एकारंभा अनंतार्था
लेखन उपक्रम ३ – आजी - बिपीन सांगळे
आजी
---------
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...तो जेव्हा उठला , घरातलं वातावरण वेगळंच होतं .
त्याची आजी गेली होती.
त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता . तो बाहेर अंगणात आला . तिथे मारत्या होता . त्याच्यापेक्षा मोठा .
तो म्हणाला, ' सदा, तुजी सहल बुडाली ! '
सदाने विचारलं , ' का ? '
'तुजी आज्जी देवाकडं गेली .'
' 'मंजी ? तीबी सहलीलाच गेली का ? '
' हो '
' मंग ती मला का नाय घिऊन गेली ? '
लेखन उपक्रम ३: उठा उठा सकाळ झाली - कविन
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... कर्णकर्कश आवाजात गजर वाजायला सुरुवात झाली.
"अरे दिनू अरे एss बाळा उठायचं नाही का तुला? आज सहल आहे ना!" आईने पांघरूण काढत विचारलं.
"पाच मिनिटं झोपूदे गं"
"पाच पाच करत पंधरा मिनिटं झाली. आता उठतोयस की पंखा बंद करु?"
यावरही त्याने फक्त "हुम्म्म!" म्हणत कुस तेव्हढी बदलली.
लेखन उपक्रम २- उडदामाजी - बिपीन सांगळे
उडदामाजी
-------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक प्रतिक्रिया होती , माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे- या वाक्यावर आलेली .
त्याला ते वाक्य अन प्रतिक्रिया दोन्ही आवडलं . अन त्याच्या डोळ्यांपुढे अनेक प्रतिक्रिया फिरू लागल्या .
खऱ्या- बऱ्या, तिरकस - जोरकस, वेचक - वेधक, खोचक - भोचक, भ्रम तोडणाऱ्या - तंगड्या ओढणाऱ्या...
लेखन उपक्रम २ - मोह - sonalisl
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....
त्याने तिला बघून न बघितल्यासारखे केलेही पण सभोवताल दरवळणारा गंध त्याला अगदी स्वर्गसुखाची आठवण करून देत होता आणि न रहावून त्याची नजर तिच्याकडेच वळत होती. आतापर्यंत कितीतरी सुखाचे क्षण तिच्याचमुळे त्याच्या आयुष्यात आले होते ते तो विसरू शकत नव्हता.
गेले चार महिने त्याने कटाक्षाने पथ्य पाळले होते. पण आता बास! किती मन मारायचे!
लेखन उपक्रम ३ - बालहट्ट - मामी
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...
त्याच्या डोळ्यांमधील चिपवर शाळेकडून आलेला 'सहल कॅन्सल'चा संदेश त्याला मिळाला. त्याची ही पहिली ओव्हरनाईट ट्रिप होती. ती पण दुसर्या एक्झोप्लॅनेटवर - डॅगोनवर - पण त्या ग्रहाच्या सौरमंडलात सौरवादळ होण्याची शक्यता ०.०००००००००००००००००००००१ ने वाढल्याने शाळेने सहल कॅन्सल केली होती.
रडूनरडून गोंधळ घातला त्यानं. आज'च' शाळेतून'च' सहलीला जायचयं'च'!
उपक्रम ३ - नांदी - सामो
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच, बिट्टीला जागे केले. "बिट्टे ऊठ,आज गंमाडी-जंमत " बिट्टीही टुण्ण्कन उठून बसली. आज पानशेत धरणावरती पक्षी निरीक्षणाची सहल होती.
लेखन उपक्रम २- बिहाइंड एव्हरी - बिपीन सांगळे
बिहाइंड एव्हरी
----------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक ओळ होती - बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज क्राईम. एका पुस्तकात कोटेशन म्हणून वापरलेली . ते पुस्तक त्याने नुकतंच घेतलं होतं.
मग त्याच्या डोळ्यांसमोर इतिहास आला . अनेक देश , राजवटी , धर्म, जाती, धार्मिक संस्थानं, कॉर्पोरेट कंपन्या आल्या . ज्यांनी स्वतःचा विकास केला होता. राज्य केलं होतं.
वाचनातून अनेक आयडीयाज मिळतात , असं त्याचं मत होतं. त्याचं वाचन अफाट होतं. त्याच्या अफाट दहशतीसारखं .
तो एक गँगस्टर होता !
लेखन उपक्रम २ - विल्हेवाट - मामी
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिने नेहमीप्रमाणेच रेशमी फुलाफुलांचे वस्त्र परिधान केले होते. केशभूषणांनी तिचे केस सुरेखशा रचनेत मस्तकावर रचले होते. लाडिकपणे दांतात धरलेली गवताची काडी तिच्या ओठांवर मोहक दिसत होती! तिच्या हातात काळा मखमली बटवा शोभून दिसत होता - रोजच्याप्रमाणेच!
तो त्या अप्सरेकडे एकटक बघतच राहिला. आजची सकाळही कारणी लागली म्हणायची!
....................... टिंग टिंग!!!!
"भाऊ, टाका ती कचर्याची पिशवी गाडीत. रोज काय शेजारणीकडे टक लावून बघता! "
लेखन उपक्रम २ - गिफ्ट - मामी
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
ती चिमुरडी झाडाखाली बसून रडतरडत कागदावर काहीतरी एकाग्रतेने लिहित होती. त्यानं हळूच तिच्या मागे जात त्या कागदावरचा मजकूर वाचला.
कागदावर जागा मिळेल तिथे केवळ एकच शब्द पुन्हापुन्हा लिहिला होता तिनं - 'आई'!
दीर्घ उसासा सोडून त्यानं पाठुंगळीची सॅक खाली काढली. दोन खेळणी बाहेर काढली आणि तिची तंद्री भंग होणार नाही अशा बेताने तिच्याजवळ ठेवली. पुन्हा सॅक खांद्यावर टाकून त्यानं स्वतःचे डोळे पुसले.
तिची खरी मागणी पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामधे नव्हती.