आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.
आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.
तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...
अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.
![pankaj.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36412/pankaj.jpg)
२८ सप्टेंबरला लतादीदी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या एका कट्टर चाहतीने सांगितलेली ही एक आठवण. - (ज्योती कांबळे, Manchester, UK)
-------
जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.
नमस्कार मित्रांनो,
परवा आकाशवाणी अहमदनगरवर ...( फ्रिक्वेन्सी १००.१ मेगाहर्टस् )
"साहित्य सौरभ" कार्यक्रमात....मायबोलीकर "जयवी -जयश्री अंबासकर"
यांची, देवकीपंडीत , वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोंडकर यांनी गायलेली आणि अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी
ऐकविण्यात आली ...... या निमित्ताने जयश्री यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!
...............................................शाम
आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा .. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्यांसाठी .. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गजल ऐकण्याच्या प्रवासातला हा खर्या अर्थाने पहिला "समज" आलेला टप्पा. म्हणजे या आधी गजल ऐकल्या नाहीत असं नाही. पण काहीसा उथळ पाण्याला खळखळाट फार... तसं ऐकण होतं. म्हणजे गजल कशाशी खातात किंबहुना गजल आपल्याला कशी खाते, ते न कळत्या वयाचा प्रमाद होता तो. अनुप जलोटा, पंकज उधास, गुलाम अली अशी गाव परत परत घेत.... ती, गोल गोल फिरणारी, एखाद्या लहान मुलांच्या पार्कातली गाडी असावी ना, तसं चाललं होतं.
पंकज उधास म्हटलं की, त्या काळातल्या त्याच्या गाजलेल्या शराबच्या गजला आठवतात. शराब चीज ही ऐसी है, साकी शराब ला, असल्या.
लोकहो,
-- स्थानिक म. मंडळासाठी मराठी गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. काही गाण्यांचे ओरिजिनल ट्रॅक्स हवे आहेत. ते कुठे मिळतील ? त्यासंबधी लिंक्स मिळू शकतील काय ?
-- किंमतीचा काही अंदाज ?
-- ट्रॅक्स चे स्केल बदलता येते का ? उत्तर ' हो ' असेल तर कुठे, केवढ्याला ?
ही काही गाणी---
- फुलले रे क्षण माझे फुलले रे
- का रे अबोला
- काल पाहिले मी स्वप्न गडे
- बाई बाई मन मोराचा कसा पिसारा
- स्वप्नात रंगले मी
- का कळेना कोणत्या क्षणी
- तोच चंद्रमा नभात
- गेले ते दिन गेले
- मानसीचा चित्रकार तो
- नसतेस घरी तू जेव्हा
कोर्सेराच्या लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.
पूर्वपीठीका: संयुक्ताच्या विविध उपक्रमांमध्ये, चर्चांमध्ये 'पुढे' शिकण्याबद्दल बोलणे नेहमी होत असते. अशाच गप्पांमधून कोर्सेराची माहिती पुढे आली. पुढे शिकण्याच्या वेगवेगळ्या पर्यांयांविषयी माहिती आईला शाळेत जायचंय या धाग्यात एकत्र केलेली आहे.