बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.
बाकीचे अजून आले नव्हते गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
काठी टेकत टेकत तीही येत होती. थकलेली. त्याला बघून शेजारीच येऊन बसली. "तु इथे? म्हणजे - इथेपण?" तो आधी खूपच गोंधळला पण लगेच सावरला. त्यानं तिचा थकलेला हात आपल्या कापर्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत समाधानानं हसला.
"अर्थातच. तू गपचूप निघून आलास पण मग मलाही राहवेना बघ." ती खट्याळपणे म्हणाली. अलगदपणे तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. त्याच्या चेहर्यावरचं हास्य अजूनच फुललं.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले..... लली? लली अजुनही याच शहरात आहे?
लली देवरुखकर त्याची जीवाभावाची सखी. त्यांचं प्रेम होतं. अचानक कॉलेज सोडून गायब झालेली.
लले अगं कुठे होतीस? केवढं शोधलं मी तुला.
.
"एक्स्क्युज मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अंकल"
.
अंकल? श्रीराम भानावर आला. ही ललीची मुलगी होती तर. डिट्टो.
.
"ललीता देवरुखकर- तुमच्या आई?"
"नाही." - चेहर्यावरती मोठ्ठे प्रश्नचिन्ह.
"एक्स्क्युज मी. माझी बस आली"
.
.
स्थळ!
बाकीचे अजून आले नव्हते गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
साडेसातची लोकल..
डोळ्यात राग उतरला..
कॉलेजला जाताना नेहमी पहायचा तो तिला. एकंदरच तिचं डॅशिंग व्यक्तिमत्व आवडायचं त्याला.
एकदा गर्दितून वाट काढताना नकळत त्याचा धक्का लागला. पण तिने परतून त्याच्या नाकावर जबरदस्त ठोशा मारला आणि पळाली.
तो धावला मागे. पण गायबच झाली. आणि आज पाच वर्षांनी दिसली. वाटलं जावं..
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.
वेड!
बाकीचे अजून आले नव्हते गाडी यायला तसा वेळच होता.
तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
ती त्याच्या ऑफिसमधली मधु होती.
मधु नावाप्रमाणेच गोड होती.
कितीजण भिरभिरायचे तिच्याभोवती..
पण शेजारी फिरोज आला आणि ती त्याच्याभोवती भिरभिरायला लागली.
एक दिवस अचानक फिरोज ऑफिस सोडून गेला आणि मधुला ऑफिसमध्येच वेडाचा झटका आला.
ती फिरोजलाच विचारत होती.
मैत्रिणींनी कसंबसं घरी पोहोचवलं.
नंतर ती ऑफिसला आलीच नाही.
तिचा राजीनामा आला.
या गोष्टीला आठेक वर्ष झाली असतील.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
का नाही जाणार तिच्या बाजूने सुगंधाची लयलूट करत वारा वहात होता. आहाहा जीवघेणा , कातिल सुगंध. मोगर्याचा की जाईचा त्यालाच उमजेना.
.
वा आज आसपास चिटपाखरु नाही.
.
"अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतच झुलवायचं?" - तो
" आम्ही नाही जा." - ती मान वेळावुन
.
.
आणि तो तिला जवळ ओढत,जवळ जवळ तिचे चुंबन घेणार तोच
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
कपाळावर ठसठशीत कुंकू, सुरकुतलेला, तेजस्वी आणि मायाळू चेहरा, विरलेले नऊवारी पातळ, बाजूला शेरडं, वासरं, लहान मुलं, पुढे करवंदाचे द्रोण.
"कितीला मावशे?" -
"दे समजून उमजून" -
"बरं! हे घे २००, चार द्रोण दे"
"देवीला जणू?"-म्हातारी
"होय आमचं कुलदैवत आहे." - तो
"जपून जा तीघं. बस आली जा बिगीबिगी. सांभाळून ग पोरी." - म्हातारी
बसमध्ये –
"तीघं????" - तो चक्रावलेला.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले..... आली का ही बया मला टक्कर द्यायला. तसेही इथे इतके हायफाय लोकं झालेले आहेत सध्या की मला कोणी भाव देत नाही. हिच्याकरताच डिमांड.
.
.अरे ही कोणती बस आली. ह्म्म्म्म!!! हेसुद्धा हिच्याकरता पागल होणार. मी नेहमीप्रमाणे मागे पडणार.
अरेच्या!!! हा तर मायबोलीचा सुजाण वाचकांचा चमू.
....... "ओ दादा आम्हा सगळ्यांना एक कप फक्कडसा चहा, मलई मार के बर्का!" - माबोकर१