बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तो स्वतःशीच हसला.
आसपास तुरळक लोकांची ये-जा चालू होती.
त्याने सहजच माणसं मोजली. १३.
त्याने आजुबाजूला नजर टाकली. एक सिक्युरिटीवाला उभा होता. बंदूक होती त्याच्याकडे.
ही सकाळची वेळ तशी शांतच असते. जास्त रहदारीही नव्हती रस्त्यावर.
त्याने घड्याळ पाहिले. गाडीची वेळ झाली होती. आता कुठल्याही क्षणी त्याचे मित्र येणार होते.
"फक्त चार दिवस!" तो मनात म्हणाला. "शुक्रवारी याच टायमाला दरोडा टाकायला हवा या बँकेवर"
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय - चॉकलेट,गोळ्या,लहानपणीचा खाऊ
लहानपणीच्या अनेक आठवणी आपल्या गाठीशी असतात..त्यातील सगळ्यात गोड आठवण म्हणजे खाऊ..लहानपणी खाल्लेल्या खाऊ ची सर आत्ताच्या बर्गर,पिझ्झा मध्ये नाही...शाळेच्या मधल्या सुट्टीत खाल्लेल्या चिंचा, उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी खाल्लेला पेप्सिकोला....अजून खूप काही..
मग अशाच तुमच्या आठवणीतल्या छान छान खाऊची प्रकाशचित्र आम्हाला पाठवा..
खेळाचे नियम व अटी -
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
" अरे गणू, कानात हे काय घातलयस? आणि एव्हढी धाप का लागलीय तुला.?"
" आता जायचंय ना त्याची तयारी, रोज जॉगिंग..."
"म्हणजे?."
" पूर्वी उकडीचे किंवा तळणीचे असायचे, आता
खवा, काजू, गुलकंद, झालच तर sugarless... असंख्य प्रकार आणि SOMIच्या फोटोसाठी ही आरास मांडलेली.. राहवत नाही ग ताव मारल्याशिवाय म्हणून तर हा व्यायाम"
"आणि कानातले earbuds, मुंगळा- झिंगाटचा धिंगाणा अति झाला की लताच्या गणराज रंगी वर tune-in करायला.."
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
त्याचा चेहरा उजळला. त्याला खूप आवडायची ती. पण कधी तिला हे सांगायचा धीरच नव्हता झाला.
"तू तर येणार नव्हतीस ना?"
ती हसली, "तुला काहीतरी सांगायचं होतं"
"काय?"
तिने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि जायला वळली.
"थांब की"
"ए आद्या कोणाशी बोलतोयस?"
त्याने पाहिलं तर सगळा ग्रूप पडल्या चेहर्याने उभा.
"अरे आपल्या ऑफिसमधली केतकी आहे ना ती थोड्या वेळापूर्वी अॅक्सिडेंट मधे गेली"
"छे! कसं शक्य आहे? ती आत्ता इथे..."
ओळख
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
वेणीचा लांब शेपटा. केसात गजरा. कॉटनची कडक साडी. नक्की तीच!
नेहमी अशीच रहायची..
अजूनही तशीच दिसते.
“प्रसाऽऽद!”
तिने त्याच्या दिशेने पहात हात हलवला.
त्याचे डोळे भरून आले.. बारा वर्षांनंतरही तिने मला ओळखलं? आठ वर्षाचा होतो घरातून निघून गेलो तेव्हा..
तिच्यासोबत घालवलेला एक एक प्रसंग आठवून जीवाची घालमेल झाली.
वाटलं धावत तिच्याजवळ जावं आणि तिला घट्ट मिठी मारून सांगावं..
‘आई मी तुला..’
पाऊल पुढे पडलंही..
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
बांधलेले केस, उत्फुल्ल चेहरा, वय वाढल्याच्या खुणा तरी अजुनही आकर्षक. त्याची नजर तिच्या अंगप्रत्यंगावरुन फिरत्येय, बारा वर्षांनी! छद्मी हास्य. शरीरात उष्णउर्जेचा लोट, आणि दुसर्याच क्षणाला तो तिच्या समोर! "मी बदललोय, आपण परत आयुष्य चालू करू" शब्द कानावर पडायला आणि गळ्यात दोन्ही हाताचा विळखा पडायला एक गाठ. "माया जरा हळू!" ओठ चावलाच तिने.
त्याची नजर मायाच्या शरीराला आरपार भेदत्येय!
"माझीच ना?"
"तुला काय हवंय? पैसे?"
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..
आजचा विषय - मी पाहिलेले देऊळ
मंडळी, आपल्याला मनःशांती हवी असेल तर आपसूकच पावले देवळाकडे वळतात. मंदिर, मग ते कोणत्याही देवतेचे असले तरी तेथे जाऊन दर्शन घेतल्यावर मनाला वेगळेच समाधान लाभते. प्रत्येक देवळासोबत एक कथा किंवा वैशिष्ट्य निगडित असते. काहींची स्थापत्य शैली खास असते, तर काही देवळे तिथल्या दैवतासाठी प्रसिद्ध असतात. तुम्ही कोणते देऊळ पाहिले आहे? इथे प्रकाशचित्र द्या आणि सोबत त्याचे वैशिष्ट्य/माहिती लिहिलीत तर उत्तमच!
मस्तांग आलू
साहित्य:
बटाटे, तेल, मीठ, मसाला( तिखट, जिरेपूड, आमचूर, गरम मसाला, चाट मसाला ह्यांचे मिश्रण)
कृती: