लेखन उपक्रम ३ – आजी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 14:42

आजी
---------
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...तो जेव्हा उठला , घरातलं वातावरण वेगळंच होतं .
त्याची आजी गेली होती.
त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता . तो बाहेर अंगणात आला . तिथे मारत्या होता . त्याच्यापेक्षा मोठा .
तो म्हणाला, ' सदा, तुजी सहल बुडाली ! '
सदाने विचारलं , ' का ? '
'तुजी आज्जी देवाकडं गेली .'
' 'मंजी ? तीबी सहलीलाच गेली का ? '
' हो '
' मंग ती मला का नाय घिऊन गेली ? '
अरे छट ! त्या सहलीला गेल्याली माणसं परत येत नसत्यात ! '
'मंजी आज्जी ? '...
मग त्याला आजीच्या मायेची लय आठवण आली . अन तो रडायला लागला .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठीक

भावली.

छान लिहिलीयं कथा...
ऑफीस मधल्या एका सहकार्‍याची आजी गेल्याचा प्रसंग एकदा ऑफिसची सहल गेली होती तेव्हा घडला होता.. ते आठवलं