पर्यावरण

मला आवडते वाट (आड)वळणाची...

Submitted by Discoverसह्याद्री on 16 November, 2013 - 10:52

पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार

..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
01Vajantri_KaulyaDhar_DiscoverSahyadri.jpg

नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'

फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात

Submitted by Discoverसह्याद्री on 21 October, 2013 - 14:59

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

00Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस

Submitted by Discoverसह्याद्री on 6 October, 2013 - 10:53

..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.

...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...

...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:

'अर्बन लीव्हज्' (Urban Leaves)च्या संस्थापिका प्रीती पाटील यांची मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 August, 2013 - 05:04

महानगरांमध्ये आपल्या घरात, बाल्कनीत, परसदारी किंवा टेरेसवर हौसेने बाग फुलविणार्‍यांची संख्या कमी नाही. ग्लोबल वॉर्मिंग, अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांच्या वातावरणात मुंबईसारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अर्बन फार्मिंग (नागरी शेती) सामुदायिक स्वरूपात (कम्युनिटी फार्मिंग) यशस्वीपणे अंमलात आणणार्‍या प्रीती पाटील यांचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. शाश्वत शेतीचे धडे देणारे त्यांचे कार्य व त्यांची संस्था अर्बन लीव्हज् (Urban Leaves) यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा योग आला. त्यांची ही मुलाखत खास मायबोलीकरांसाठी!

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

Submitted by Discoverसह्याद्री on 20 July, 2013 - 12:27

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
MadheUpandya_DiscoverSahyadri_01.jpg

हे करून बघा........

Submitted by मी मी on 25 June, 2013 - 12:16

मित्रांनो या पावसाळ्यात तुमच्या छोटुल्या मुलांबरोबर मिळून एक सुंदरसा प्रयोग आणि त्यासोबत धम्माल मस्ती नक्की करून बघा......

[३] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : ’विपुलाच सृष्टी’

Submitted by दामोदरसुत on 6 July, 2012 - 04:47

सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! :[ब्लॉगचे नाव असते तसे]

’विपुलाच सृष्टी’

"प्रयोग परिवार साधतोय द्राक्षशेतीतून प्रगती:

गुलमोहर: 

लवासा संबंधित चर्चेच्या निमित्ताने

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

शैलजाने लिहिलेले 'लवासा' या निळू दामलेंच्या पुस्तकाचे केलेले परिक्षण वाचूनच मला खरंतर या प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर निळू दामलेंचाच 'कालनिर्णय' मधिल लेखही वाचला. याप्रकल्पाबद्दल आधी काहीच माहिती नसल्याने माझी काही परिचितांशी याबाबत चर्चा सुरु झाली. त्यांच्याकडून जनआयोगाचा चौकशी अहवाल वाचायला मिळाला. (हे सगळं मागच्या २ दिवसात झालं). हे वाचन चालू असतानाच अनेक पर्यटन विकास आराखड्यांच्या प्रकल्पावर काम केलेल्या एका मित्राशी पण बोलत होते. त्याच्या बोलण्यामधून आणि वाचत असलेल्या काही बातम्यांमधून माझ्या लवासाबद्दलच्या शंका मिटण्यापेक्षा आणखी कुतुहल वाढले.

विषय: 
प्रकार: 

हवा तसा लवासा ?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती ईत्यादी विषय हे अलिकडे ग्लोबल वॉर्मिंग च्या अनुशंगाने पुन्हा नव्याने चर्चिले जात आहेत. त्यातही सुनामी, अवेळी पाऊस, वादळे, ज्वालामुखी, ऋतूंची कोसळललेली दिनदर्शिका, वाढते तापमान या अवती भोवती घडणार्‍या गोष्टी पाहता कुठेतरी काहीतरी गडबडलय ईतपत शंका सामान्य माणसाला येत रहाते. त्यात मग ऐन सणासुदिच्या दिवसात अचानक h1n1 सारखे साथीचे आजार, कधी कुठेही ऊपटणारे विषमज्वर, किंव्वा ईतर ज्ञात नसलेले विषाणू संसर्ग, ईत्यादि अनुभवातून बेजार होणार्‍या सामान्य माणसाच्या मनात "निसर्गाचं संतुलन निश्चीत काहितरी बिघडलय" ही भिती अधिक बळकट होते.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण