उपक्रम २ - फुलवा - सामो

Submitted by सामो on 19 September, 2023 - 12:22

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
का नाही जाणार तिच्या बाजूने सुगंधाची लयलूट करत वारा वहात होता. आहाहा जीवघेणा , कातिल सुगंध. मोगर्‍याचा की जाईचा त्यालाच उमजेना.
.
वा आज आसपास चिटपाखरु नाही.
.
"अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतच झुलवायचं?" - तो
" आम्ही नाही जा." - ती मान वेळावुन
.
.
आणि तो तिला जवळ ओढत,जवळ जवळ तिचे चुंबन घेणार तोच

.
.
अरे हे काय आपल्याला कोण खडबडून जागं करतय?
"अरे विकास ऊठ. पेपर आहे ना आज?" - आई
आजोबांचे स्तोत्र पुटपुटतायत, आणि उदबत्तीचा सुगंध दरवळतोय.
हा साखरस्वप्नातून चरफडत उठतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin Biggrin Biggrin Biggrin
मस्त!

च्यायला पेपरच्या आदल्या रात्री अशी स्वप्ने...
ईथे वॅलेंटाईन डे च्या आदल्या रात्री सुद्धा उद्या आपला पेपर आहे आणि आपला अभ्यास झाला नाही अशी स्वप्ने पडायची.. Proud

अरे विकास ऊठ. पेपर आहे ना आज?" - आई>>>> हे राहील वाटतं वाचायच..

च्यायला पेपरच्या आदल्या रात्री अशी स्वप्ने...
ईथे वॅलेंटाईन डे च्या आदल्या रात्री सुद्धा उद्या आपला पेपर आहे आणि आपला अभ्यास झाला नाही अशी स्वप्ने पडायची>>>> ha haha

इतक्या वर्षानी अजूनही पेपर आहे आणि काहीच अभ्यास नाही झाला असं स्वप्न पडत.. आणि मग जाग आल्यावर स्वप्नच होत म्हणून जीव भांड्यात पडतो.

हा हा.

उमलून काच केव्हा
होते का फूल कधी

ठीक

बरं झालं उठवलं. नाहीतर "मोगऱ्याच्या वासात तिचे चुंबन" प्रत्यक्षात उदबत्तीच्या वासात गादीचे चुंबन Happy
मस्त जमलीय शशक