उपक्रम २ - ती कोण होती? - सामो

Submitted by सामो on 19 September, 2023 - 10:24

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
कपाळावर ठसठशीत कुंकू, सुरकुतलेला, तेजस्वी आणि मायाळू चेहरा, विरलेले नऊवारी पातळ, बाजूला शेरडं, वासरं, लहान मुलं, पुढे करवंदाचे द्रोण.
"कितीला मावशे?" -
"दे समजून उमजून" -
"बरं! हे घे २००, चार द्रोण दे"
"देवीला जणू?"-म्हातारी
"होय आमचं कुलदैवत आहे." - तो
"जपून जा तीघं. बस आली जा बिगीबिगी. सांभाळून ग पोरी." - म्हातारी
बसमध्ये –
"तीघं????" - तो चक्रावलेला.
"अहो तुम्हालाही अजून सांगीतलं नाही मी, तिला कसं कळलं मी पोटुशी आहे ते?" - बायको
दोघांनी चमकून मागे वळून पाहीले, तिथे कोणीच नव्हते?
पण ती कोण होती?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवी.

जमलीय.

<<पण ती कोण होती?>>
रस्त्यावरून खालच्या खळग्यात उतरून लपलेली ती मोबाईल वर बोलत होती: "ती दोघं बस मध्ये बसली आहेत, देवीच्या देवळातच जात आहेत. माझ्या तोंडुन तिघं निघून गेलं चुकून, पण लक्षात नाही आलं त्यांच्या."
.
"आलं असतं तर? अरे काय ठोकून दिलं असतं जाणकार आहे म्हणुन. बसतो लोकांचा विश्वास, हॅ हॅ! तर मग आता चार पाच तास निवांत, पोचा लगेच त्या घरी, मी पण निघतेच बस सुटली की."

छान!

खालच्या खळग्यात उतरून लपलेली ती मोबाईल वर....... आवडलच.

मस्त जमलीय !
मानवांचे एक्स्टेंशन सुद्धा भारी Happy