सवाई २०११ : कॅमेराच्या डोळ्यातून
या वेळेस सवाईमध्ये काही फोटो काढायला मिळाले. फार वेळ जाउ नये म्हणून काहीही संस्कार न करता ते फोटो इथे टाकतेय.
पहिल्या दोन दिवशी फोटो काढलेले चालतील असे वाटले नव्हते, त्या मुळे कॅमेराच नेला नव्हता. अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले.
या वेळेस स्टुडन्ट पास मिळाल्याने खुप पुढुन अनुभवायला मिळाला कार्यक्रम. अन त्याच मुळे फोटोही काढता आले. शिवाय सकाळच्या सेशन्सलाही फोटो काढायची परवानगी मिळाल्याने तिथलेही फोटो काढता आले.