कोर्सेराच्या इंट्रोडक्शन टू फायनान्स या कोर्सविषयीच्या गप्पा. इथे आपल्या असाइनमेन्ट्स, शंका आणि अनुभवांची चर्चा करावी. महत्त्वाची माहिती या धाग्याच्या मजकूरात वेळोवेळी वाढवली जाईल.
--
भरत मयेकर यांनी दिलेली फायनान्सच्या इतर कोर्सेस विषयी माहिती:
भारतातील मंडळींना पर्सनल फायनान्ससाठी अभ्यास करण्यासाठी
http://www.nseindia.com/education/content/module_ncfm.htm
इथले पहिले दोन कोर्सेस उपयुक्त आहेत.
NSE ने MKCL च्या जोडीने चालवलेला आर्थिक साक्षरतेविषयीच्या या कोर्सची माहितीही शोधाशोध करताना मिळाली.
http://www.mkcl.org/wave/Financial-Literacy/syllabus.html
--
पूर्वपीठीका: संयुक्ताच्या विविध उपक्रमांमध्ये, चर्चांमध्ये 'पुढे' शिकण्याबद्दल बोलणे नेहमी होत असते. अशाच गप्पांमधून कोर्सेराची माहिती पुढे आली. पुढे शिकण्याच्या वेगवेगळ्या पर्यांयांविषयी माहिती आईला शाळेत जायचंय या धाग्यात एकत्र केलेली आहे.
--
हा धागा सार्वजनिक व वाहता आहे.
इकडे काय हाल
इकडे काय हाल हवाल??असाईनमेंट्स करताय का? मला आता जरा बोअर व्हायला लागले आहे.मला वाटत होते कि डे-टूडे लाईफमध्ये वापरता येईल अशी इन्वेस्ट्मेंट्/बजेटींग वगैरेची माहिती असेल,टीप्स असतील.पण हे सारखी गणिते सोडवणे कंटाळवाणे होत आहे.
.मला वाटत होते कि डे-टूडे
.मला वाटत होते कि डे-टूडे लाईफमध्ये वापरता येईल अशी इन्वेस्ट्मेंट्/बजेटींग वगैरेची माहिती असेल,टीप्स असतील. >>> +१००.. माझेही तेच झाले.
मला मुख्यतः पर्सनल फायनान्स बद्दल शिकायचे होते. बेसिक फायनान्स प्लानिंग स्ट्रॅटेजीज वगैरे. पण हे वेगळे आहे. याला इकॉनॉमिक्स बॅग्राऊंड लागत आहे थोडीफार.
सॉरी, मध्येच लिहील्याबद्दल.
सॉरी, मध्येच लिहील्याबद्दल. पण हा कोर्स डे टू डे फायनान्स किंवा बेसिक्स साठी नाहीये. हा कोर्स मुख्यतः कोअर फायनान्स कडे वळण्या आधी इंट्रोडक्शन असा आहे.
मी रजिस्टर केलं खरं त्या
मी रजिस्टर केलं खरं त्या कोर्सला पण एकदाही जाऊन काय चालू आहे हे पाहिलं नाही. आता वरचं वाचून तो कोर्स माझ्याकरता नाही असंच वाटतंय.
स्वती, बरोबर आहे तुझं..
स्वती, बरोबर आहे तुझं.. त्याचमुळे तो कोर्स माझ्यासाठी नाहीये. मला कोअर फायनान्स कडे वळायचं नाहीये सध्यातरी तसा काहीच विचार नाहीये. पण कोर्स मात्र पूर्णपणे त्याच दिशेने चालू आहे.
मी सिलॅबस पाहिल्यावर याच
मी सिलॅबस पाहिल्यावर याच विचाराने गप बसले होते. तेव्हा वाटलेलं तुम्ही सगळ्या किती भारी आहात! पण छ्या फोडलाच तुम्ही भ्रमाचा भोपळा!!
बस्के.
बस्के, तुला सिलॅबस वाचून तरी
बस्के, तुला सिलॅबस वाचून तरी कळलं पण मला इथे वाचल्याशिवाय कळण्याची शक्यताच नव्हती
बस्के मी तर तिकडे वळूनही न
बस्के
मी तर तिकडे वळूनही न बघणं योग्य. मी गणितशत्रू आहे !
स्वाती +१ मी माझ्या कामासाठी
स्वाती +१
मी माझ्या कामासाठी उपयुक्त म्हणून घेतलाय.
बस्के स्वाती,मवा खरंच जरा
बस्के
स्वाती,मवा खरंच जरा अवघडच आहे.
कठीण आहे तसा हा कोर्स असं
कठीण आहे तसा हा कोर्स असं दुसरी असाइनमेंट करताना लक्षात आलं!
अगदीच पर्सनल फायनान्स नसलं तरी बिझीनेस सुरु करण्याच्या दृष्टीने वगैरे लोन घेताना, लाँग टर्म इन्वेस्ट्मेंट करताना याचा नक्कीच उपयोग होईल असं वाटतय.
स्वाती, तू आत्ता करते आहेस की तुझा पुर्ण झाला आहे? (मी विसरले तू आधी एकदा काय लिहीले होते ते!)
सिलॅबसमध्ये दिलेल्या (पीडीएफ-
सिलॅबसमध्ये दिलेल्या (पीडीएफ- पान ८) क्लास शेड्युल : टॉपिक्स -रिडिंग्जमधले काही विषय पर्सनल फायनान्सला उपयुक्त दिसताहेत. पण सुरुवातीचे प्रेझेंट व्हॅल्यू, कॅश फ्लो इ. कॉर्पोरेट फायनान्ससाठी शिकावे लागतात.
भारतातील मंडळींना पर्सनल फायनान्ससाठी अभ्यास करण्यासाठी
http://www.nseindia.com/education/content/module_ncfm.htm
इथले पहिले दोन कोर्सेस उपयुक्त आहेत.
NSE ने MKCL च्या जोडीने चालवलेला आर्थिक साक्षरतेविषयीच्या या कोर्सची माहितीही शोधाशोध करताना मिळाली.
http://www.mkcl.org/wave/Financial-Literacy/syllabus.html
म्रुदुला, मधुरा व मयेकरांनी
म्रुदुला,
मधुरा व मयेकरांनी दिलेले दुवे व त्याची माहिती घालशील का वर?
मयेकर, धन्यवाद. दोन्ही लिंका
मयेकर, धन्यवाद. दोन्ही लिंका सेव्ह केल्यात.
( डोक्याला झेपतय की नाही ते कळेल काही दिवसात)
मी २०१३ साठी नोंदणी केलीय.
मी २०१३ साठी नोंदणी केलीय. तुमच्याकडून "प्रेरणा" मिळावी म्हणून इथे चक्कर मारावी म्हटले तर इथले comments वाचून हवाच निघालीय. कोर्स पूर्ण केलेल्यांनी अनुभव सांगा plz
(No subject)