जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
कोर्सेराच्या लिसनिंग टू वर्ल्ड म्यूझिक या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.
पूर्वपीठीका: संयुक्ताच्या विविध उपक्रमांमध्ये, चर्चांमध्ये 'पुढे' शिकण्याबद्दल बोलणे नेहमी होत असते. अशाच गप्पांमधून कोर्सेराची माहिती पुढे आली. पुढे शिकण्याच्या वेगवेगळ्या पर्यांयांविषयी माहिती आईला शाळेत जायचंय या धाग्यात एकत्र केलेली आहे.