Submitted by बिपिनसांगळे on 25 September, 2023 - 14:14
बिहाइंड एव्हरी
----------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक ओळ होती - बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज क्राईम. एका पुस्तकात कोटेशन म्हणून वापरलेली . ते पुस्तक त्याने नुकतंच घेतलं होतं.
मग त्याच्या डोळ्यांसमोर इतिहास आला . अनेक देश , राजवटी , धर्म, जाती, धार्मिक संस्थानं, कॉर्पोरेट कंपन्या आल्या . ज्यांनी स्वतःचा विकास केला होता. राज्य केलं होतं.
वाचनातून अनेक आयडीयाज मिळतात , असं त्याचं मत होतं. त्याचं वाचन अफाट होतं. त्याच्या अफाट दहशतीसारखं .
तो एक गँगस्टर होता !
गाडी आली आणि त्याची पोरं निघाली. त्याची गॅंग त्याला मोठी व्हायला पाहिजे होती.
ते निघाले होते- त्यांच्या दुश्मन गँगच्या डॉनचा खात्मा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा, फारच कल्पक. ती एक ओळ,
व्वा, फारच कल्पक. ती एक ओळ, आणि सुरवातीलाच सांगितलंत हा एक वेगळाच ट्विस्ट
मस्त.
मस्त.
छान कल्पना. ही ओळ गॉडफादरच्या
छान कल्पना. ही ओळ गॉडफादरच्या सुरुवातीला आहे ना?
छान. नवीन कल्पना.
छान. नवीन कल्पना.
मंडळी आभार
मंडळी आभार
वावे
वावे
क्या बात है - अचूक संदर्भ .
यातून खूप काही समजून जातं