लेखन उपक्रम २- बिहाइंड एव्हरी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 25 September, 2023 - 14:14

बिहाइंड एव्हरी
----------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक ओळ होती - बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज क्राईम. एका पुस्तकात कोटेशन म्हणून वापरलेली . ते पुस्तक त्याने नुकतंच घेतलं होतं.
मग त्याच्या डोळ्यांसमोर इतिहास आला . अनेक देश , राजवटी , धर्म, जाती, धार्मिक संस्थानं, कॉर्पोरेट कंपन्या आल्या . ज्यांनी स्वतःचा विकास केला होता. राज्य केलं होतं.
वाचनातून अनेक आयडीयाज मिळतात , असं त्याचं मत होतं. त्याचं वाचन अफाट होतं. त्याच्या अफाट दहशतीसारखं .
तो एक गँगस्टर होता !
गाडी आली आणि त्याची पोरं निघाली. त्याची गॅंग त्याला मोठी व्हायला पाहिजे होती.
ते निघाले होते- त्यांच्या दुश्मन गँगच्या डॉनचा खात्मा करण्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.

वावे

क्या बात है - अचूक संदर्भ .

यातून खूप काही समजून जातं