बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपांजली, पॅडीबद्दल सहमत.
पण त्यांनी पुढे सूरजबद्दल काही करावं का याबद्दल मी साशंक आहे. सूरज्ला त्यांच्याबद्दल किंवा इतर कोणा हाउसमेट्सबद्दल काही वाटतंय असं दिसलं नाही. त्याला काही सांगितलं तर राग यायचा. इथे तो घरात बंद होता म्हणून फार काही करायचा नाही. बाहेर असं कोणी सांगितलं तर ऐकून घेत नसावा. त्यातून आता त्याच्याकडे पैसे आहेत. परक्या माणसाने तिथे काही म्हटलं तर आणखी प्रश्न निर्माण व्हायचे.
सूरजच्या आत्या आणि बहिणी आल्या तेव्हा तो पॅडीबद्दल विशेष बोललेला दाखवलं नाही.
काही लोकांना आपल्या भावना दाखवायला हव्यात हेच माहीत नसतं किंवा दाखवता येत नसतील , तसा तो असेल हेही शक्य आहे. मुलांशी तो छान बोलला. मोठ्यांशी तसं बोलता येत नसेल , हेही शक्य आहे.
टॉप टु मध्ये आल्यावर जे बोलला ते मला फार खरं वाटलं नाही.
फिनाले वीकमध्ये पोचल्यावर तो स्वतःहून काहीतरी बोलताना दिसला. आणि तेही कॉन्फिडंटली.
गेले तीन चार दिवस मेन एपिसोड झाल्यावर उरलं सुरलं दाखवतात त्यात तो सगळ्या हाउसमेट्सना त्याची बडबडगीतं शिकवतोय असं दाखवलं. धमाल एनर्जी होती. पण तो हेच किती करू शकेल. शेतात काम करतो, असं अक्षयकुमारला म्हणाल्याचं कधीतरी दिसलं. ते मुख्य आणि रील्स फावल्या वेळात असेल तर ठीक आहे.
अर्थात याही कंटेंटला ऑडियन्स असेल आणि त्यातून त्याला पैसे मिळणार असतील, (बिग बॉसवर किती लोक पैसे कमवतातच की!तर तेही ठीक. पण ते किती काळ चालेल?
रितेशचा हजरजबाबीपणा आणि कोपरखळ्या मारणं चिमटे काढणं कालही दिसलं. होस्ट म्हणून् तो मला मांजरेकरांपेक्षा जास्त आवडला.

--
सूरजला सोळा लाख आणि जान्हवीला ९ लाख असे मिळून २५ लाख झालेच.

सुरज - १४, ६०,०००

बाहेर आल्यावर कोण कोणाला किती वेळा भेटतात त्यांचे त्यांना माहिती. पंढरीनाथला एक्सिट इंटरव्यूमध्ये सुरज बद्दल प्रश्न विचारला तर त्याला मी बाहेर येण्याबद्दल काही वाटले नसेल असे उत्तर पंढरीनाथ यांनी दिले. बाहेर आल्यावर घरच्या लोकांचे सोडून सुरज आता कोणाचे ऐकेल असे वाटत नाही. राहिला विषय अंकिताचा तर सुरज जिंकला आणि अंकिता ५वी आली,आता ती सुरजला घर बांधून देईल का?

दीपांजली पॅडीबद्दल सहमत....त्यांना काढयला नको होतं...अगदी अंकिता गेल्यावरही असं वाटून गेलं की DP च्या ऐवजी तिथे पॅडी असायला हवे होते...

सुरजला पॅडीदादा किंवा कुणाबद्दलच काही वाटत असेल असं मला काल वटलं नाही.
पॅडी दादांबद्दल आदर असता तर तो व्यक्त झाला असता. वर्षा ताईंना आई म्हणायचा. ट्रॉफी जिंकल्यावर हाउसमेट्स बद्दल काहीच बोलला नाही.
आता तर फुल हवेत असेल असं वाटतंय. मागे म्हणाला होता की एकेकाळी नुसती फीत कापायचे ८० हजार मिळायचे पण मित्रांनी फसवले म्हणे.
आता मिळालेत ते नीट जपुन ठेव म्हणावं.
ते विजेत्याला पी एन जी कडून एक डायमंड नेकलेस मिळणार होता त्याऐवजी सुरजला १० लाख दिले का ?
तो नेकलेस किमान २५ लाखांचा वाटत होता.

ते विजेत्याला पी एन जी कडून एक डायमंड नेकलेस मिळणार होता त्याऐवजी सुरजला १० लाख दिले का ?>>>नाही नेकलेस देणार असे announce तर केले होते त्या png कडून आलेल्या बाईने...

मागच्यावर्षी नेकलेस आणि ब्रेसलेट दोन्ही होतं ना, पुरुष जिंकला तर ब्रेसलेट. तेव्हाही दहा लाख दिलेले बहुतेक, जाऊन घ्यायचं असेल. तेवढ्यातच बसवणार जे काही असेल ते असं असेल.

जान्हवीला तर टोटली नाटक करत पैसे घे, असं आतून सांगितल्यासारखं वाटलं.

सुरज रोजंदारीवर खत कारखाना, शेतात कामं करतो असं त्याचे नातेवाईक, मित्र सगळ्यांनी सांगितलं. त्याने शिकायची गरज आहे. पॅडीदादा आणि त्याचे फोटो बघितले, त्याने ट्रॉफी पॅडीदादांच्या हातात दिली.

झापुक झुपुक करत एम सी स्टॅन सारखी ट्रॉफी सुरज घेऊन जाणार, हे मी प्रेडीक्ट केलेलं पण तेव्हा एम सी स्टॅन काहीच करत नव्हता आणि सुरज बरंच काही करतोय घरात हे मला इथेच समजलं होतं (मी एम सी स्टॅन सिझन बघितला नाही, शॉर्टस बघत होते त्यामुळे तो काय करत होता ते माहीती नाही, तो कोण हेही नव्हतं माहीती) . आता त्याला चांगली लोकं लाभूदेत आणि तो चांगल्या वाटेवर जाऊदे एवढंच. तो नीट सावधपणे वागला आणि पैसे जपून वापरले, पिक्चर आला तर काही त्यातून मिळालं, ते ही नीट सांभाळलं तर त्याला अंकीता, पॅडीदादा कोणाच्याच मदतीची गरज आता नाहीये, त्याने पॅडीदादांचा सल्ला मात्र जरुर घ्यावा ते चांगलंच सांगतील.

कोकणातल्या कुठल्याच राजकीय लोकांनी अंकीताला सपोर्ट केला असं वाटत नाही (इथे मनसेने केला), कदाचित सावंतही मुळ कोकणातला (देवगड तालुका) म्हणून असेल. याउलट सुरज आणि डीपि साठी राजकीय लोकांनी जोर लावला. अंकीतासाठी अभिजीत केळकर मैदानात होता, अभिजीत सावंतसाठी बरीच मराठी हिंदी मनोरंजन क्षेत्रातील लोकं उतरलेली. अंकीताला वोटस कमी मिळण्याचं हे कारण असेल.

अजुनही पॅडीदादा नव्हते फायनलला ही खंत वाटते.

प्याडी दादाला पुढच्या वर्षी पण घ्या. प्रत्येक सीझनला घ्या. त्याच्या घरी कॅमेरे लावा आणि २४ तास लाईव्ह बघा त्याला.

बग्गा कोण माहिती नाही. गुण उधळणारे रत्न माहितेय, परफेक्ट bb मटेरियल. गाढव घेऊन गेलेत बरोबर. जायच्या आधीपासूनच सांगत होते, मी जाणार आहे हिंदी bb त. असं डिक्लेअर केलं तर चालतं का. मगाशी नवऱ्याने पाच मिनिटं लावलं, तेव्हा गाढव आणि ते दोघेही दिसले. एक साडी नेसलेली actress दिसली, तो चेहेरा ओळखीचा वाटला. शिल्पा शिरोडकर दिसली नाही.

यावेळी उडारिया सिरीयलमधले कोणीतरी असेलच, सिरीयल बघत नाही पण दरवर्षी असतं कोणी ना कोणी, त्या सिरीयलच्या नावाचा अर्थ काय, कोणाला माहिती असेल तर सांगा.

गुणरत्नला पुढच्या वर्षी, मराठीत आणू नका.

सूरज अगदी वेडपट वाटत होता. मी नेहेमीप्रमाणे सुरुवातीचे काही भाग बघुन सोडून दिलेलं. त्यात सूरज मुखदुर्बळ, काहीही मतं नसलेला, अक्कलही कमी असलेला, दिसायला, वागायला, बोलण्यात कशातच छाप पाडणारा वाटला न्हवता.
पॅडी आणि अंकिता आवडायचे.

वीणा परत फेमस होत चाललीय. झी मराठीची सिरीयल मिळाल्यावर एकेक मस्त इवेंटस मिळतायेत तिला. पुण्यात निसान कार लाँचिंगसाठी गेलेली, तो व्लॉग बघितला.

झापुक झुपुक करत एम सी स्टॅन सारखी ट्रॉफी सुरज घेऊन जाणार, हे मी प्रेडीक्ट केलेलं पण तेव्हा एम सी स्टॅन काहीच करत नव्हता आणि सुरज बरंच काही करतोय घरात हे मला इथेच समजलं होतं (मी एम सी स्टॅन सिझन बघितला नाही, शॉर्टस बघत होते त्यामुळे तो काय करत होता ते माहीती नाही, तो कोण हेही नव्हतं माहीती)
<<<<
इतरही बरेच लोक कंपॅरीझन करत होते , त्यांनीही बहुतेक हिन्दी बिबॉ न बघताच हे जजमेन्ट दिले.
स्टॅनचे ‘शेमडी’ आणि सूरजचे ‘झापुक झुपुक‘ इतकच काय साम्य दिसले असेल.
सूरज आणि स्टॅन दोघे गरीब बॅकग्राउंड मधून आले म्हणूनही असेल पण स्टॅन हा चांगला श्रीमन्त आहे बिबॉ मधे य॑यच्या आधीपासूनच.
काही न करता फॉलॉअर्सच्या जोरावर फिनालेत गेला म्हणून फार तर डीपीची आणि एम्सी स्टॅनची कंपॅरीझन होईल एक वेळ !
एम्सी स्टॅनही डीपी सारखा श्रीमंत होता (जरी लहानपणी पुण्यातल्या झोपडपट्टीत वाढला असला तरी रॅपिंग मधे आल्यापासून खूप पैसा मिळवलाय त्याने ), त्याच्या अंगावरचं सोनं , हायफाय ब्रॅन्डेड कपडे हे इतर सगळ्यांपेक्षा एक्सपेन्सिव्ह होते.
प्रियंका त्याला गळ्यातल्या जाडजुड चेन वरून टिझ केलं तेंव्हा तो म्हंटला होता “चेन पे मत जा, तेरा पूरा घर आयेगा उसमे”.
स्टॅन खूप वाईट शिव्या द्यायचा, फिजिक्॑लही होण्याची टेन्डन्सी होती, एक अख्खा विकेन्डका वार बोलणी खाल्ली होती त्यानी !
सूरजने कधीच वाईट भाषा वापरली नाही, थ्रुआउट पॉझिटिव होता.

प्रशांत भूषण यांना मारहाण करून बग्गा प्रकाशात आला. भाजपने त्याला पक्षात घेतले. दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. हाही प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

डिजे थँक्स, एवढं काहीच माहिती नव्हतं स्टॅन बद्दल, सुरज तसा शिव्या वगैरे तोंडात नसणारा, आदर करणारा, सर्व कामे करणारा आणि टास्कही नीट खेळणारा होता त्यामुळे खूप वरच्या लेव्हलचा होता.

भरत थँक्स बग्गा कोण माहिती नव्हतं.

हिंदी शॉर्टस बघेन, खूप वेळ जातो पूर्ण वेळ बघण्यात आणि हिंदीत भांडण लेव्हल निक्की जान्हवीच्या वरची असेल, ह्या दोघीच डोक्यात जायच्या.

न्यूज बघितली काय? प्याडी दादा आज परत बिग बॉसच्या घरात घुसण्याचा जबरदस्ती प्रयत्न करत होता. त्याला घरी करमत नाही. बिग बॉसने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी बिग बॉसने दरवाजा उघडला आणि एक दोन गाणी लावली तेव्हा कुठे पॅडी दादा जरा शांत झाला आणि घरी गेला. उद्या काय होईल काय माहित.

सुरज तसा शिव्या वगैरे तोंडात नसणारा,>> त्याने १-२ वेळा वाईट शिव्या दिल्या होत्या तेव्हा आवाज बंद केला होता. तेव्हा बाकीच्यांनी त्याला समजावले कि अश्या शिव्या द्यायच्या नाहीत.

https://www.youtube.com/watch?v=fYCsQlAVPHc

सुरजवर बक्षिसांची बरसात होतेय. चांगलं आहे, यश पचवूदे. मराठी भाषा नीट शिकायची आहे असं कुठेतरी म्हणाला, तर शिकूदे, व्यवहारी गणित वगैरेही यायला हवं.

त्या अभिजीत आणि निक्कीला ऑलरेडी दर आठवडा पैसे खूप मिळायचे, त्यांनी पस्तीस चाळीस लाख असेच कमावले. जान्हवीला आठवड्याला लाखभर मिळायचे (कमीच मिळत होते), तिने bag घेऊन कमावले. त्यामुळे सुरजला मिळतंय ते चांगलंच आहे.

तो गरीब होता इतकी वर्षे, अजूनही गरीब असतील लोकं तिथे तेव्हा दादा ताईंना कोणाला दिसली नाही गरिबी, आता सगळे आमचा सुरज करतायेत Lol

सरकारी फ्लॅट ? कशाबद्दल ? बिबॉ त्याने जिंकले हे ठीक होते पण नंतरची सहानुभूती लाट आणि इतकी बक्षिसे मिळण्याइतके काही केलेले नाही त्याने आणि यापुढेही करणार नाहीये.
हे म्हणजे एखाद्या ऑलिंपिक मेडल विजेत्यासारखे ट्रीट करणे सुरु आहे. हे का अणि त्यातून कुणाचा कसला फायदा करून देणार आहे काही झेपत नाही अजिबात.

विधानसभा निवडणुका आहेत ना आता जवळ, आमचा सुरज, आम्हाला कित्ती कळवळा करत मतं मिळवायचा प्रयत्न करत असतील संबंधित सर्वच.

बारामतीचा आहे ना तो म्हणून असेल....
फिनालेत सुद्धा के.शिन्देनी त्याना मुव्हि दिल्याच आधिच सान्गितल तेव्हाच खरतर तो विनर होणार हे अभिजितला कळल होत बाकी तो जिन्कला आहे तर यु ट्युब त्याच्या गावी जावुन स्वत्;चे व्युज वाढवतायत..

Pages