उपक्रम २ - प्रश्नचिन्ह- सामो

Submitted by सामो on 20 September, 2023 - 12:55

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले..... लली? लली अजुनही याच शहरात आहे?
लली देवरुखकर त्याची जीवाभावाची सखी. त्यांचं प्रेम होतं. अचानक कॉलेज सोडून गायब झालेली.
लले अगं कुठे होतीस? केवढं शोधलं मी तुला.
.
"एक्स्क्युज मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अंकल"
.
अंकल? श्रीराम भानावर आला. ही ललीची मुलगी होती तर. डिट्टो.
.
"ललीता देवरुखकर- तुमच्या आई?"
"नाही." - चेहर्‍यावरती मोठ्ठे प्रश्नचिन्ह.
"एक्स्क्युज मी. माझी बस आली"
.
.
"वात्सल्य" अनाथाश्रमाकडे जाणार्‍या बसकडे किती तरी वेळ तो पहात राहीला - डोळे भरुन येईपर्यंत. <शेवटचा स्टॉप की अधलामधला?> हे प्रश्नचिन्ह घेउन जगायचे कसे? - या विवंचनेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

आवडली....

एक लक्षात आलं का - जर तिचा शेवटचा स्टॉप ते अनाथाश्रम असेल आणि जर ती तेथील अनाथ मुलगी असेल. तर हा प्रसंग, प्रश्नचिन्ह तिलाही हाँट करणार.