उपक्रम

लेखन स्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे..'- कविन

Submitted by कविन on 27 September, 2023 - 00:40

स्त्री असणं म्हणजे? स्त्री असणं म्हणजे स्त्री असणं.

जीवशास्त्रानुसार 'स्त्री प्रजनन प्रणाली' असलेली शरीर रचना घेऊन जन्माला आलेला मानवी जीव म्हणजे स्त्री. या व्याख्येनुसार मी स्त्री आहे.

आणि
Gender identity is defined as a personal and internal sense of oneself as male, female, or other. - या नुसारही मी female gender आहे

लेखन उपक्रम ३ - बालहट्ट - मामी

Submitted by मामी on 26 September, 2023 - 23:00

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...

त्याच्या डोळ्यांमधील चिपवर शाळेकडून आलेला 'सहल कॅन्सल'चा संदेश त्याला मिळाला. त्याची ही पहिली ओव्हरनाईट ट्रिप होती. ती पण दुसर्‍या एक्झोप्लॅनेटवर - डॅगोनवर - पण त्या ग्रहाच्या सौरमंडलात सौरवादळ होण्याची शक्यता ०.०००००००००००००००००००००१ ने वाढल्याने शाळेने सहल कॅन्सल केली होती.

रडूनरडून गोंधळ घातला त्यानं. आज'च' शाळेतून'च' सहलीला जायचयं'च'!

विषय: 

लेखन उपक्रम-३ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-२

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 10:49

मायबोलीकरांनो, 'शशक पूर्ण करा' या उपक्रमासाठी अजून एक नवीन सुरुवात आम्ही खाली देत आहोत.

" शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच..."

चला लवकर, ही सुरुवात पकडून वेगवेगळ्या काल्पनिक कथा मांडा.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

विषय: 

लेखन उपक्रम २ - सुंदरता - अजय चव्हाण

Submitted by अजय चव्हाण on 26 September, 2023 - 07:53

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं.

चेहरा पूर्ण ओढणीने झाकून घेतला असला तरी ते डोळे आणि त्या परिचित सुंगंधाने तीच असावी, असं सारखं त्याला मनोमन वाटतं होतं.

खरंतरं ती त्यांच्या बॅचची कॉलेजक्वीन. तिच ते शालीन सौंदर्य विसरण्यासारखं नव्हतंचं मुळी. तिलाही तिच्या सुंदरतेचा फार अहंकार नसला तरीही अभिमान मात्र नक्की होता.

इतक्यातच,अचानक धाडधाड करत मालगाडी आली नि गेली. तसा तो वर्तमानात आला आणि पुन्हा तिच्याकडे पाहीलं‌ आणि क्षणात विजेचा झटका बसावा तसा दिड फूट मागे सरला.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम २ - आर यू रेडी? - मॅगी

Submitted by मॅगी on 26 September, 2023 - 07:21

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

टीनेजर सावळी मुलगी, पिवळा स्वेटशर्ट, पाठीला काळ्या कार्टून म्हशीची कीचेन लावलेली सॅक. "आर यू रेडी टू गो?" तिने विचारले. "बसची वाट बघतोय." काही न सुचून तो म्हणाला. हल्ली स्ट्रेंजर डेंजर शिकवत नाहीत वाटतं. बसमध्ये त्याचं शेजारी लक्ष गेलं. तीच!

च्यायला! कार धड असती तर बसने यावं लागलं नसतं... "रेडी टू गो?" तिने सॅकमधली सुतळ गुंडाळत पुन्हा विचारलं.

विषय: 
शब्दखुणा: 

चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-८ - माझ्या घरातून दिसणारा परिसर

Submitted by संयोजक on 26 September, 2023 - 06:38

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय - माझ्या घरातून दिसणारा परिसर

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशी देखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात अतिशय प्रेम आणि ममत्वाची भावना दडलेली असते. घराबरोबर त्याच्या आजूबाजूचा परिसर ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

मग अशाच घराभोवतीच्या सुंदर परिसराची प्रकाश चित्रे आम्हाला पाठवा.

खेळाचे नियम व अटी -

विषय: 

लेखन उपक्रम २ - सुटका - rmd

Submitted by rmd on 25 September, 2023 - 22:24

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिचा चेहरा ओढलेला होता. गाल सुजलेला. शरीर खंगलेलं. हातात एक सूट्केस. खांदयाला पर्स.
पण तिच्या डोळ्यांत मात्र आनंद फुलून आलेला होता.
"आलीस?"
"हो. कायमचं सगळं सोडून आले. परत न जाण्यासाठी"
"आधीच का नाही आलीस परत?" त्याने आवंढा गिळला.
"सुरूवातीला तो असा असेल असं वाटलं नाही. हळुहळू त्याचा खरा चेहरा समोर आला.
आणि कुठल्या तोंडाने घरी येणार होते? तुमच्या मनाविरूद्ध पळून गेले होते ना! धीरच झाला नाही.
आता हेच माझं नशीब असं मान्य केलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम २ - विल्हेवाट - मामी

Submitted by मामी on 25 September, 2023 - 10:45

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

तिने नेहमीप्रमाणेच रेशमी फुलाफुलांचे वस्त्र परिधान केले होते. केशभूषणांनी तिचे केस सुरेखशा रचनेत मस्तकावर रचले होते. लाडिकपणे दांतात धरलेली गवताची काडी तिच्या ओठांवर मोहक दिसत होती! तिच्या हातात काळा मखमली बटवा शोभून दिसत होता - रोजच्याप्रमाणेच!

तो त्या अप्सरेकडे एकटक बघतच राहिला. आजची सकाळही कारणी लागली म्हणायची!

....................... टिंग टिंग!!!!

"भाऊ, टाका ती कचर्‍याची पिशवी गाडीत. रोज काय शेजारणीकडे टक लावून बघता! "

विषय: 

लेखन उपक्रम २ - गिफ्ट - मामी

Submitted by मामी on 25 September, 2023 - 08:12

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

ती चिमुरडी झाडाखाली बसून रडतरडत कागदावर काहीतरी एकाग्रतेने लिहित होती. त्यानं हळूच तिच्या मागे जात त्या कागदावरचा मजकूर वाचला.

कागदावर जागा मिळेल तिथे केवळ एकच शब्द पुन्हापुन्हा लिहिला होता तिनं - 'आई'!

दीर्घ उसासा सोडून त्यानं पाठुंगळीची सॅक खाली काढली. दोन खेळणी बाहेर काढली आणि तिची तंद्री भंग होणार नाही अशा बेताने तिच्याजवळ ठेवली. पुन्हा सॅक खांद्यावर टाकून त्यानं स्वतःचे डोळे पुसले.

तिची खरी मागणी पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामधे नव्हती.

विषय: 

चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - sonalisl - विराज

Submitted by sonalisl on 25 September, 2023 - 08:09

Pages

Subscribe to RSS - उपक्रम