गीत गाया रेसिपियों ने

Submitted by निमिष_सोनार on 21 March, 2024 - 09:52

आजकाल अनेकजण सोशल मीडियावर अखंडपणे रिल्स बनवतात आणि बघणारे ते अखंडपणे आपापले अंगठे वर सरकवत सरकवत बघतात. ज्या त्या प्रेक्षकवर्गाच्या आवडीप्रमाणे असंख्य प्रकारचे रिल्स उपलब्ध असतात. त्यापैकी एक लोकप्रिय रिल्स म्हणजे झटपट पाककृती शिकवणारे रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओ. खरेतर हे उपयुक्त असतात, कारण त्यात पदार्थ बनवताना लागणारे साहित्य, कृती नीट सांगितलेली असते आणि स्क्रीनवर ते साहित्य आणि प्रमाण टाईपसुद्धा केलेले असते.

पण कधी कधी अशा रेसिपीना उगाच बॅक्राऊंडला गाणे टाकलेले असते. तेव्हा त्यात कधीकधी विसंगती निर्माण होऊन खाद्यपदार्थ निर्मितीसोबत विनोदनिर्मिती सुध्दा होते.

तर कधी कधी खाद्यपदार्थाला अनुरूप असे गाणे टाकल्यास सुसंगतीतून सुद्धा विनोदनिर्मिती होऊ शकते. कसे काय बुवा? सांगतो. पण मी उदाहरणादाखल जी गाणी सांगतो आहे, ती तुम्ही आधी ऐकली असतील तरच वाचतांना तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. चला तर मग, जाऊया थोड्या मिश्किल तिरसट वाटेवर!_

भरले वांगे बनवताना वांगे चिरत असताना, "दिल चिर के देख, तेरा इनाम होगा!"

ऑमलेट बनवताना, "तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर, कही दूर कही दूर!" म्हणजे हे गाणे अंडे कोंबडीला म्हणत असावे का?

काळे गुलाब जाम बनवताना, "गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा!"

फ्लॉवरची गड्डी बाजारातून विकत घेतल्यावर, "मैं निकला गड्डी लेके!" किंवा "फुल तुम्हे भेजा हैं, पिशवी में, फूल नहीं मेरी फेवरेट सब्जी हैं!"

भरपूर तूप, पनीर आणि चीज टाकून पराठा बनवताना किंवा समोसा, कचोरी, भजे, बटाटेवडे ची रेसिपी बनवताना, "सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा, कल के लिये, आज को न खोना!" कारण त्याला या पदार्थातून कॉलेस्ट्रॉल वाढणार हे माहिती असावे!

तेलाला जिऱ्याची फोडणी देताना, "तिचा नखरा पाहून काळीज उडतंय हो, धक धक धक धक!" कारण जिरे आणि काळीज सारख्याच पद्धतीने उडते आहे असे त्या फोडणी देणाऱ्याला वाटत असावे. यातून मला सचिन पिळगावकर तिरुमला ऑईलला जिऱ्याची फोडणी देतोय असे वाटायला लागले. असो.

चटणी रेसिपी बनवताना, "ही चटणी (पोरगी) असली, ही मनात बसली, तिचा नखरा (चव) पाहून काळीज उडतंय हो ..!"

घट्ट वरणात कुणाचे लक्ष नसताना पाणी टाकले की, "बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी", किंवा हेरा फेरी मध्ये सुनील, अक्षय, परेश या त्रिकुटाला ऐकू येते तसे, "गोलमाल हैं भाई सब गोल माल हैं!"

लाडू बनवताना, "घुमर रे, घुमर रे!"

कांदा चिरताना, "दिलं के अरमा, आसुओं मे बह गये!"

पुढे त्याच कांद्याला फोडणी देताना, "मेरे आंसू बन गये अंगारे!" किंवा अरियाना ग्रॅण्ड चे "Right now, I'm in a state of mind, I wanna be in like all the time, Ain't got no tears left to cry, So I'm pickin' it up, pickin' it up, I'm lovin', I'm livin', I'm pickin' it up!"

कारले कडू भाजी बनवताना, "कितने भी तू करले सितम, हंस हंस के सहेंगे हम!" किंवा अडेल लॉरी चे "This is the end,

Hold your breath and count to ten ... Let the sky fall, When it crumbles, We will stand tall, Face it all together, Let the sky fall" असं भाजी खावी लागणार असल्याने नवरा मनातल्या मनात जिभेला म्हणत असावा!

भाजी शिजली की नाही बघायला झाकण उघडताना, "सुहाग रात हैं घुंघट उठा रहा हुं मैं!" किंवा "दीदार हो गया, मुझको प्यार हो गया!"

पाककृती बिघडल्यास, "पहला पहला प्यार है, पहली पहली बार हैं!" "अम्मा देखं तेरा मुंडा (रेसिपी) बिघडा जाये", "ये क्या हुवा, कैसे हूवा, कब हुंवा!"

शेव भाजीत जास्त पाणी पडल्यास, "ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे, तुझे (शेव को) ही तो ढूंढे!"

सूप खारट झाल्यास, "पानी पानी रे, खारे पानी रे!"

भाजीत मीठ विसरल्यास, "तेरे बिन नही जिना, मर जाणा सोनिया!" "तेरे बिना, दिल नही लगता!", आणि तशीच बिना मिठाची भाजी खावी लागल्यास,"अब तेरे बिन, जी लेंगे हम, जहर जिंदगी का, पी लेंगे हम!" किंवा रोझा लिन चे, "Snapping, one, two, Where are you? You're still in my heart, Snapping, three, four, Don't need you here anymore, Get out of my heart!"

पनीर मटर, नान, बटर रोटी खूप आवडणारा, पुन्हा पुन्हा खाणारा खादाड माणूस, "तुझ मे रब दिखता हैं, यारा मैं क्या करू?" किंवा "आज फिर तुमपे प्यार आया हैं, बेहद और बेहिसाब आया हैं!" किंवा सेलेना गोमेझचे गाणे "The heart wants, what it wants!"

डायबेटिस असणारा माणूस जेव्हा रसगुल्लाची रेसिपी बघतो, तेव्हा "तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा!", "याद आ रहा हैं, तेरा प्यार!"

खोकल्याचा त्रास असणाऱ्या माणसाला लोणचे, कैरी, चिंचेची चटणी दिसल्यास, "तू मेरे पास ही हैं, तू मेरे साथ ही है, फिर भी तेरा, इंतजार हैं!"

वडा पाव ची जोडी असो की मग इडली सांबार किंवा मग पाव भाजी असो, "ये दोसती, हम नहीं छोडेंगे!"

एकटा वडा, मिसळ, भाजी हे सर्व हातात हात घालून पावची गाडी बेकरीतून यायची वाट बघत असताना रस्त्यावर नाचतात, "यार बिना चैन कहां रे!" किंवा "तनहा तनहा यहा पे जिना, ये कोई बात है? कोई साथी नहीं तेरा यहाँ तो, ये कोई बात है?"

बराच वेळ हॉटेलात ऑर्डर केलेला पदार्थ खूप वेळ होऊनही आला नाही किंवा घरी खाद्य पदार्थांचे पार्सल मागवले आणि बराच वेळ झाला तरी आले नाही तेव्हा, "दिल ये बेचैन रे, रस्ते पे नैन रे, पेट का बुरा हाल वै, आजां सावरिया, आं आँ आं आं, ताल से ताल मिला (पेट की भुख मिटा), हो हो हो!" किंवा "करिये ना, करीये ना कोई वादा किसीसे करिये ना, करिये करीये, तो वादा फिर तोडिये ना!"

तब्येतीवर परिणाम माहीत असूनही एखादा पदार्थ खाल्यास त्या व्यक्तीचे आतडे म्हणतील, "कितने भी तू करले सितम, हंस हंस के (नहीं) सहेंगे हम!"

आणि एवढे सगळे खाऊन अपचन झाल्यास शकीरा आहेच- शामिना मीना ए ए "वक्का वक्का" ए ए!

Group content visibility: 
Use group defaults