उपक्रम ३ - नांदी - सामो

Submitted by सामो on 26 September, 2023 - 13:51

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच, बिट्टीला जागे केले. "बिट्टे ऊठ,आज गंमाडी-जंमत " बिट्टीही टुण्ण्कन उठून बसली. आज पानशेत धरणावरती पक्षी निरीक्षणाची सहल होती.
संध्याकाळी ती परतली तेच उत्साहाने ओसांडत. “बाबा आज आम्ही वेडा राघू, हळद्या, कवडा, सुभग, तांबट, चष्मेवाला, टकाचोर कोतवाल ,शिंजीर, शिंपी, पिंगळा,पावश्या असे कितीतरी पक्षी पाहीले.” त्याचे डोळे भरुन आले. त्याच्या तुटपुंज्या मिळकतीतही त्याने बिट्टीकडे लयलूट करावा असा आनंदठेवा सोपविला होता - निसर्गप्रेमाचा. या बालपणीच्या रम्य आठवणीच पुढे बिट्टीचे तहानलाडू-भुकलाडू ठरणार होत्या त्याचीच ही नांदी नव्हती का!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खूप खूप छान शशक आणि इवल्याश्या कथेतून संदेश सुद्धा किती गहन दिलाय.
पैसे नव्हे तर मुलांसाठी हीच खरी दौलत असते जी त्यांना आयुष्यभर पुरते