उपक्रम २ - वसा - प्राचीन

Submitted by प्राचीन on 21 September, 2023 - 08:07

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्‍याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.
रजनीताईंनी हसतखेळत अभ्यासाची गाठभेट घालून दिली. हे जग किती सुंदर, वेगळं होतं ..
तिच्यासारख्या, तिच्याएवढ्या अनेक सवंगड्यांमध्ये मग रमलीच ती.
दोघेही भानावर आले , ते गाडीच्या भोंग्यानं. फिरत्या शाळेत बसून निघाले... रजनीताईंनी सुचवल्याप्रमाणे शाळेपर्यंत येऊ न शकणाऱ्या आणखीन चिमुकल्यांचा दरवाजा ठोठावण्यासाठी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! Happy

छान

सामो, किल्ली, स्वाती_आंबोळे, मंजूताई, मानव, अन्जू, ह. पा., sonalis, छन्दिफन्दि, आबा, मामी, देवकी, कविन, स्वाती२, ऋन्मे~~ष, सुनिधी, sparkle, फारएण्ड - कौतुकाबद्दल मनापासून आभार.
Wink मी लिहिलेल्या आधीच्या व नंतरच्या शशकही वाचाव्यात आणि अभिप्राय द्यावा.

>>>>Wink मी लिहिलेल्या आधीच्या व नंतरच्या शशकही वाचाव्यात आणि अभिप्राय द्यावा.
अर्रे उठल्यानंतर तोच दिनक्रम आहे. मग स्वयंपाक्घरात भांडी साठोत वा केरवारे राहोत. सध्या शशकमय झाले आहे.

वा!

मी लिहिलेल्या आधीच्या व नंतरच्या शशकही वाचाव्यात आणि अभिप्राय द्यावा.>>> ही आणि अन्नपूर्णा दोन्ही आवडल्या