहिला जेव्हा एरिना चुकून बेड वर बसली आणि त्याआधी त्यांचं खूप काहीतरी सेल्फ लव्ह etc mature deep talk सुरु होतं आणि अचानक एरिना च्या लक्षात आलं की आपण नियम मोडला म्हणून ती ताडकन उठून, डोळे मोठे करून उभी राहिली. तिला टेन्शन आता सगळे आपल्यावर धावून येणार आणि हे मराठीत सगळ्यांना कस सांगू म्हणून ती हात लांब करून ते आपलं हे असं करून शब्द जुळवत होती आणि वउ ला वाटलं तिच्या तोंडात किडा गेलाय म्हणून त्या अग बाहेर काढ असं काहीतरी म्हणत होत्या. तर ती त्यांना हात दाखवून explain करायला गेली तर त्यांना वाटलं त्यांच्या डोक्यात किडा बसलाय त्या कुठाय कुठाय करून डोकं झटकत उठल्या, इतक्या घाबरल्या होत्या. ओह my god एरिना कसे डोळे फिरावत होतीस म्हणाल्या. आता एवढ्या बंद बेडरूम मध्ये किडा कसा येईल, तो तिच्या तोंडात किंवा ह्यांच्या डोक्यावर जाईपर्यंत दिसणार नाही का. पण त्या खरच घाबरल्या होत्या. फार हसले मी ते बघून.

सुरुवातीला थोडे बोअर होतेय असे वाटलेले स्पेशली जेंव्हा वर्षा उसगावकरचे नाट्य अभिवाचन चालू होते तेंव्हा पण नंतर जरा सगळेच स्थिरावल्यासारखे वाटले.
निक्कीसाठी रितेशने सॅण्डविच पॅटर्न वापरला Wink
मला एकदा वाटले की सुरुवातीच्याच आठवड्यात इतक्या डायरेक्ट हिंट/फीडबॅक द्यायला नको होत्या पण त्या मराठी लोकांच्या मॅंटलिटीच्या मुद्द्यावरुन निक्कीला झापणे आवश्यक होते.
लोकांना मराठी कार्ड वापरु नका म्हणताना असे वाटत होते की रितेशच मराठी कार्ड खेळतोय का काय Wink पण जे काही असेल ते! त्याने एकंदरच त्या मुद्द्यावर जो ठामपणा दाखवला त्याने सर्वसामान्य मराठी लोकांची मने नक्कीच जिंकली असतील.
वैभवला अगदी अचूक फीडबॅक दिला; पण तेव्हढ्यापुरता तो दाखवण्यासाठी अरबाझपेक्षा वेगळी मते मांडेल पण इतक्यात त्यांच्या विरोधात वगैरे जाईल असे काही वाटत नाही.
पिकनिकला आलेल्या लोकांची मस्त उडवली..... त्या दामलेला तर चक्क अनुल्लेखाने मारले Wink
ती काठी पकडण्याच्या टास्कच्या वेळेला काठीच्या टोकाला उभे राहणाऱ्या लोकांना ती पकडताच आली नसती हे कालच जाणवले; बघताना तो मुद्दा लक्षात आला नव्हता.

ओव्हरऑल रितेशचा प्रयत्न चांगला होता.... मांजरेकर आणि सलमानशी तुलना होणारच..... साहजिकच आहे ते!!

यावेळी स्पर्धकच नाहीत तर चक्क होस्टसुद्धा बिग बॉसची खेचतायत..... त्या फ्लर्टींगच्या मुद्द्यावरुन रितेशने पण चिमटे काढले बिग बॉसना Wink

बिग बॉस जरा त्या घरतल्यांना तुमची बिग बॉस गिरी दाखवा!!

पॅडी ला चिक्कार राग आलेला दिसला स्पष्ट.

तो निखिल मला विशेष नाही आवडला पण बहुतेक bb गेम नुसार तो चांगला strategically खेळतोय असं वाटलं.

निक्कीच्या बाबतीत तिने एकटीनेच गेम सिरीयसली घेतला आहे असं जाणवलं. फक्त हिंदी bb मध्ये असते तसे साम दाम दंड भेद वापरायला गेली. रिजनल bb मध्ये लोक सांस्कृतिक फुटपट्टी पण लावतात हे कळायला हवं होतं. लोक तिला नावं ठेवत आहेत पण याहून डेंजर नमुने हिंदी मध्ये येत असणार नक्की.

सुरज मात्र मला अजिबात आवडला नाही आणि त्याचं काही म्हणजे काहीच अपील झालं नाही. त्याला का ठेवलं आहे कळेना. Appearantly सगळयात weak खेळाडू तोच आहे गेम मध्ये. अगदी त्या पुरुषोत्तम दादा पेक्षाही. अजून एक आठवडा त्याला समजावून बघतील नाहीतर बाहेर काढतील त्याला. बीबींनी काही लोकांना चिअर अप करायचा ठेका नाही घेतलेला. काल रितेश ने त्याचं केलेलं कौतुक पण खोटं आणि त्याचं मोराल वाढवण्यासाठी केलेलं आहे हे जाणवत होतं.

सुरज ला मतं मिळून तो सेफ झाला आहे हे कळलं. इथे कोणी सुरज फॅन आहे का? लोकांनी त्याला नक्की कश्याच्या जोरावर मतं दिली असतील असं वाटतं? तेही वर्षा ऊ च्या खालोखाल? :बुचकळ्यात पडलेली बाहुली:

Colors मराठी वर extra शॉट्स दाखवत आहेत...मजा येतेय बघायला...dp and group मस्त enjoy करतात..वर्षा ताईंचे किस्से पण छान आहेत...

>>निक्कीसाठी रितेशने सॅण्डविच पॅटर्न वापरला >> म्हणजे??
म्हणजे पहिल्यांदा तुझे मुद्दे बरोबर, आठवडाभर तूच दिसलीस वगैरे मस्कावाला ब्रेड मग तुझे शब्द, टोन चुकले, मराठी माणसाचा अपमान, माफी माग वगैरे तिखटजाळ मसाला चटणी आणि परत तुझ्याकडे लीडरशीप आहे वगैरे म्हणून वरुन एक मस्कावाला ब्रेड असे ते क्रिटीसीझमवाले सॅण्डविच Happy

>>Colors मराठी वर extra शॉट्स दाखवत आहेत

हो अरे मस्त असतात ते..... गंमत म्हणजे शॉट घेऊन झाल्यावर हिरो अणि व्हिलन कसे सेटवर कधीकधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून दिसतात तसे एपिसोडमध्ये भांडभांड भांडलेले extra shots मध्ये मस्त गप्पा मारताना, एकमेकांची सुख दुखे: वाटताना दिसतात Happy

किर्तनकार बाहेर पडले. त्यांचे अनुयायी खूप असले तरी बिग बॉस बघून वोटींग करतील असं नाही. खरंतर पहील्या आठवड्यात कोणालाच बाहेर पाठवायला नको होतं.

यावेळी मला पी एन जी ने बाहेर पडलेल्यांना एक लाख रुचं वॉवचर द्यायचं ठरवलं आहे ते आवडलं.

कॅप्टनशिप नको यासाठी surrender झाले इझीली बरेच जण पण बिग बॉसने इथे ट्विस्ट द्यायला हवा होता, ज्यांना असमर्थ ठरवलं तेच आता कॅप्टनशिपसाठी लढतील असं हवं होतं.

बाकी आज निक्कीपेक्षा जान्हवी व्हिलन वाटली, overreact करत होती. निक्की रितेशसमोर तरी शांत होती. पुढारी बोलबच्चन जास्त वाटतो, रागावर कंट्रोल ठेऊ शकत नाही, लगेच बडबड करतो.

वर्षा शांतपणे बोलते पण कृत्रिमपणा जात नाहीये. आर्या मस्त रॅप करते.

काल रितेशने पुढारीला चांगला game खेळत आहे असं म्हंटलं तर त्याला वाटतंय की तो खरंच चांगला खेळतोय...किती बोलत होता आज...जसे बाकी सगळे बिनडोकच आहेत...जान्हवीला पण काल जास्त सुनावलं नाही तर हवेत उडतेय अगदी...आपटेल तोंडावर लवकरच...काल खरंतर रितेश निकिला झापत होता तेव्हा जान्हवी जाम टेन्शन मध्ये होती..तिचं नाव घेतल्यावर तिने एक मोठा सुस्कारा सोडलेला पण स्पष्ट ऐकू आला...पण तिला अपेक्षेपेक्षा फारच कमी सुनावल्यामुळे उडतेय बया...मजा येणार आहे पण या आठवड्यात...

यावेळी मला पी एन जी ने बाहेर पडलेल्यांना एक लाख रुचं वॉवचर द्यायचं ठरवलं आहे ते आवडलं.

>> त्यात नियम व अटी लागू आहेत. १०-२० लाखाची खरेदी केली तर १ लाख डिस्काउंट मिळणार (असे असणार).

Pages