उपक्रम २ - वसा - प्राचीन
Submitted by प्राचीन on 21 September, 2023 - 08:07
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.