नमस्कार,
गाण्यात काही बदल करुन ..मिक्सिंग हा प्रयोग करुन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे..
मुळ गाणे घेउन SOUND FORGE हे सॉफ्टवेअर वापरुन. गाण्यातले संगीत, ताल आणि आवाज बदलुन नव्या पध्दतीने बनवले आहे... हे सॉफ्टवेअर अफाट आहे ... त्यामुळे अजुन शिकतच आहे...:) .
प्रयोग म्हणुन खालील दोन गाणी बनवलेली आहेत... कृपया ऐकुन अभिप्रय द्यावा....
.
.
सुचना:- कृपया ऐकताना इअरफोन लावुन ऐकावे.....त्याने इफेक्ट जास्त कळतो.....
.
धन्यवाद....
--------------------------------------------------------------------------------------------------------------
१)
मित्रांनो ! मी तसा मा.बो. वरचा जुनाच पडीक आहे. म्हणजे बघा, उणीपुरी १० वर्षे काढलीत मी ईथे. सुरवातीची साडे-चार वर्षे मी अगदी साधा-सुध्या स्वरूपात जपून-जपून प्रतिक्रिया देत काढली. पण माझा येळकोट काही रहात नव्हता आणि मुळ स्वभाव जात नव्हता. शेवटी एक दिवशी माझ्यातल्या मी चा साक्षात्कार झाला आणि "नम्र टवाळा" चा जन्म झाला. बराच काळ मुख्यतः कट्टा आणि क्वचित दुसर्या काही पानांवर टवाळक्या केल्यानंतर आता स्वतःचे एक पान सुरू करावे अशी सुरसुरी आली. या पानाचे नाव मी "टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)" असे देण्याचे मुख्य कारण टवाळ या आय्-डी सारख्याच मा.बो.
लोकेशन रे लोकेशन !
हिंदी सिनेमा मधली गाणी म्हणजे आवडीची गोष्ट एकदम . त्यातून ती ५०-६०-७० च्या दशकातली म्हणजे तर गाणे दहा वेळा बघितले असले तरी नजर जराही हटायला तयार होत नाही .
स्टुडीओच्याबाहेर चित्रण झालेली , काही गाणी बघताना एकदम जाणवले की अरे हे मागे दिसते आहे ते तर आपण पाहिलं आहे . आणि मग सुरु झाला एक वेडगळ छंद , ज्यात गाण्यापेक्षा, हिरो आणि हिरविणीपेक्षा, मागच्या इमारती , बागा वगैरे निरखून बघण्याचा .
अशीच काही नमुने दाखल गाणी तुमच्या साठी . आपल्या ओळखीच्या ऐतिहासिक स्थळा ची एक चक्कर घडवून आणणारी ..
दिनांक - ३१ जाने. २०१२
वेळ - सायंकाळी ६ ते ९
ठिकाण - लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे
![G.Mahambare_web.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u44/G.Mahambare_web.jpg)
ज्येष्ठ कवी, लेखक कै. गंगाधर महाम्बरे
ह्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ "सुमनांजली" सादर करीत आहे
"सूर शब्द लहरी"
महाम्बरे आजोबांनी लिहिलेल्या 'पूर्व-पश्चिम' च्या पुस्तकातील काही निवडक रागांच्या लक्षणगीतांवर आधारित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
संगीत
श्री म.ना.कुलकर्णी
गायक
नमस्कार मित्रांनो, ह्या वेळेसचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव २०११ कधी आहे? तारखा कुठल्या आहेत? वेळा काय आहेत? किती सत्र होणार आहेत? कोण कोण गाणार आहेत? तिकिट कुठे मिळतील आणि त्यांच्या गटानुसार किमती काय आहेत इत्यादी सर्व प्रश्नांची मला नीट सविस्तर उत्तरे हवी आहेत. धन्यवाद.
प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.
शम्मी कपूरवर या आधीच का बीबी काढला गेला नाही माहीत नाही. आता तो गेल्यावर काढण्याची बुद्धी व्हाही हे दुर्दैव. पण निदान त्यानिमित्ताने का होईना आपल्याला शम्मीबद्दल सतत बोलत रहाण्याची संधी घेता येऊ शकेल. त्याला श्रद्धांजली म्हणून हा बीबी.
शम्मी कपूर का आवडतो याची कारणे अनलिमिटेड. त्याच्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं, प्रत्येक सीन केवळ सुंदर! माझ्या दृष्टीने सर्वात रोमॅन्टिक, सर्वात देखणा, व्हर्सटाईल अभिनेता म्हणजे शम्मी कपूर.
शम्मी आपल्यात आता नाही, एक युग समाप्त झालं असं काही होऊच शकत नाही त्याच्या बाबतीत. लिजन्ड्स लाईक हिम आर फॉरेव्हर.
माझं सर्वात आवडतं गाणं -
मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....
सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.